अभि लायटिंग, इलेक्ट्रिकल अँड हार्डवेअर
सर्व मटेरियल होलसेल दरात उपलब्ध
यापेक्षा स्वस्त आणखी कुठेच नाही ...
F
27-10-2023
गडचिरोली, : राज्यातील तृतीयपंथीयाच्या कल्याणासाठी व त्यांच्या हक्काचे संरक्षण करण्याच्या उद्देशाने तृतीयपंथी हक्काचे संरक्षण आणि कल्याण मंडळ स्थापन करण्याबाबतचा मुद्दा तिस-या महिला धोरणामध्ये समाविष्ठ आहे. तृतीयपंथी / ट्रांसजेंडर हा समाजातील एक दुर्लक्षित घटक असून भेदभाव, सापत्न वागणुकीमुळे समाजातील हा घटक विकास प्रक्रियेपासून दुर्लक्षित राहिला आहे. त्यामुळे या समाज घटकांचे शासनामार्फत मूलभुत अधिकारांचे संरक्षण करून त्यांना विकासाची समान संधी उपलब्ध करून देणे आवश्यक आहे.
या समाज घटकांची सर्वागिण उन्नती व्हावी व त्यांना समाजाच्या विकास प्रवाहात आणले जावे, याकरिता गडचिरोली जिल्हयातील तृतीयपंथीयाच्या संस्था, तृतीयपंथीयांच्या मंडळे व तृतीयपंथीयांची नावे, शैक्षणिक पात्रता, पत्ता व भ्रमणध्वनीसह या कार्यालयात नोंदणी करण्याकरिता, तसेच तृतीयपंथी यांच्या समस्या व तक्रारीचे निवारण करण्याकरीता कार्यालयात हेल्पलाईन सुरू करण्यात आली असून हेल्पलाईन क्रमांक ०७१३२-२२२१९२ वर संपर्क साधावा, असे आवाहन सहाय्यक आयुक्त डॉ. सचिन मडावी यांनी केले आहे.
सर्व मटेरियल होलसेल दरात उपलब्ध
यापेक्षा स्वस्त आणखी कुठेच नाही ...
विदर्भ फायर न्यूज
Politics
विदर्भ फायर न्यूज
Travel
विदर्भ फायर न्यूज
International
विदर्भ फायर न्यूज
Crime
विदर्भ फायर न्यूज
Politics
विदर्भ फायर न्यूज
Food
विदर्भ फायर न्यूज
Politics
Vaingangavarta19
Crime
विदर्भ फायर न्यूज
Crime
विदर्भ फायर न्यूज
Politics
No Comments