अमित मेडिकल स्टोर & निर्मल जल, गडचिरोली
निर्मल जल शुद्धतात का वादा
F
19-10-2023
Gadchiroli .शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा,किमान वेतन,दिवाळी भाऊबीज लागू करण्याची मागणी अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा आयटक चा इशारा!
गडचिरोली:- महाराष्ट्र राज्य आरोग्य खाते आशा वर्कर व गट प्रवर्तक संघटना संलग्न आयटक च्या वतीने गट प्रवर्तक कर्मचारी यांना कंत्राटी कर्मचाऱ्या प्रमाणे वेतनश्रेणी,वार्षिक वेतन वाढ,अनुभव बोनस तर आशा वर्कर ला किमान वेतन,दिवाळी भाऊबीज आणि ऑनलाईन कामावर बहिष्कार या मागणीसाठी जिल्हा परिषद कार्यालय वर विशाल धरणे आंदोलन करत आशा वर्कर व गटप्रवर्तक यांनी तीव्र नारेबाजी करून सरकारवर रोष व्यक्त केला. मुख्यकार्यकारी अधिकारी यांच्या मार्फत मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री व आरोग्य मंत्री यांना निवेदन दिले.यापूर्वी सुधा मोर्चा काढून मागण्या मंजूर कराव्यात याकरिता अनेकदा निवेदन दिले होते.परंतु सरकारने याकडे दुर्लक्ष केल्याने महाराष्ट्र राज्य आरोग्य खाते आशा वर्कर व गट प्रवर्तक कृती समिती द्वारे 18 ऑक्टोंबर पासून राज्यव्यापी बेमुदत संप सुरू केले आहे.त्या अनुषंगाने 18 ऑक्टोंबर रोजी जिल्हाभर पंचायत समिती समोर आंदोलन केले तर आज 2 र्या दिवशी जिल्हा परिषद कार्यालय समोर आयटक च्या नेतृत्वात बेमुदत धरणे आंदोलनाला सुरुवात झाली.
आंदोलनाचे नेतृत्व कॉ विनोद झोडगे राज्य सचिव आयटक , कॉ.ड्रॉ.महेश कोपुलवार राज्य कार्यकारणी सदस्य भाकप , कॉ.देवराव चवळे जिल्हा सचिव आयटक, कॉ.अँड जगदीश मेश्राम नगर सेवक आरमोरी, कॉ.संजय वाकडे,बाळकृष्ण दुमाने,अमोल दामले,रजनी गेडाम,कविता दरवाडे,संगीता मेश्राम, माया दिवटे,माया कांबळे,ज्योत्स्ना रामटेके यांनी केले.राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक यांची नेमणूक झाल्यापासून दिवसेंन दिवस कामाचा दबाब वाढवण्यात येत आहे. अल्प मोबदल्यात काम करणाऱ्या स्वयंसेविका स्वतः विधवा, घटस्फोटीत किंवा ज्यांची आर्थिक बाजू कमकुवत आहे अशा असून वाढत्या महागाईच्या काळात प्रपंच चालवणे कठीण होत आहे. त्यामुळे आज (18 ऑक्टोंबर)पासून महाराष्ट्र आशा गटप्रवर्तक कृती समितीने राज्यभर विविध मागण्या करता आंदोलन सुरू केले. त्या अनुषंगाने आयटक च्या वतीने जिल्हा परिषद कार्यालय समोर बेमुदत धरणे आंदोलन चालू करण्यात आले आहे.
यावेळी विविध प्रमुख व स्थानिक मागण्या करण्यात आल्या.ज्यामधे गट प्रवर्तक कर्मचाऱयांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा देऊन शासकीय वेतन श्रेणी व भत्ते लागू करावेत.जोपर्यंत शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा दिला जात नाही तोपर्यंत त्यांना कंत्राटी कर्मचाऱयांना लागू असलेली वेतनश्रेणी देण्यात यावी.तसेच कंत्राटी कर्मचाऱयांना लागू असलेली वार्षिक वेतन वाढ 5 टक्के व अनुभव बोनस 15 टक्के देण्यात यावा या खेरीज गट प्रवर्तक यांना प्रवास भत्ता देण्यात यावा. आशा वर्कर ला किमान वेतन ,दिवाळी भाऊबीज दहा हजार रु.लागू करण्यात यावी. आशा वर्कर व गट प्रवर्तक यांना ऑनलाईन कामे करण्याची शक्ती करू नये,विना मोबदला कामे सांगू नये.आरोग्य खात्यातील 50 टक्के रिक्त जागा पात्रतेनुसार आशा व गट प्रवर्तक मधून भरा. कोरोना काळातील ग्रामपंचायत स्तरावरून थकीत देण्यात येणारा मासिक हजार रुपये त्वरित देण्यात यावा.आभा कार्ड,गोल्डन ई कार्ड काढण्याची शक्ती करण्यात येऊ नये.गटप्रवर्तक यांचा आशा सुपरवायजर नामोल्लेख करण्यात यावा.
सी एच ओ नसलेल्या सब सेंटर मधील आशा वर्कर ला आरोग्य वर्धिनीचा निधी मेडिकल ऑफिसर च्या सहीने देण्यात यावा. शासकीय सुट्टीचे दिवशी लाभार्थीची माहिती मागवू नये यासह विविध मागण्या करण्यात आल्या आणि जोपर्यत मागण्या मंजूर होत नाही तोपर्यंत संप मागे घेणार नाही असा इशारा आयटक चे राज्य सचिव कॉ.विनोद झोडगे यांनी दिला आहे.
यावेळी जिल्हा भरातील हजारो आशा वर्कर व गट प्रवर्तक उपस्थित होत्या.
निर्मल जल शुद्धतात का वादा
विदर्भ फायर न्यूज
Politics
विदर्भ फायर न्यूज
Travel
विदर्भ फायर न्यूज
International
विदर्भ फायर न्यूज
Crime
विदर्भ फायर न्यूज
Politics
विदर्भ फायर न्यूज
Food
विदर्भ फायर न्यूज
Politics
Vaingangavarta19
Crime
विदर्भ फायर न्यूज
Crime
विदर्भ फायर न्यूज
Politics
No Comments