नेरलवार लाकडी तेल घाणी, गडचिरोली
तुमचे आरोग्य, आमची जबाबदारी
F
01-11-2023
चिमूर -मृतावस्थेत असलेल्या एका नवजात अर्भकाला नालीत फेकून दिल्याची हृदय द्रावक घटना आज बुधवारी (1 नोव्हेंबर 2023) ला सायंकाळी चारच्या सुमारास चंद्रपूर जिल्ह्यात चिमूर तालुक्यातील बोडदा गावातील हनुमान मंदिरासमोरील नालीत उघडकीस आली आहे. आढळलेले नवजात अर्भक बालिका असून ती दोन ते तीन दिवसाचे असून गावातील नसल्याची माहिती जनमानसांच्या चर्चेतून कळते.
हाती आलेल्या माहितीनुसार, चिमूर तालुक्यातील बोडधा गावात आज बुधवारी सायंकाळी चारच्या सुमारास गावातील काही लोकांना हनुमान मंदिरासमोरील सांडपाणी साचलेल्या नालित नवजात अर्भक मृत्तावस्थेत आढळून आला. या घटनेची माहिती बोडधा गावात वाऱ्यासारखी पसरताच नागरिकांनी पाहण्यासाठी एकच गर्दी केली. लगेच भिशी पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली. पोलिसांची चम्मू घटनास्थळी दाखल झाली. पोलीसांनी नवजात अर्भकाला ताब्यात घेतले असता ते मृत्तावस्थेत होते. ती बालिका असुन पोलीसांनी ताब्यात घेतले असून त्या महिलेचा शोध पोलिसांनी सुरू केला आहे.
अर्भक आढळून आल्यानंतर ती गावातील कुण्यातरी महिलेचे असावे असा संशय आला होता, परंतु गावात कुणीच महिला गर्भवती नसल्याने ते अर्भक अन्य गावातील महिलेचा असावा असा संशय निर्माण केल्या जात आहे. कुणातरी बाहेरील व्यक्तींनी नवजात अर्भक रात्रीच नालीत आणुन टाकले असावे, अशीही चर्चा आहे. आढळून आलेले अर्भक ही बालिका असल्यामुळे तिला उघड्यावर फेकण्यात आले असावे, अशीही शंका व्यक्त केली आहे आहे.
तुमचे आरोग्य, आमची जबाबदारी
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Travel
सुपर फास्ट बातमी
International
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Food
सुपर फास्ट बातमी
Politics
Vaingangavarta19
Crime
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Politics
No Comments