निर्मल ऑटोमोबाईल
फोर व्हीलर गाड्यांचे स्पेअर पार्ट मिळण्याचे एकमेव ठिकाण
F
27-10-2023
गडचिरोली, दि. २७ : जिल्हयातील राष्ट्रीय अन्नसुरक्षा अधिनियम, २०१३ अंतर्गत माहे नोव्हेंबर, २०२३ या महिन्याकरीता अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटूंबातील पात्र लाभार्थ्यांना गहू, तांदूळ, साखर व शिधासंच यांचे नियतन व वाटप परिमाण खालील प्रमाणे निश्चित केले आहे.
अंत्योदय अन्न योजनेअंतर्गत प्रती शिधापत्रिका 25 किलो तांदुळ रुपये 3 प्रति किलो प्रमाणे, गहू 10 किलो 2 रुपये प्रति किलो प्रमाणे, तर 1 किलो साखर 20 रुपये प्रति किलो प्रमाणे. शिधाजिन्नस संच प्रतिसंच रुपये १००/- तर प्राधान्य कुटुंब लाभार्थी यांना प्रती व्यक्ती 3 किलो तांदुळ 3 रुपये प्रति किलो प्रमाणे, 2 किलो गहू 2 रुपये प्रति किलो प्रमाणे. व शिधाजिन्नस संच प्रतिसंच रुपये १००/-.
राष्ट्रीय अन्नसुरक्षा अधिनियम २०१३ अंतर्गत दिनांक ०१ जानेवारी, २०२३ ते ३१.१२.२०२३ पर्यंत एक वर्षाच्या कालावधीकरीता पात्र लाभार्थ्यांना रु.३/- प्रतिकिलो तांदूळ, रु. २/- प्रतिकिलो गहू व रु.१/- प्रतिकिलो भरडधान्य या दराने अनुज्ञेय असलेले अन्नधान्य पात्र लाभार्थ्यांना "मोफत वितरीत करावयाचे शासन निर्देश प्राप्त आहे.
तसेच शासन पत्र दिनांक १९.१०.२०२३ अन्वये जिल्हयातील रास्तभाव दुकानामर्फतीने सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत अंत्योदय अन्नयोजनेतील व प्राधान्य कुटुंब लाभार्थी योजनेतील पात्र शिधापत्रिकाधारकांना अगामी दिवाळी सणानिमित्त ६ शिधान्निस "आनंदाचा शिधा प्रतिशिधापत्रिका १ शिधासंच (१ किलो साखर, १ लिटर खाद्यतेल व प्रत्येकी अर्धा किलो या परिमाणात रवा, चनाडाळ, मैदा व पोहे) या ६ शिधाजिन्नस समाविष्ट असलेला शिधाजिन्नसंचाचे माहे नोव्हेंबर २०२३ या महिन्याकरीता ई पॉस प्रणालीव्दारे रु.१००/- प्रतिसंच या सवलतीच्या दराने वाटप करण्यात येत आहे.
तरी सर्व पात्र शिधापत्रिकाधारकांना सुचित करण्यात येते की, त्यांना नेमून दिलेल्या रास्तभाव धान्यदुकानात जावून आपले शिधापत्रिकेवर राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेतील माहे नोव्हेंबर, २०२३ या महिन्यातील नियमित देय असलेल्या धान्याची (गहू व तांदूळ) मोफत उचल करावी. व धान्य घेतेवेळी POS मशीन मधून निघणारी पावती रास्तभाव दुकानदाराकडून घ्यावी व सोबतच नियमित अन्नधान्याव्यतिरिक्त प्रतिशिधापत्रिका १ "आनंदाचा शिधा" रु.१००/- प्रतिसंच ची उचल करावी. दुकानांत एकाच वेळी गर्दी न करता सामाजिक अंतराचे पालन करावे. असे जिल्हा पुरवठा अधिकारी, गडचिरोली यांनी कळविले आहे.
फोर व्हीलर गाड्यांचे स्पेअर पार्ट मिळण्याचे एकमेव ठिकाण
विदर्भ फायर न्यूज
Politics
विदर्भ फायर न्यूज
Travel
विदर्भ फायर न्यूज
International
विदर्भ फायर न्यूज
Crime
विदर्भ फायर न्यूज
Politics
विदर्भ फायर न्यूज
Food
विदर्भ फायर न्यूज
Politics
Vaingangavarta19
Crime
विदर्भ फायर न्यूज
Crime
विदर्भ फायर न्यूज
Politics
No Comments