आयुर्वेदिक पंचकर्म मल्टीस्पेशलिटी क्लिनिक
काय तुम्ही सुद्धा,उपचार करून त्रस्त झालेले आहेत, तर आम्हाला भेट द्या
F
23-11-2023
व्हॅलीबाल स्पर्धेत जोगीसाखरा तर कबड्डी स्पर्धेत आरमोरी प्रथम
आरमोरी- गडचिरोली जिल्हा पोलीस दल पोलीस दादालोरा खिडकीचे माध्यमातून पोलीस स्टेशन आरमोरीचे वतीने पोलीस स्टेशनच्या प्रांगणात भव्य बिरसा मुंडा व्हॉलीबॉल व वीर बाबुराव शेडमाके कबड्डी स्पर्धा घेण्यात आली. कार्यक्रमाचे उदघाटक डोंगरतमाशीचे पोलीस पाटील गणेश वनवे होते तर अध्यक्षस्थानी आरमोरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदीप मंडलिक ,प्रमुख मार्गदर्शक पोलीस उपनिरीक्षक संजय कुमार टेकाम, पोलीस उपनिरीक्षक विजय चलाख, पोलीस उपनिरीक्षक संतोष कडाळे, पोलीस उपनिरीक्षक दिलीप मुंनघाटे आदी मान्यवर उपस्थित होते.
सर्वप्रथम आरमोरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांच्या हस्ते मान्यवरांच्या उपस्थितीत व्हॉलीबॉल व कबड्डी सामन्यांचे लाल फीत काटून उदघाटन करण्यात आले.
उद्घाटन प्रसंगी बोलताना पोलीस निरीक्षक संदीप मंडलिक म्हणाले की, पोलीस दादाला खिडकीच्या माध्यमातून लाभार्थ्यांनी केंद्र व राज्य शासनाच्या विविध उपयोगी योजनांचा लाभ घ्यावा तसेच मैदानी'खेळाच्या माध्यमातून संघ भावना वाढते एकमेकांविषयी आदर निर्माण होतो. बंधूभाव वाढतो. त्याप्रमाणे सर्वाधिक नेतृत्व गुण खेळाच्या व स्पर्धेच्या माध्यमातून विकसित होतअसतात. त्यामुळे व्यक्तिमत्त्वाचा विकास करायचा असेल तर खेळ हे अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावत असतात.त्यामुळे खेळाडूंमध्ये खेळांच्या माध्यमातून, स्पर्धांच्या माध्यमातून एकमेकांविषयी आदर भावना तयार होते, बंधुभाव तयार होतो व नेतृत्वगुणही वाढीस लागत असतात. खेळ हे मानवाला तनावातून मुक्त करण्याचे काम करत असतात, असेही मंडलिक म्हणाले
दादालोरा खिडकीच्या माध्यमातून व्हालीबाल व कबड्डी सामने खेळविण्यात आले. यात व्हॉलीबॉल च्या आठ तर कबड्डीच्या १२ संघांनी तालुक्यातून सहभाग नोंदविला होता व्हॉलीबॉल स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक छत्रपती शिवाजी महाराज जोगीसाखरा, द्वितीय प्रगती स्पोर्ट्स क्लब मोहझरी तर तृतीय क्रमांक एस.टी बाईज होस्टेल आरमोरी यांनी पटकाविला तर कबड्डी सामन्यात प्रथम क्रमांक शौर्य क्लब आरमोरी , द्वितीय पार्क कबड्डी क्लब सायगाव तर तृतीय शिवशक्ती कबड्डी क्लब पालोरा संघाने क्रमांक पटकाविला. प्रथम,द्वितीय व तृतीय क्रमांक पटकाविणाऱ्या व्हॅलीबाल व कबड्डी संघाला प्रत्येकी ३०००,२०००व १००० रुपयांचे पारितोषिक पोलीस निरीक्षक व मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.
कार्यक्रमाचे संचालन व आभार पो.हवा. अशोक ठाकरे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आरमोरी पोलीस स्टेशनच्या सर्व कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.
काय तुम्ही सुद्धा,उपचार करून त्रस्त झालेले आहेत, तर आम्हाला भेट द्या
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Travel
सुपर फास्ट बातमी
International
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Food
सुपर फास्ट बातमी
Politics
Vaingangavarta19
Crime
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Politics
No Comments