समाधान आयुर्वेदिक दवखाना
आपल्या समस्यांचे समाधान हेच आमचे ध्येय
F
21-12-2024
गडचिरोली: शहरातील जिल्हा महिला व बाल रुग्णालयात दाखल झालेल्या गरोदर मातेने मृत अर्भकाला जन्म दिला. त्यामुळे प्रसूती महिलेचा पती व सासूने मृत अर्भकाला शहरातील कन्नमवार वॉर्डातील एका खुल्या जागेत खड्डा खोदून गाडल्याची घटना 25 नोव्हेंबर रोजी घडली. मात्र, भटक्या कुत्र्यांनी मृत अर्भकाचा मृतदेह बाहेर काढल्याने हे प्रकरण पोलिस ठाण्यात पोहोचले. शहर पोलिसांनी तातडीने घटनास्थळ गाठून पंचनामा केला. अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. अखेर 20 दिवसांच्या कालावधीनंतर शहर पोलिसांनी या प्रकरणाचा पर्दाफाश करत मंगळवारी (दि. 17) मृत अर्भकाचा मृतदेह पुरणाऱ्या पती व सासूला ताब्यात घेतले.
एटापल्ली तालुक्यातील एका गरोदर मातेला 24 नोव्हेंबर रोजी गडचिरोलीच्या जिल्हा महिला व बाल रुग्णालयात प्रसुतीसाठी दाखल करण्यात आले होते. त्याच रात्री गर्भवती महिलेने मृत मुलाला जन्म दिला. त्यानंतर रुग्णालयातील डॉक्टरांनी मृत बाळाला घरी नेण्याचा सल्ला दिला. मात्र, गरोदर महिलेच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याने मृत बाळासाठी वाहनाने गावी परतणे, त्यांना शक्य झाले नाही. सदर कुटुंब पहिल्यांदाच गडचिरोली शहरात आले होते. त्यामुळे त्यांनी मृत बाळाला दफन करण्याचा निर्णय घेतला. 25 नोव्हेंबर रोजी शहरातील कन्नमवार वॉडांतील एका मोकळ्या जागेत खड्डा खोदून मृत बाळाला पुरले. त्यानंतर कुटुंबिय गावी परत गेले. मात्र मोकाटश्वानांनी बाळाचा मृतदेह बाहेर काढला. या प्रकरणाची माहिती मिळताच, गडचिरोली शहर पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले. त्यांनी पंचनामा करून याप्रकरणी तपास सुरू केला. दरम्यान, याप्रकरणी मंगळवारी गरोदर महिलेचा पती आणि सासूला ताब्यात घेण्यात आले आहे. ही कारवाई पोलिस निरीक्षक रेवचंद सिंगनजुडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक विजय चव्हाण, महिला पोलिस उपनिरीक्षक विशाखा म्हेत्रे, पोलिस कर्मचारी ताजुद्दीन गोवर्धन आदींनी केली.
सरकारी, खासगी रुग्णालयांची केली तपासणी
शहरातील कन्नमवार वॉर्डात नवजात अर्भक मृतावस्थेत आढळून आल्यानंतर पोलिसांनी अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल करून गांभीर्याने तपास सुरू केला. तपासादरम्यान शहर पोलिसांच्या पथकाने शहरातील सर्व शासकीय व खासगी रुग्णालयांसह अंगणवाडी सेविका व आशा सेविकांची चौकशी सुरू केली. चौकशीदरम्यान जिल्हा महिला व बाल रुग्णालयात प्रसूतीसाठी दाखल झालेल्या एटापल्ली तालुक्यातील एका महिलेने मृत नवजात बाळाला जन्म दिल्याचे उघड झाले. त्यामुळे पोलिसांनी वेगाने तपास सुरू करून याप्रकरणी गर्भवती महिलेचा पती आणि सासूला ताब्यात घेतले आहे.
आपल्या समस्यांचे समाधान हेच आमचे ध्येय
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Travel
सुपर फास्ट बातमी
International
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Food
सुपर फास्ट बातमी
Politics
Vaingangavarta19
Crime
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Politics
No Comments