निर्मल ऑटोमोबाईल
फोर व्हीलर गाड्यांचे स्पेअर पार्ट मिळण्याचे एकमेव ठिकाण
F
24-11-2024
आरमोरी : विधानसभा आतापर्यंत गडचिरोली जिल्ह्याच्या राजकारणात ज्याला सावकारांचे सहकार्य मिळाले, त्याला सहकार मिळाला अन् त्यातूनच तो आमदार झाला, असे स्पष्ट चित्र दिसून आले. मात्र यावेळी आरमोरी विधानसभा मतदारसंघात प्रचंड मोठी उलथापालथ झाली. आरमोरीचे विद्यमान आ. कृष्णा गजबे यांचा दणदणीत पराभव झाला. काँग्रेसचे उमेदवार रामदास मसराम यांनी त्यांचा पराभव केला. त्यामुळे महायुती, भाजपसह सहकार क्षेत्राला मोठा धक्का बसला आहे.
महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या अनुसूचित जमातीसाठी राखीव असलेल्या महत्त्वाच्या आरमोरी मतदारसंघात ज्येष्ठ सहकार नेते अरविंद सावकार पोरेड्डीवार व प्रकाश सावकार पोरेड्डीवार या बंधूंचा खूप मोठा पगडा आहे. त्यामुळे आजवर या मतदारसंघात कोणतीही निवडणूक म्हटली की, सहकार क्षेत्राचा प्रभाव अटळ असल्याचे दिसून येते. केवळ गडचिरोली जिल्ह्याच्याच नव्हे तर, संपूर्ण राज्याच्या सहकार क्षेत्रात अरविंद पोरेड्डीवार या नावाचे मोठे वलय आहे. राज्य पातळीवर त्यांनी सहकार क्षेत्राचे नेतृत्व केले आहे. त्यांच्याच मार्गदर्शनात त्यांचे कनिष्ठ बंधू प्रकाश पोरेड्डीवार यांनी गडचिरोली जिल्ह्यासह विदर्भात आपले सहकार क्षेत्र प्रबळ केले आहे. यासोबतच अरविंद पोरेड्डीवारयांचे पुत्र प्रचित पोरेड्डीवार यांनी गडचिरोली जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँकेच्या माध्यमातून जिल्हाभरात सहकाराचे क्षेत्र अधिक व्यापक केले आहे. ही सर्व मंडळी अगोदर काँग्रेसमध्ये होती.
नंतर सर्वांनी भाजपमध्ये प्रवेश केला. काँग्रेस आणि भाजप या दोन्ही ठिकाणी सक्रिय असताना आरमोरी विधानसभा क्षेत्रात पोरेड्डीवार बंधूंचा मोठा दबदबा होता. आजही तो कायम आहे. आरमोरी विधानसभा क्षेत्रात काँग्रेसने आतापर्यंत सातवेळा विजय संपादन केला आहे. त्याखालोखाल शिवसेनेने तीन वेळा,तर भाजपने दोन वेळा या मतदारसंघावर विजयाची पताका फडकाविली. एकवेळा अपक्ष उमेदवाराने याठिकाणी बाजी मारली. आरमोरी विधानसभा मतदारसंघात रामदास मसराम (काँग्रेस), कृष्णा गजबे (भाजप), आनंदराव गेडाम (अपक्ष), डॉ. शीलू चिमूरकर (अपक्ष), मोहनदास पुराम (वंचित), चेतन काटेंगे (आसपा), अनिल केरामी (बसपा), खेमराज नेवारे (अपक्ष) या उमेदवारांनी खिंड लढविली होती. त्यात काँग्रेसचे रामदास मसराम यांनी बाजी मारली.
या विधानसभा निवडणुकीत अरविंद सावकार पोरेड्डीवार, प्रकाश सावकार पोरेड्डीवार या बंधूंची भूमिका महत्त्वाची राहील. विद्यमान आ. गजबे विजयी होतील, असा विश्वास व्यक्त करण्यात येत होता. मात्र आजच्या मतमोजणीत गजबे यांचा दणदणीत पराभव झाला. त्यामुळे भाजपला मोठा हादरा बसला आहे. एक साधारण कार्यकर्ता राहिलेले कृष्णा गजबे यांना सलग दोनदा आमदार बनविण्यात पोरेड्डीवार बंधूंचा मोठा वाटा आहे. या पार्श्वभूमीवरच आ. गजबे यांना परत तिसऱ्यांदा भाजपने मैदानात उतरविले होते. मात्र त्यांची निराशा झाली.
फोर व्हीलर गाड्यांचे स्पेअर पार्ट मिळण्याचे एकमेव ठिकाण
सुपर फास्ट बातमी
Travel
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Travel
सुपर फास्ट बातमी
International
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Food
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Politics
No Comments