बॉम्बे मोटर्स अँड कार सर्व्हिस सेंटर गडचिरोली
Your car is our responsibility
F
26-11-2023
गडचिरोली :- गडचिरोली तालुक्यातील मरेगाव येथील युवकास हत्तीने हल्ला करून चिरडल्याने युवकाच्या जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. मरेगाव परिसरातील शेतातील धानपिक सध्याच्या घडीला कापणीला आले आहे आणि जिल्ह्यामध्ये धान्य कापणी व मळणीचे काम जोरात चालू आहे. त्यामुळे शेतकरी वर्ग हा जास्तीत जास्त वेळ शेतामध्ये राहत आहे. काही शेतकऱ्यांचे शेत जंगलालगत असल्याने त्यांना शेतामध्ये शेतीची कामे करण्यासाठी मोठे हिमतीने राहावे लागते. मात्र जंगलामध्ये रानटी हत्तीचा खूप दिवसापासून धुमाकूळ चालू आहे .यामुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. परिणामी हत्तींच्या भीतीमुळे शेतातील कामे काही प्रमाणात खोडबल्या जात असल्याचे निदर्शनास येत आहे. तरीही काही शेतकरी शेतातील कामे मोठ्या हिमतीने करत असतात परंतु त्यातही हत्तींची भीती तर दुसरीकडे वाघाची भीती अशी अवस्था निर्माण झाली आहे.
अशातच मरेगाव येथील युवकाला रानटी हत्तीने चीरडून ठार केले. यामुळे परिसरात जंगली हत्तीचे मोठ्या प्रमाणात दहशत पसरल्याचे दिसून येत आहे. चार ते पाच दिवसापासून मरेगाव परिसरात व डार्लि परिसरात हत्तीने मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या धान्य पिकाचे नुकसान केले होते . वणविभागाने या हत्तींना पिटाळून लावण्याकरिता ठोस उपाययोजना करावी आणि शेतकऱ्यांचे होणारे नुकसान थांबावे व जीवित हानी थांबविण्यासाठी योग्य ती उपाययोजना करावी . असे परिसरातील तथा सामान्य वर्गातून बोलल्या जात आहे.
Your car is our responsibility
Vaingangavarta19
Local News
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
विदर्भ फायर न्यूज
Crime
Vaingangavarta19
Local News
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
No Comments