RUBY ENTERPRISES
Electrical sales and services
सर्व इलेकट्रीकल्स वस्तू एकाच ठिकाणी..
सर्वोच दर्जाचे.. कमी किमतीत
24-10-2023
नगिनाबाग प्रभागात राहणारे 52 वर्षीय नीलकंठ चौधरी असे मृतकाचे नाव आहे, आरोपी मध्ये मृतकाची पत्नी, मुलगी व मेव्हण्याचा समावेश आहे.
विजयादशमी ला सकाळी 8 वाजता मंगला चौधरी यांना भेटण्यासाठी त्यांचा भाऊ विलास लटारु शेंडे रा. सुशी दाबगाव तालुका मूल वरून आला होता, घरी आल्यावर नीलकंठ चौधरी यांनी विलास ला अश्लील शब्दात शिवीगाळी करीत भांडण सुरू केले, वाद वाढत गेला, वादाचे रूपांतर हाणामारीत झाले.
त्यावेळी मुलगी शिल्पा ने लोखंडी रॉड व मंगला यांनी बांबू ने नीलकंठ यांच्या डोक्यावर वार केला, ही नेहमीची कटकट आहे, याला मारून टाका असे उदगार विलास ने काढले असता नीलकंठ चा जबर मारहाणीत मृत्यू झाला.
याबाबत रामनगर पोलिसांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत आरोपीला अटक केली.
यावेळी तपास अधिकारी स्वप्नील गोपाले यांच्या माहिती वरुन मृतक नीलकंठ मजुरीचे काम करायचा, त्याला दारूचे व्यसन असल्याने तो नेहमी कुटुंबासोबत भांडण व पत्नी मंगला ला मारहाण करायचा, पत्नी कडील नातेवाईक घरी आले की त्यांना नीलकंठ हाकलून लावायचा, या नित्याच्या त्रासाला कंटाळून पत्नी, मुलगी व मेव्हण्याने नीलकंठ ची हत्या केली.
याबाबत तिघांवर कलम 302 अंतर्गत गुन्हा दाखल करीत अटक करण्यात आली असून पुढील तपास रामनगर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक स्वप्नील गोपाले करीत आहे.
Electrical sales and services
सर्व इलेकट्रीकल्स वस्तू एकाच ठिकाणी..
सर्वोच दर्जाचे.. कमी किमतीत
सुपर फास्ट बातमी
National
Vaingangavarta19
Local News
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Local News
Vaingangavarta19
Crime
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Local News
No Comments