नेरलवार लाकडी तेल घाणी, गडचिरोली
तुमचे आरोग्य, आमची जबाबदारी
F
02-12-2023
ऋषी सहारे
My खबर 24
आरमोरी - तालुक्यातील पळसगाव-जोगिसाखरा परिसरातील विद्यार्थी तालुक्यातील शाळेत शिक्षण घेण्यासाठी व विविध कारणाने मुख्यालयाला जातात. सकाळी 6.45 जाणे व परत तालुक्यातून 11.00 वाजता येणे अशी फेरी,तसेच 10.00 वाजता जाणे व 5.00 वाजता परत येणे.
अश्या फेऱ्या सुरू होणे अती आवश्यक आहे. ही फेरी जोगिसाखरा - शंकरनगर - पाथरगोटा - पळसगाव - जोगिसाखरा - रामपूर(नदीधाट)अशी असावी.
कारण या परिसरात हिस्त्र श्वापदे , वाघ, हत्ती, रानडुकरे यांचा वावर अती असल्याने त्यापासून जीवित किवा वित्त हानी नेहमी होत असते. वारंवार अश्या घटना पासून बचाव होण्यासाठी ह्या परिसरात बस सेवा सुरू व्हावी अशी मागणी परिसरातील नागरिक, विद्यार्थी व त्यांच्या पालकांनी केली आहे यासंदर्भात लेखी निवेदन ही सादर करण्यात आले आहे. माज केंद्रप्रमुख शालिक् मेश्राम, समाजसेवक विनोद पागडे, प्रा. गोपाल दोनाडकर , सामाजिक कार्यकर्ते पुरशोत्तम मैद,देविदास दोनाडकर, अशोक लोखंडे इत्यादी मान्यवरांनी निवेदन दिले.
परिसरातील विद्यार्थी, पालक, जनता यांना सुखरूप प्रवास करता येईल व जीवित हानी ही होणार नाही , प्रवासाची सोय व्हावी अशी अपेक्षा ही व्यक्त केली आहे.
तुमचे आरोग्य, आमची जबाबदारी
Vaingangavarta19
Local News
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
विदर्भ फायर न्यूज
Crime
Vaingangavarta19
Local News
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Education
Vaingangavarta19
Local News
Vaingangavarta19
Health
No Comments