निर्मल ऑटोमोबाईल
फोर व्हीलर गाड्यांचे स्पेअर पार्ट मिळण्याचे एकमेव ठिकाण
F
20-10-2023
गडचिरोली : छत्तीसगड मधून गडचिरोली जिल्ह्यात आलेले रानटी हत्ती कोरची, कुरखेडा, आरमोरी तालुक्यात धुडघुस घालून आता गडचिरोली तालुक्यात हैदोस माजवित आहेत. एका वन कर्मचारी चा बळी घेऊन आता घेतला शेतकऱ्याचा बळी.
धान कापणी करायची आहे. रानटी हत्तींकडून धानपिकाची नासधूस होऊ नये म्हणून हत्तींच्या कळपाला जंगलाच्या दिशेने पांगविण्यासाठी गेलेल्या दिभना येथील होमाजी बाबाजी गुरनुले (५५) यांचा रानटी हत्तीने आपटून व चिरडून बळी घेतला. हत्तींनी परिसरातील शेतकऱ्यांचे धान तर तुडविलेच; नव्वद वर्षीय वयोवृद्ध बाबाजी नानाजी गुरनुले यांची म्हातारपणाची काठी राहिलेला त्यांचा मुलगा होमाजी यांनाही हिरावून घेतले. आरमोरी तालुक्यातून पहिल्यांदाच गडचिरोली तालुक्यात दाखल झालेल्या रानटी हत्तींनी काटली, साखरा गोगावच्या जंगलातून दिभना जंगलात सोमवारी प्रवेश केला. याच दिवशी दिभनापासून दोन किमी अंतरावरील काही शेतकऱ्यांच्या धानाची नासधूस केली. दुसऱ्या दिवशी सायंकाळी दिभना अमिर्झा मार्गावरील एका बोडीलगतच्या शेतांमध्ये धुडगूस घातला. ही बाब माहीत होताच दिभनातील जवळपास १५-२० शेतकरी सायंकाळी ७ वाजता हत्तींना जंगलात पांगविण्यासाठी गेले. हत्तींचा कळप जेफ्रा च्या दिशेने पूर्वेकडे जात होता.त्याच्यामागे हे शेतकरी होते. मागेहून होमाजी गुरनुले व अशोक कुमरे हे दोघे जात होते. याच वेळी पश्चिमेकडून तीन हत्ती आले. यापैकीच एका हत्तीने अशोक कुमरे यांना सोंडेने उचलून फेकले, तर होमाजी गुरनुले यांना उचलून आपटले. होमाजी हे पळू शकले नाहीत. त्यामुळे हत्तीने त्यांना पायाखाली घेतले. यात त्यांचे शरीर भिन्नविच्छिन्न झाले.
बाप-लेकाचा संसार झाला उध्वस्त ..
बाबाजी गुरनुले यांना एक मुलगा व मुलगी, होमाजी यांचा दोनदा विवाह झाला; परंतु तो काही कारणास्तव टिकला नाही. त्यामुळे बाबाजी व होमाजी या दोघांचाच कौटुंबिक संसार सुरू होता. वडिलोपार्जित थोडी-फार असलेली शेती ते कसत होते. आता बाबाजीच्या जगण्याची उमेदव संपली आहे. मिळणारे पंचवीस लाख मातीमोल...
फोर व्हीलर गाड्यांचे स्पेअर पार्ट मिळण्याचे एकमेव ठिकाण
विदर्भ फायर न्यूज
Politics
विदर्भ फायर न्यूज
Travel
विदर्भ फायर न्यूज
International
विदर्भ फायर न्यूज
Crime
विदर्भ फायर न्यूज
Politics
विदर्भ फायर न्यूज
Food
विदर्भ फायर न्यूज
Politics
Vaingangavarta19
Crime
विदर्भ फायर न्यूज
Crime
विदर्भ फायर न्यूज
Politics
No Comments