ड्रिमलँड डेव्हलपर्स
आपल्या स्वप्नातलं घर, निसर्गाच्या सानिध्यात..
तुमचे स्वप्न आमची जबाबदारी...
F
15-12-2023
कोरची तालुक्यात मसेली कोटरा मार्गे गोवंशाची तस्करी करण्याऱ्या दोन ट्रक सावली गावातील गावकऱ्यांनी पकडले.सावली गावातील गावकऱ्यांना अवैध रित्या गोवंशाची कत्तल करण्यासाठी नेण्यात येत आहे असे गावातील गावकऱ्यांना वाटल्यामुळे दोन्ही ट्रक थांबविण्यात आले.अवैध रित्या वाहतूक होत असल्याच्या संशय वाटल्यामुळे रात्रीचे 9.00 ते 9.30 च्या दरम्यान गावातील गावकऱ्यांनी सापळा रचुन दोन ट्रकसह 100 च्या जवळपास गोवंश दोन्ही ट्रकात आढळून आले आहेत.या दोन्ही ट्रक ड्रायव्हर गावातील लोकांचा गर्दीमुळे फरार झाले.
कोटरा च्या दिशेकडून मसेली कडे गोवंशाची तस्करी वाहन जात होते.या प्रसंगी सावली गावातील पोलीस पाटील शांतीलाल नैताम यांच्या सहकार्याने कोरची पोलीस स्टेशनला अवैध रित्या जनावरांची तस्करी होत आहे असे गावकऱ्यांचा सहकार्याने कळविण्यात आले. या वेळेस MH-40 CM.2712 या ट्रक मध्ये 50 आसपास तर NL.08.D.0404 या वाहनात 50 च्या आसपासअसे गोवंश जनावरे क्रूरपणे बांधलेले दिसून आले. या दोन्ही ट्रक मध्ये जवळपास 15 ते 20 लाख रुपये किमतीचे गोवंश असल्याचे समजते.
सदर गोवंश अवैध व्यवसाय करणाऱ्यांना कठोर कारवाई करून दोन्ही ट्रक जप्त करण्यात यावी असे गावातील सर्व गावकऱ्यांनी मागणी केली आहे.
आपल्या स्वप्नातलं घर, निसर्गाच्या सानिध्यात..
तुमचे स्वप्न आमची जबाबदारी...
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Travel
सुपर फास्ट बातमी
International
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Food
सुपर फास्ट बातमी
Politics
Vaingangavarta19
Crime
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Politics
No Comments