समाधान आयुर्वेदिक दवखाना
आपल्या समस्यांचे समाधान हेच आमचे ध्येय
27-10-2023
गडचिरोली -. जिवंत विद्युत तारेच्या स्पर्शाने वाघाची शिकार केल्याची घटना गडचिरोली वनविभागाअंतर्गत येणाऱ्या चातगाव वनपरिक्षेत्रातील मिर्झा बिटात मंगळवारी (ता. 24 ) उघडकीस आली होती. या घटनेने वनविभागासह संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली होती. विशेष म्हणजे, शिकार केलेल्या वाघाचे डोके व तीन पंजे गायब होते. त्यामुळे या प्रकरणाचा वनविभागाकडून गांभीर्याने तपास सुरू करण्यात आला. दरम्यान, याप्रकरणी गुरुवारी वनविभागाने 6 शिकारींना अटक केली आहे.
अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये प्रमोद मनोहर मडावी (29, मरेगाव टोली, ता. धानोरा), सुनील उसेंडी (28), दिलीप उसेंडी ( 28 ), प्रकाश हलामी ( 42 ), चेतन आलम ( 25 ) आणि निलेश्वर (रा. मोहटोला ) यांचा समावेश आहे. याप्रकरणाचा पुढील तपास गडचिरोली शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक वनविभागाचे उप वनसंरक्षक मिलिश दत्त, वनरक्षक संकेत वाठोरे करीत आहेत.
विजेचा धक्का देऊन वाघाची शिकार केल्यानंतर आरोपींनी वाघाचे डोके व तीन पंजे कापून घेऊन गेले होते. वनविभागाने या प्रकरणाचा गांभीर्याने तपास करून 6 आरोपींना अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून मृत वाघाचे पंजे, नखे आणि दातांसह शिकारीसाठी वापरले जाणारे साहित्य जप्त करण्यात आले आहे. मात्र अद्यापपर्यंत वाघाचे शीर सापडले नसल्याची माहिती समोर येत आहे...
शुक्रवारी करणार न्यायालयात हजर
वाघाची शिकार करून डोके व पंजे कापण्यात आल्याप्रकरणी वनविभागाने गुरुवारी 6 आरोपींना अटक केली. अटक केलेल्या सर्व आरोपींना शुक्रवारी न्यायालयात हजर केले जाणार आहे. या संदर्भात अजून आरोपी संख्या वाढेल की काय हे सांगता येत नाही.- मिलिष शर्मा वन संरक्षक गडचिरोली
आपल्या समस्यांचे समाधान हेच आमचे ध्येय
सुपर फास्ट बातमी
National
Vaingangavarta19
Local News
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Local News
Vaingangavarta19
Crime
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Local News
No Comments