CPELLO SALON
Redefine your style
book your appointment now
F
22-12-2024
Winter Health Tips: हिवाळ्याच्या थंड दिवसांमध्ये तापमान मोठ्या प्रमाणात कमी होत असल्याने लोक उबदार कपड्यांमध्ये स्वतःला लपेटतात. थंडीपासून संरक्षणासाठी काही जण पायात मोजे घालून झोपण्याची सवय लावून घेतात. पण पायमोजे घालून झोपणं शरीरासाठी खरोखर चांगलं आहे का? यावर तज्ज्ञांची मते जाणून घेऊयात.
1. ब्लड सर्क्युलेशनवर परिणाम
रात्री घट्ट मोजे घालून झोपल्याने रक्ताभिसरणावर विपरीत परिणाम होऊ शकतो. पायांच्या नसांवर दाब येतो, ज्यामुळे हृदयाला रक्त पंप करण्यासाठी जास्त मेहनत घ्यावी लागते. हे दीर्घकालीन आरोग्य समस्यांना कारणीभूत ठरू शकते.
2. शरीराचं तापमान वाढतं
रात्रभर पायमोजे घालून झोपल्याने शरीराचं तापमान नैसर्गिक पातळीपेक्षा जास्त वाढू शकतं. यामुळे अस्वस्थता येते आणि झोपेमध्ये खंड पडतो.
3. त्वचेच्या समस्या आणि इंफेक्शन
मोजे सतत घालून ठेवल्याने पायांना हवा खेळत नाही. त्यामुळे त्वचेवर बुरशीजन्य इंफेक्शन होऊ शकतं. याशिवाय त्वचा खवखवणे, कोरडेपणा, आणि इतर त्रास उद्भवतात.
1. पाय उबदार ठेवणे
हिवाळ्यात पाय मोजे घालून झोपल्याने पाय उबदार राहतात, ज्यामुळे थंडीची तीव्रता कमी होते. हे खासकरून ज्येष्ठ नागरिक आणि थंड हवामानामुळे त्रस्त असणाऱ्यांसाठी फायदेशीर ठरू शकतं.
2. कोरड्या त्वचेस संरक्षण
पायमोज्यांमुळे त्वचा कोरडी होण्यापासून वाचते. तसंच, पायाच्या टाचांना भेगा पडण्यापासूनही आराम मिळतो.
Disclaimer : ही माहिती तज्ज्ञांशी केलेल्या चर्चेवर आधारित आहे. ही एक सामान्य माहिती आहे. आम्ही कोणताही व्यक्तीगत सल्ला देत नाही. अधिक माहितीसाठी आपण आपल्या डॉक्टर किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. संबंधित माहितीसाठी आम्ही जवाबदार राहणार नाही.
Redefine your style
book your appointment now
विदर्भ फायर न्यूज
Politics
विदर्भ फायर न्यूज
Travel
विदर्भ फायर न्यूज
Crime
विदर्भ फायर न्यूज
International
विदर्भ फायर न्यूज
Politics
विदर्भ फायर न्यूज
Food
विदर्भ फायर न्यूज
Politics
Vaingangavarta19
Crime
विदर्भ फायर न्यूज
Crime
विदर्भ फायर न्यूज
Politics
No Comments