निर्मल ऑटोमोबाईल
फोर व्हीलर गाड्यांचे स्पेअर पार्ट मिळण्याचे एकमेव ठिकाण
F
22-12-2024
Weather Update Today: राज्यात आगामी काही दिवसांत वातावरणात मोठा बदल होण्याची शक्यता आहे. मुंबई आणि ठाण्यात शनिवारी पहाटे दाट धुक्याची झालर पसरली होती, परंतु आता हवामान खात्याने राज्याच्या विविध भागात पावसाची शक्यता वर्तवली आहे. पुणे वेधशाळेच्या माहितीनुसार, बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचा पट्टा पुढे सरकणार आहे. यामुळे पूर्व-इशान्येकडे दाब वाढणार असून, इशान्येकडील राज्यांत तसेच विदर्भात पावसाचा धोका अधिक आहे.
पावसाची शक्यता: 24 आणि 25 डिसेंबर रोजी विदर्भात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात आर्दतेच्या वाढीमुळे ढगाळ हवामान राहण्याची शक्यता आहे. किमान तापमानात वाढ होण्याचीही शक्यता आहे. 25 ते 29 डिसेंबर दरम्यान राज्याच्या काही भागांत ढगाळ वातावरण राहून किरकोळ पावसाची शक्यता आहे. 26 ते 28 डिसेंबर दरम्यान पावसाची शक्यता अधिक आहे, ज्यामुळे नाताळात थंडी ऐवजी पावसाचा अनुभव घेता येईल.
थंडीची लाट ओसरत आहे: 30 डिसेंबरपासून पुन्हा थंडीत वाढ होण्याची शक्यता आहे, असं हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी सांगितलं आहे.
भारतीय हवामान: भारतीय हवामानशास्त्र विभागानुसार, जम्मू-काश्मीर आणि हिमाचल प्रदेशमध्ये पुढील 5 दिवस थंडीच्या लाटेचा प्रभाव कायम राहणार आहे. राजस्थान आणि पंजाबमध्ये दोन दिवस थंडीच्या लाटेचा प्रभाव राहील. यासाठी पिवळा अलर्ट जारी करण्यात आला आहे. उत्तर-पश्चिम भारतात थंडीचा प्रभाव कमी होईल, पण 23 डिसेंबरपासून पंजाब आणि हरियाणामध्ये तीव्र धुक्याचा प्रभाव दिसून येईल. यासाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
फोर व्हीलर गाड्यांचे स्पेअर पार्ट मिळण्याचे एकमेव ठिकाण
विदर्भ फायर न्यूज
Politics
विदर्भ फायर न्यूज
Travel
विदर्भ फायर न्यूज
Crime
विदर्भ फायर न्यूज
International
विदर्भ फायर न्यूज
Politics
विदर्भ फायर न्यूज
Food
विदर्भ फायर न्यूज
Politics
Vaingangavarta19
Crime
विदर्भ फायर न्यूज
Crime
विदर्भ फायर न्यूज
Politics
No Comments