बॉम्बे मोटर्स अँड कार सर्व्हिस सेंटर गडचिरोली
Your car is our responsibility
F
12-11-2023
आरमोरी दि.12:- आजच्या युगात स्पर्धा मोठ्या प्रमाणात आहे. खेळात स्पर्धा मोठ्या प्रमाणात वाढली असून प्रत्येक खेळाडूने आत्मविश्वासाने खेळाला समोरे जावे, जेणे करून उद्या चालुन आपन आपल्या राज्यासाठी देशासाठी खेळण्यासाठी तत्पर झालो पाहिजे. प्रत्येक खेळाडूने खेळाडू वृत्ती जोपासली तर नक्कीच आपल्याला यश संपादन करता येईल असे प्रतिपादन आमदार कृष्णा गजबे यांनी केले.
आरमोरी तालुक्यातील शिवनी बु. येथील सहारा क्रिकेट क्लब यांच्यावतीने हाफ पीच टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे दिनांक 12 नोव्हेंबर 2023 रोजी आयोजन करण्यात आले होते. या टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार कृष्णा गजबे यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी आमदार कृष्णा गजबे, भाजपा जिल्हा सचिव नंदू पेट्टेवार, भाजपा आरमोरी तालुकाध्यक्ष पंकज खरवडे, आरमोरी न. प. चे नगराध्यक्ष पवन नारनवरे, पंचायत समिती आरमोरी चे माजी सभापती निताताई ढोरे, ग्रामपंचायत शिवनी बु. चे सरपंच पुरुषोत्तम दोंनाडकर, सुरेश ढोरे उपसरपंच ग्रामपंचायत शिवनी बू., सामाजिक कार्यकर्ते नंदू नाकतोडे, पोलीस पाटील शकुंतला पत्रे, तंटामुक्तीचे अध्यक्ष विनायक पत्रे, पुरुषोत्तम ठाकरे शिवनी बु., प्राध्यापक भाग्यवान मेश्राम, ग्रामपंचायत सदस्य पुरुषोत्तम माकडे, ग्रामपंचायत सदस्य गौरीताई बुल्ले ग्रामपंचायत सदस्य प्रतिभाताई बघमारे, ग्रामसेवक प्रधान, पोहनकर गुरुजी, सोमेश्वर राऊत महेश उईके व गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Your car is our responsibility
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Travel
सुपर फास्ट बातमी
International
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Food
सुपर फास्ट बातमी
Politics
Vaingangavarta19
Crime
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Politics
No Comments