अभि लायटिंग, इलेक्ट्रिकल अँड हार्डवेअर
सर्व मटेरियल होलसेल दरात उपलब्ध
यापेक्षा स्वस्त आणखी कुठेच नाही ...
F
26-11-2023
आरमोरी - पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांच्या आदेशान्वये गडचिरोली जिल्हयातील सर्व शहरामध्ये कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी नेहमीच गस्त केल्या जाते. रात्रीच्या वेळी देखील नागरीकांच्या सुरक्षीततेकरीता पोलीस दलाकडुन रात्रगस्त केल्या जाते. गडचिरोली पोलीस दलाकडुन आरमोरी शहरातील रामाळा जाणाया मार्गावर काल दि. 25-11-2023 रोजी चे 23. 30 ते 26-11-2023 चे 00. 30 वा दरम्यान काही तरुण एकत्र येवुन गोंधळ/आरडा ओरड करत असतांना दिसुन आल्याने त्याच्या जवळ जावुन चौकशी केली असता गाडीच्या सीट वर केक ठेवुन केक अवैधरित्या तलवार बाळगुन केक कापत असतांना तसेच गंभीर स्वरुपाचा गुन्हा घडुन आणन्याचे उद्दंेशाने तलवार सहित मिळुन आल्याने त्यांना ताब्यात घेवुन त्यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला.
सदर कार्यवाही मध्ये 1) एक धार धार टोकदार तलवार अंदाचे किंमत 1500/- रुपये, 2) एक जुनी वापरती पांढया रंगाची अॅक्टीवा 6जी गाडी नंबर एम. एच. 33 ए.ए. 1340 अंदाजे किंमत 55000/-रु., 3) एक जुनी वापरती काळया रंगाची सुपर स्प्लेडंर प्लस वाहन क्र एम.एच 33 वाय 7854 अंदाजे किंमत 40,000/- मोटार सायकल असा एकुण अंदाजे 96,500/- रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तसेच सदर गुन्हयातील आरोपी नामे 1) लोकेश विनोद बोटकावार वय 21 वर्ष, 2) लोकमित्र खुशाल ठाकरे वय 25 वर्ष, 3) बादल राजेंद्र भोयर वय 23 वर्ष, 4) पवन मनोहर ठाकरे, वय 25 वर्षे व फरार आरोपी नामे राहुल मनोहर नागापुरे वय 28 वर्षे सर्व रा. बाजारटोली आरमोरी ता. आरमोरी जि. गडचिरोली वरील नमुद आरोपीतांच्या विरुध्द कलम 4/25 भारतीय हत्यार कायदा 1959 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. सदर गुन्हयातील फरार आरोपीचे शोध घेणे सुरु असुन गुन्ह्राचा पुढील तपास मा. वरीष्ठंाचे मार्गदर्शनाखाली पोस्टे आरमोरी येथील परि.पोउपनि संतोष कडाळे हे करीत आहेत.
सदरची कार्यवाही पोस्टे आरमोरी प्रभारी अधिकारी पोनि. संदिप मंडलीक व पोलीस अंमलदार यांनी पार पाडली.
सर्व मटेरियल होलसेल दरात उपलब्ध
यापेक्षा स्वस्त आणखी कुठेच नाही ...
Vaingangavarta19
Local News
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
विदर्भ फायर न्यूज
Crime
Vaingangavarta19
Local News
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Education
Vaingangavarta19
Local News
Vaingangavarta19
Health
No Comments