बॉम्बे मोटर्स अँड कार सर्व्हिस सेंटर गडचिरोली
Your car is our responsibility
F
10-11-2023
देसाईगंज : देशाच्या स्वतंत्र्याच्या वेळी हिन्दुस्थान चे विभाजन होऊन पाकिस्तान ची निर्मीती झाली त्यावेस पश्चिम पाकिस्तानातील सिंध प्रांतातील हिंदू बांधव विस्थापित होऊन भारतात आले. त्यांना देशातील अनेक प्रांतामध्ये घरासाठी व दुकानासाठी जागा व काही मदत शासन तर्फे देण्यांत आली. परंतु अद्याप पर्यंत त्यांना देण्यांत आलेल्या भूखंडाचे मालकीहक्क शासकीय उदासिनतेमुळे सिंधी बांधवांना मिळालेले नाही. 75 वर्षाच्या कालावधी नंतर विस्थापितांचे प्रमाणपत्र इ. ची मागणी शासना द्वारे करण्यांत येत होती. गडचिरोली जिल्ह्यातील देसाईगंज येथील सिंधी कॉलोनी त्या पैकी एक वसाहत आहे. सदर प्रकर्णी आमदार कृष्णा गजबे यांनी पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री नामदार देवेंद्र फडणवीस यांना सदर प्रकरणी शासन स्तरावर बैठक घेवून सिंधी समाजाला न्याय देण्यांची मागणी केली त्यावर त्यांनी नामदार राधाकृष्ण विखे पाटील, महसुल मंत्री यांना तात्काळ बैठक घेण्यांचा सूचना दिल्या होत्या.
त्यानुसार दि. 7/11/2023 ला मंत्री (महसूल) यांचे दालनात आमदार कृष्णा गजबे, विक्की कुकरेजा, माजी स्थायी समीती सभापती, नागपूर महानगरपालिका, किशन नागदेवे माजी नगराध्यक्ष देसाईगंज, लोकसभा निवडणूक प्रमुख तथा माजी जिल्हाध्यक्ष भाजपा, मोतीलाल कुकरेजा माजी उपाध्यक्ष, देसाईगंज, लक्ष्मण रामानी, प्रेम वसंतानी माजी नगराध्यक्ष, हिंगणघाट, रामकुमार हरमानी नागपूर इ. यांचे सह प्रधान सचिव, महसूल, जिल्हाधिकारी, गडचिरोली व नागपूर इ. सह बैठक घेतली.
बैठकीत लवकरच जरीपटका येथील विस्तापितांचे जमीनीचे मालकी हक्का संबंधात झालेले शासन निर्णय व त्यातील अडचणी दूर करून संपूर्ण महाराष्ट्रातील विस्थापित सिंधी बांधवांचे जमीनीचे मालकी हक्क तात्काळ देण्यासंबंधी लवकर शासन निर्णय घेण्याचे आश्वासन शिष्ट मंडळाला दिले आहे.
शिष्ट मंडाळाचे नामदार देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री यांची सुध्दा भेट घेवून त्यांचे सहकार्याबद्दल त्यांचे आभार मानले. त्यांनी सुद्धा तात्काळ शासन निर्णय घेवून सर्व सिंधी बांधवांचे फाळणीचे वेळी त्यांना दिलेले सर्व भुखंडाचे मालकी हक्क लवकरात लवकर त्यांना देण्यांत येतील असे आश्वासन दिले आहे.
नामदार देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री, ना. राधाकृष्ण विखे पाटील, आमदार कृष्णा गजबे यांनी सिंधी समाजाचे प्रमुख समस्या मार्गी लावण्यासाठी केलेल्या सहकार्या बद्दल सिंधी समाजाने त्यांचे आभार मानले आहे.
Your car is our responsibility
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Travel
सुपर फास्ट बातमी
International
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Food
सुपर फास्ट बातमी
Politics
Vaingangavarta19
Crime
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Politics
No Comments