नेरलवार लाकडी तेल घाणी, गडचिरोली
तुमचे आरोग्य, आमची जबाबदारी
F
25-10-2023
गडचिरोली, दि. २५ : केंद्रीय युवक कल्याण व क्रीडा मंत्रालय यांच्या वतीने शालेय विद्यार्थांसाठी क्रीडा विषयक सामान्य ज्ञान चाचणीचे आयोजन सन २०१९ पासून करण्यात येत आहे. सन २०२२ मध्ये Fit India Quiz २ चे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांना खेळण्याविषयक असलेले ज्ञान, कौशल्य इ. साठी व्यासपीठ उपलब्ध करुन देणे. भारतीय खेळांचा समृद्ध इतिहास स्थानिक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय खेळ भारतीय खेळाडू इ. बाबत विद्यार्थांमध्ये जाणीव जागृती निर्माण करणे हा या चाचणीचा प्रमुख उद्देश असून यामध्ये रु. ३.२५ कोटींच्या बक्षीसांचे विद्यार्थी व शाळांना वाटप करण्यात आले.
याप्रमाणेच केंद्रीय युवक कल्याण व क्रीडा मंत्रालय यांच्या वतीने शालेय विद्यार्थांसाठी क्रीडा विषयक सामान्य ज्ञान चाचणीचे Quiz ३ चे आयोजन करण्यात येत आहे. बक्षीसाची रक्कम मागील वर्षासारखीच आहे. पुर्ण भारतभर यासाठी विद्यार्थांची नोंदणी ५ सप्टेंबर, २०२३ पासून सुरु झाली आहे आणि ५ ऑक्टोंबर २०२३ ही नोंदणी करण्यासाठीची शेवटची तारीख होती. परंतु जास्तीत जास्त सहभागाकरीता नोंदणी करण्याच्या अंतिम तारीख दि. ३१ ऑक्टोंबर, २०२३ ही तारीख करण्यात आलेली आहे. सर्व शाळा व विद्यार्थी https://fitindia.nta.ac.in/ या कार्यालयीन वेबसाईटवर त्यांच्या विद्यार्थांची नोंदणी करु शकतात.
उपरोक्त प्रश्नमंजुशामध्ये जास्तीत जास्त विद्यार्थी व शाळा यांनी सहभाग नोंदवावा असे जिल्हा क्रीडा अधिकारी प्रशांत दोंदल हे आवाहन करीत आहेत.
तुमचे आरोग्य, आमची जबाबदारी
विदर्भ फायर न्यूज
Politics
विदर्भ फायर न्यूज
Travel
विदर्भ फायर न्यूज
International
विदर्भ फायर न्यूज
Crime
विदर्भ फायर न्यूज
Politics
विदर्भ फायर न्यूज
Food
विदर्भ फायर न्यूज
Politics
Vaingangavarta19
Crime
विदर्भ फायर न्यूज
Crime
विदर्भ फायर न्यूज
Politics
No Comments