बॉम्बे मोटर्स अँड कार सर्व्हिस सेंटर गडचिरोली
Your car is our responsibility
F
21-12-2023
गडचिरोली, दि.21 : कुरखेडा तालुक्यातील सोनसरी येथील शासकीय आश्रमशाळेत मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण शिबिराचे आयोजन करण्यात आले. येथे नव्यानेच रुजू झालेले तहसीलदार ओमकार पवार यांच्या संकल्पनेतून या कार्यक्रमाचे संपूर्ण नियोजन हे महिलांमार्फत करण्यात आले होते. प्रमुख अतिथी म्हणून संवर्ग विकास अधिकारी धीरज पाटील, महिला व बाल विकास अधिकारी गणेश कुकडे, नायब तहसीलदार राजकुमार धनबाते, निखील पाटील, सत्यनारायण अनमदवार, तालुका कृषी अधिकारी संजय रामटेके यांच्यासह महिला सरपंच, उमेदच्या महिला सदस्या, आदर्श विद्यार्थिंनी आणि विविध शासकीय विभागांच्या महिला अधिकारी, कर्मचारी उपस्थित होत्या. आजपर्यंत मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण शिबिरांच्या माध्यामातून तालुक्यातील 25 हजार महिलांना विविध शासकीय योजनांचा लाभ देण्यात आला आहे. विकसित भारत संकल्प यात्रा चित्ररथाचे स्वागतसुध्दा यावेळी ग्रामस्थांकडून करण्यात आले. सोबतच आरोग्य विभागामार्फत नि:शुल्क टी.बी, सिकलसेल व सामान्य आरोग्य तपासणीचे आयोजन करण्यात आले होते. महिलांनी आयोजन केलेल्या या उपक्रमामुळे महिलांमधील आत्माविश्वासाला चालना मिळाली आहे.
Your car is our responsibility
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Travel
सुपर फास्ट बातमी
International
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Food
सुपर फास्ट बातमी
Politics
Vaingangavarta19
Crime
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Politics
No Comments