STUDY POINT INSTITUTE
आमच्या सोबत द्या, आपल्या स्वप्नांना आकार ...
F
22-12-2024
दारूच्या नशेत केले कृत्य : गुन्हा दाखल
आष्टी :चामोर्शी तालुक्यातील चंदनखेडी खर्डी येथे सख्ख्या भावाचा चार क्विंटल कापूस काडी पेटवून जाळल्याची घटना १९ डिसेंबरला सायंकाळी पाच वाजता घडली. याबाबत भावजयीच्या फिर्यादीवरून दिरावर गुन्हा नोंद झाला.
तेजस्विनी नितीन इजनमनकर (रा. चंदनखेडी खर्डी, ता. चामोर्शी) यांच्या फिर्यादीनुसार, १९ रोजी त्यांनी शेतात वेचणी करून आणलेला कापूस घराच्या अंगणात ठेवला होता. सायंकाळी दीर सतीश दादाजी इजमनकर हा दारूच्या नशेत घरी आला. त्याने 'येथे शेळ्या बांधू नका अन्यथा तुमचा कापूस जाळून टाकीन,' असे म्हटले. यानंतर त्याने लगेचच
काडीपेटीने कापूस पेटविला. तेजस्विनी यांनी लगेचच पाणी टाकून आग विझविण्याचा प्रयत्न केला; पण तोपर्यंत चार क्विंटल कापूस आगीत खाक झाला. यामध्ये जवळपास ७० हजार रुपयांचे नुकसान झाले.
याबाबत तेजस्विनी यांच्या फिर्यादीवरून सतीश याच्यावर आष्टी ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या (बीएनएस) कलम ३२६ (एफ) नुसार गुन्हा नोंद झाला. उपनिरीक्षक सोमनाथ पवार तपास करत आहेत.
आमच्या सोबत द्या, आपल्या स्वप्नांना आकार ...
विदर्भ फायर न्यूज
Politics
विदर्भ फायर न्यूज
Travel
विदर्भ फायर न्यूज
Crime
विदर्भ फायर न्यूज
International
विदर्भ फायर न्यूज
Politics
विदर्भ फायर न्यूज
Food
विदर्भ फायर न्यूज
Politics
Vaingangavarta19
Crime
विदर्भ फायर न्यूज
Crime
विदर्भ फायर न्यूज
Politics
No Comments