रोज ब्युटी पार्लर
रोज ब्युटी पार्लर, जिल्हा कोर्ट चौक, चंद्रपूर रोड, राजश्री कॉन्व्हेंटच्या बाजूला, नवेगाव (गडचिरोली)
22-10-2023
गोंदिया - मेरी मिट्टी मेरा देश उपक्रमांतर्गत आज गोंदिया तालुक्यातील ग्रामीण भागात माती संकलन आणि पंचप्राण प्रतिज्ञा अभियान राबविण्यात आले. या अभियानात खा. सुनील मेंढे यांनी सहभागी होवून, नागरिकांना उपक्रमाचे महत्व पटवून दिले. विविध ठिकाणी जाहीर सभेच्या माध्यमातून मार्गदर्शन करण्यात आले.
देशा प्रती स्वाभिमान जागृत व्हावा आणि देशासाठी प्राणांची आहुती देणाऱ्या वीरांचे स्मरण चिरकाल स्मृतीत राहावे यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून मेरी माटी मेरा देश उपक्रम राबविला जात आहे. या अंतर्गत देशभरातील गावागावातून आणि घरातून संकलित माती दिल्ली येथे नेली जाणार आहे.
याच पार्श्वभूमीवर आज गोंदिया तालुक्यातील कुडवा, कटंगी, रावणवाडी, नागरा, सावली, रजेगाव, सतोना, बिरसोला, काटी, तेवढा, दासगाव, गिरोला, पांढराबोडी येथे माती संकलन व पंचप्राण प्रतिज्ञा अभियान राबविण्यात आले. यावेळी तयार करण्यात आलेल्या रथाच्या माध्यमातून उपक्रमाची माहिती लोकांपर्यंत पोहचविण्यात आली. दरम्यान खासदार सुनील मेंढे यांनी प्रत्येक गावात घरोघरी जात माती संकलन केले. जाहीर कार्यक्रमात गावकऱ्यांना प्रतिज्ञा देण्यात आली. यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करतांना खासदार सुनील मेंढे यांनी हे अभियान म्हणजे मातृभूमी प्रति स्वाभिमान आणि देशासाठी प्राणांची आहुती देणाऱ्या विरांप्रती आदरभाव व्यक्त करण्याची संधी असल्याचे त्यांनी सांगितले. याप्रसंगी भाजपा जिल्हाध्यक्ष येशूलालजी उपराडे, माजी आमदार गोपलदासजी अग्रवाल,
संजयजी टेंभरे सभापती, जि.प गोंदिया, नेतरामजी कटरे माजी अध्यक्ष जि.प गोंदिया, विजयजी शिवणकर लोकसभा प्रमुख भंडारा-गोंदिया, सुनीलजी केलंका जिल्हा महामंत्री भाजपा गोंदिया, नंदुभाऊ बिसेन जिल्हा उपाध्यक्ष भाजपा, धनलालजी ठाकरे तालुका अध्यक्ष भाजपा गोंदिया, धर्मिष्ठाताई शेंगर जिल्हा उपाध्यक्ष भाजपा, अमितजी झा शहर अध्यक्ष भाजपा गोंदिया, गजेंद्रजी फुंडे जिल्हा अध्यक्ष ओ. बी.सी भाजपा आघाडी, योगराजजी राहंगडाले जिल्हा परिषद प्रमुख नागरा, अर्जुन नागपुरे, कुणालजी बिसेन, तीजेशजी गौतम, पुरुजी ठाकरे, जिल्हा परिषद सदस्य, पं. स सदस्य, सरपंच, उपसरपंच भाजपा पदाधिकारी आणि कार्यकर्ते तसेच गावातील नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
रोज ब्युटी पार्लर, जिल्हा कोर्ट चौक, चंद्रपूर रोड, राजश्री कॉन्व्हेंटच्या बाजूला, नवेगाव (गडचिरोली)
सुपर फास्ट बातमी
National
Vaingangavarta19
Local News
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Local News
Vaingangavarta19
Crime
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Local News
No Comments