STUDY POINT INSTITUTE
आमच्या सोबत द्या, आपल्या स्वप्नांना आकार ...
F
24-10-2023
गडचिरोली जिल्हयामध्ये दारू बंदी असताना काही इसम अवैध्य रित्या दारू विकतात त्यांचे वर अंकुश लावण्या करिता पोलीस कारवाई करीत असतात. खात्रीशीर बातमीदाराकडून दुचाकी वाहनाने एक इसम लाखांदुर येथून देसाईगंज - करखेडा मार्गे छत्तीसगड येथे अवैधरित्या विदेशी दारूची वाहतुक करणार आहे, अशी खात्रीशिर माहीती मिळाल्याने पोलीस निरीक्षक रासकर पोलीस स्टेशन देसाईगंज यांचे मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर धनगर, पोलीस अंमलदार दिनेश राऊत, विलेश ढोके, संतोष सराटे, नरेश कुमोटी यांनी सापळा रचून इसम नामे अश्विन भागवत मेंडे वय २३ वर्षे रा. आंबेडकर वार्ड, देसाईगंज ता. देसाईगंज जि. गडचिरोली यास पकडले व त्यांचे ताब्यातून १ ) अॅक्टीव्हा निळया रंगाची दुचाकी वाहन क्र. एम एच ३३ यु ४७५६ किं. अं ७००००/- रु. २) रॉयल स्टॅग कंपनीचे डिलक्स व्हिस्की १८० मि.ली. मापाच्या दोन खरड्या रंगाचे बॉक्स ९६ नग सिलबंद निपा किं.अं. २८,८००/-रु. असा एकुण ९८,८००/- रू किंमतीचा माल जप्त करून सदर आरोपीवर पो.स्टे. देसाईगंज येथे गुन्हा दाखल करण्यात आला. सदर कारवाई पोलीस अधीक्षक निलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) कुमार चिंता, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) अनुज तारे, उपविभागीय पोलीस अधिकारी साहील झरकर, यांचे मार्गदर्शनात पोस्टे देसाईगंज येथील पोलीस निरीक्षक किरण रासकर यांच्या नेतृत्वाखाली पोउपनि ज्ञानेश्वर धनगर, पोलीस अंमलदार दिनेश राऊत, संतोष सराटे, विलेश ढोके, नरेश कुमोटी यांनी केली आहे. सदर गुन्हयाचा पुढील तपास पोलीस अंमलदार दिनेश राऊत हे करित आहेत.
आमच्या सोबत द्या, आपल्या स्वप्नांना आकार ...
विदर्भ फायर न्यूज
Politics
विदर्भ फायर न्यूज
Travel
विदर्भ फायर न्यूज
International
विदर्भ फायर न्यूज
Crime
विदर्भ फायर न्यूज
Politics
विदर्भ फायर न्यूज
Food
विदर्भ फायर न्यूज
Politics
Vaingangavarta19
Crime
विदर्भ फायर न्यूज
Crime
विदर्भ फायर न्यूज
Politics
No Comments