रोज ब्युटी पार्लर
रोज ब्युटी पार्लर, जिल्हा कोर्ट चौक, चंद्रपूर रोड, राजश्री कॉन्व्हेंटच्या बाजूला, नवेगाव (गडचिरोली)
05-12-2023
सन २०२३-२४ अनुसुचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील विद्यार्थ्यांना योजनेचा लाभ
गडचिरोली, : अनुसुचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील ज्या विद्यार्थ्यांना शासकिय वसतीगृहात अर्ज करुन देखील शासकीय वसतीगृहात प्रवेश मिळालेला नाही अशा विद्यार्थ्यांना मॅट्रीकोत्तर शिक्षण घेता यावे अशा विद्यार्थ्यांना भोजन, निवास, निर्वाह भत्ता, व इतर शैक्षणिक सुविधा स्वतः उपलब्ध करून घेणेसाठी आवश्यक ती रक्कम विद्यार्थ्यांच्या खात्यामध्ये थेट जमा करणे करिता शासनाने दि.१३ जुन २०१८ च्या सुधारित शासन निर्णयान्वये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना सुरु करण्यात आलेली आहे. या योजनेचा लाभ घेणे करिता विद्यार्थ्यांना ११ वी, १२ वी तसेच इयत्ता १२ वी नंतरच्या व्यावसायिक तसेच बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये प्रॉपर जिल्हयाच्या ठिकाणी ५ कि.मी. अंतरावर असलेल्या विविध स्तरातील महाविद्यालयात/शिक्षण संस्थांमध्ये प्रवेश घेतलेला असावा. या योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यांना इयत्ता १०वी/१२वी/पदवी/पदविका परिक्षेमध्ये ५०% गुण असणे अनिवार्य आहे. तसेच या योजनेचा लाभ घणेकरिता विद्यार्थ्यांच्या पालकाचे उत्पन्न अडीच लाखापर्यंत असावे. या योजनेमध्ये दिव्यांग (अनुसुचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील) विद्यार्थ्यांना ३ टक्के आरक्षण असेल. दिव्यांग (अनुसुचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील) विद्यार्थ्यांसाठी गुणवत्तेची टक्केवारी ४० टक्के इतकी राहील. सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी सन२०२३ २४ या शैक्षणिक सत्राकरिता विद्यार्थ्यांनी दि. १५ जानेवारी २०२४ पर्यंत सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, गडचिरोली यांचेकडे ऑफलाईन अर्ज सादर करण्यात यावे असे आवाहन सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण गडचिरोली डॉ. सचीन मडावी, यांनी केले आहे. सदर योजनेचा लाभ घेणेसाठी विहीत अर्जाचा नमुना सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, गडचिरोली या कार्यालयात उपलब्ध आहे. असे सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण गडचिरोली यांनी कळविले आहे.
रोज ब्युटी पार्लर, जिल्हा कोर्ट चौक, चंद्रपूर रोड, राजश्री कॉन्व्हेंटच्या बाजूला, नवेगाव (गडचिरोली)
सुपर फास्ट बातमी
National
Vaingangavarta19
Local News
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Local News
Vaingangavarta19
Crime
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Local News
No Comments