नेरलवार लाकडी तेल घाणी, गडचिरोली
तुमचे आरोग्य, आमची जबाबदारी
F
02-12-2023
विदर्भ राज्य आंदोलन समितीने मिशन 2023 अंतर्गत “विदर्भ मिळवू औंदा” ही घोषणा केली असून ३१ डिसेंबर २०२३ पर्यंत ‘करू, मरू किंवा जेल मध्ये सडू’ असा निर्धार केला असून १९ डिसेंबर २०२२ पासून "शुरू हुई हैं जंग हमारी", "लढेंगे-जितेंगे", "कटेंगे मगर हटेंगे नही", "लाठी खाऊ गोळी खाऊ विदर्भ राज्य मिळवून घेऊ" असा निर्धार व्यक्त केला असून ‘अभी नही तो कभी नही’ असे म्हणून युद्धपातळीवर तळागळा पर्यंत या आंदोलनाची धग पोहचवून केंद्र सरकारला भारतीय राज्य घटनेतील कलम ३ प्रमाणे विदर्भाचे स्वतंत्र राज्य निर्माण करण्याकरीता भाग पाडण्याकरीता जनजागृतीचा चंग बांधला असून सतत आंदोलनाची मालिका सुरू ठेवली आहे.
विराआंसने गडचिरोली जिल्ह्यातील १२ ही तालुक्यातील गावागावात स्वतंत्र विदर्भ राज्य निर्मितीच्या आंदोलनाची माहिती गावागावात पोहचविण्याकरीता व पुढील लढाईची भूमिका गडचिरोली जिल्ह्यातील लोकांच्या मनामनात जागविण्याकरीता "विदर्भ निर्माण जनजागरण यात्रा” आज दि. १ डिसेंबर २०२३ ला सकाळी ११ वाजता छत्तीसगड सीमेवरील बोटेकसा गावापासून पूर्व विदर्भ अध्यक्ष अरुण केदार व डॉ. रमेशकुमार गजबे यांच्या द्वारे यात्रेला हिरवी झंडी दाखविल्या नंतर शुभारंभ करण्यात आला. यावेळी बोटेकसा सरपंच किशोर नरोटे यांच्या द्वारे छत्तीसगड बॉर्डर ला "विदर्भ राज मे आपका स्वागत हैं" याआशयाच्या फलकाचे अनावरण करण्यात आले. पुढे ही यात्रा बोटेकसा गावात घुमत, भीमपूर येथील सरपंच कौशल्या काटेंगे यांनी यात्रेचे स्वागत केले महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत आई महिला प्रभागसंघ भिमपुर च्या कार्यालयात विदर्भ निर्माण संकल्प यात्रा याच्या स्वागत करण्यात आले .त्यावेळी अध्यक्ष प्रमिलाताई काटेंगे, व लेखापाल सतोषी करमकार,ग्रामसंघ सचिव,उत्तरा पुजेरी ,शामबती लाडे,कौशल्या काटेंगे सरंपच,निमला काटेंगे, पुनिया काटेंगे, मंजु नंदेश्वर, गयाबाई चांग सितारो होळी,मनिषा दरवडे,इंद्रावती सोनार,मंगला अंबादे,मनिषा कराडे,शशिकला लाडे,वंदना सहारे,पंचम लाडे,सभा घेण्यात आली, तसेच ही यात्रा गावागावात घुमण कोरची येथे दुपारी 3:30 वाजता पोहचली यावेळी पायदळ रैली काढण्यात आली यावेळी "वेगळा विदर्भ झालाच पाहिजे", "लेके रहेंगे लेके रहेंगे विदर्भ राज लेके रहेंगे", "विदर्भ आमच्या हक्काचा नाही कुणाच्या बापाचा", " अभि तो यह अंगडाई हैं आगे घनघोर लढाई हैं", "लाठी खाऊ गोळी खाऊ विदर्भ राज्य मिळवून घेऊ अश्या घोषणा देण्यात आल्या.
विदर्भ निर्माण जनजागरण यात्रेचे नेतृत्व अरुणभाऊ केदार पूर्व विदर्भ अध्यक्ष, मुकेश मासुरकर युवा आघाडी अध्यक्ष, डॉ रमेश गजबे कोर कमेटी सदस्य, राजेंद्रसिंग ठाकूर गडचिरोली जिल्हाध्यक्ष करत असून यात्रेत कोअर कमेटी सदस्य तात्यासाहेब मत्ते, अशोक पाटील,ज्योती खांडेकर, मुक्ताजी दुर्गे, पराग वैरागडे, रामचंद्र रोकडे, नेपाल मारगाये, शोभीत सोंजाल, मदन सिंग ब्रह्मनायक, वसंता गवळी, अजय गौर, विजय मोंदेकर, माधुरी चौहान, शिवलाल ब्रह्मनायक, बुधराम सहाळा, गोकुल ठेला, सी. पी. बिसेन, अतुल सतदेवे, दीपा काशीकर, भोजराज ठाकरे, हेमंत मरकाम, सरोज सहारे, ठाकूरराम कोसरे, शोभा सोंजाल, विठ्ठल मानेकर, भुवणेश्वर शेंडे, कविता उके, नितेश कोडाप, जगवंतीन देवागण, पुष्पा सहारे, वर्षा वट्टी, रामचंद्र कोडापे, चुनेश्वर मानकर, मुकुंददास सय्याम ,सरजु जमकातन,अभिजिंत निंबेकर,संजय साहारे,चेतन कराडे,रुपेश मडावी,सुनिल हलामी,प्रकाश कौशिक,चेतन किरसान सरपंच,देवाजी गुरूनुले उपसरपंच, सुभाष गायकवाड़, तब्बेत जाडिया,राजु गुरूनुले, राष्ट्रपाल नखाते,,आशीष अग्रवाल, जिंतेद्र साहारे,राजेंद्र मेश्राम,हुशण पठाण,सुरेश मेश्राम
यात्रेत उपस्थित होते.
तुमचे आरोग्य, आमची जबाबदारी
Vaingangavarta19
Local News
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
विदर्भ फायर न्यूज
Crime
Vaingangavarta19
Local News
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Education
Vaingangavarta19
Local News
Vaingangavarta19
Health
No Comments