नेरलवार लाकडी तेल घाणी, गडचिरोली
तुमचे आरोग्य, आमची जबाबदारी
F
21-11-2023
गडचिरोली : गडचिरोली जिल्हा अनुसूचित क्षेत्रात समाविष्ठ असून पेसा,वनाधिकार कायदे लागू असतांना बेकायदेशीरपणे विविध ठिकाणी लोह खाणी स्थानिक ग्रामसभा आणि जनतेच्या विरोधानंतरही बळजबरीने मंजुर व प्रस्तावित करण्यात येवून त्या खोदण्यात येत आहेत. याविरोधात ग्रामसभांची भूमिका प्रागतिक पक्ष, महाराष्ट्र च्या आघाडीतील आमदारांनी येत्या हिवाळी अधिवेशनात लावून धरुन आवाज बुलंद करावा,असा निर्णय जिल्हास्तरीय बैठकीत घेण्यात आला.
स्थानिक पत्रकार भवन येथे प्रागतिक पक्ष, महाराष्ट्र च्या गडचिरोली जिल्हा समन्वय समितीची जिल्हास्तरीय बैठक आयोजित करण्यात आली होती. सभेच्या अध्यक्षस्थानी अखिल भारतीय रिपब्लिकन पक्षाचे केंद्रीय उपाध्यक्ष रोहिदास राऊत होते. यावेळी भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हा सचिव काॅ. देवराव चवळे, ॲड. जगदीश मेश्राम, शेतकरी कामगार पक्षाचे नेते भाई रामदास जराते, जयश्रीताई वेळदा, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हा सचिव काॅ. अमोल मारकवार, बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पक्षाचे जिल्हा प्रभारी राज बन्सोड, प्रतिक डांगे, गोंडवाना गणतंत्र पार्टीचे जिल्हाध्यक्ष प्रशांत मडावी, आदिवासी विकास युवा परिषदेचे जिल्हाध्यक्ष कुणाल कोवे, विनोद मडावी प्रामुख्याने उपस्थित होते.
गडचिरोली जिल्ह्यातील डावे, पुरोगामी राजकीय पक्ष, संघटना आणि पारंपारिक इलाखे व ग्रामसभा एकत्र येवून मागील अनेक वर्षांपासून खदान विरोधी आंदोलन चालविण्यात येत आहे. मात्र राजकीय स्वार्थापोटी काही भांडवलदार प्रेरीत लोकांनी या आंदोलनात फुट पाडून आपला स्वार्थ साधण्याचा सातत्याने प्रयत्न केला गेला. यातूनच वेळोवेळी आंदोलकांचा आवाज दडपण्याचा प्रयत्न झाला. याबाबत प्रस्थापित काॅग्रेस, भाजप, सेना, राष्ट्रवादी यांनी जाणूनबुजून दुर्लक्ष केले. त्यामुळे वनहक्क, पेसा, रोजगार हमी योजना लागू करण्यास सरकारला बाध्य करणारे प्रागतिक पक्ष, यांच्यासह ग्रामसभांनी एकत्र येवून येणाऱ्या हिवाळी अधिवेशनात बेकायदेशीर लोह खाणी, पेसा क्षेत्रातील नोकर भरती, नदी,नाले, तलावांर मच्छीमार समाजाची मालकी अशा विविध प्रश्नांवर पाठपुरावा करावा. प्रागतिक पक्ष, महाराष्ट्र आघाडीतील पक्षांच्या आमदारांनी विधिमंडळात याबाबत आवाज बुलंद करुन जनतेला न्याय द्यावा, असे या बैठकीत ठरविण्यात आले.
तसेच तोडगट्टा आंदोलनाबाबत प्रागतिक पक्ष, महाराष्ट्र आघाडीच्या वतीने जिल्हाप्रशासनाशी निवेदन देवून चर्चा करावी असेही ठरविण्यात आले.
या बैठकीला अखिल भारतीय रिपब्लिकन पक्षाचे शहराध्यक्ष नरेंद्र रायपूरे, माजी जिल्हा परिषद सदस्य क्रांती केरामी, पत्रकार हेमंत डोर्लीकर, शेकापचे डॉ. गुरुदास सेमस्कर, तुकाराम गेडाम, अशोक किरंगे, तितिक्षा डोईजड, विजया मेश्राम, रेश्मा रामटेके, ग्रामसभेचे नितीन पदा, कोत्तुराम पोटावी, बाजीराव उसेंडी, प्रशांत गोटा यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
तुमचे आरोग्य, आमची जबाबदारी
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Travel
सुपर फास्ट बातमी
International
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Food
सुपर फास्ट बातमी
Politics
Vaingangavarta19
Crime
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Politics
No Comments