संकेत मोटर्स, गडचिरोली
गडचिरोली शहरात, प्रथमच आपल्या सेवेत...
F
29-11-2023
गडचिरोली : विकासाच्या नावावर गडचिरोली जिल्ह्यातील हजारो एकरवरील जंगलतोड करुन पाचव्या अनुसूची क्षेत्रातील विशेष तरतुदी आणि कायदे, नियम धाब्यावर बसवून बेकायदेशीरपणे मंजूर आणि प्रस्तावित लोह खाणी आणि अन्याय अत्याचाराच्या विरोधात हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर ९ डिसेंबर रोजी गडचिरोली जिल्हाधिकारी कार्यालयावर प्रागतिक पक्ष, महाराष्ट्र च्या वतीने उलगुलान महामोर्चा काढण्यात येणार असून या महामोर्चात जिल्ह्यातील आदिवासींसह गैरआदिवासी जनतेने मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन प्रागतिक पक्षांनी केले आहे.
गैरआदिवासी, ओबीसीच्या १९ टक्के आरक्षणाला आदिवासी समाजाने कधीच विरोध केलेला नसतांना भाजपने पेसा कायदा विरोधी वातावरण जिल्ह्यात निर्माण करुन वेळोवेळी समाजात तेढ निर्माण केली आणि बेकायदेशीर खाणींचे रोजगाराच्या नावावर समर्थन करुन जिल्ह्याला उध्दवस्त करण्याचे षडयंत्र रचले असून हे सर्व प्रयत्न हाणून पाडण्यासाठी हा महामोर्चा काढण्यात येणार आहे. आदिवासी समाजाच्या खांद्याला खांदा लावून दलित, ओबीसी, भटके विमुक्त आणि जिल्ह्यातील संपूर्ण ग्रामसभा मोठ्या संख्येने सहभागी होणार असून या महामोर्चाचे नेतृत्व शेतकरी कामगार पक्षाचे आमदार भाई जयंत पाटील, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे पाॅलिट ब्युरो सदस्य काॅ. अशोक ढवळे, भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राष्ट्रीय सचिव काॅ. डॉ.भालचंद्र कांगो, राज्य सचिव काॅ. ॲड. सुभाष लांडे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी, समाजवादी पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आमदार अबू आझमी, बीआरएसपीचे संस्थापक अध्यक्ष डॉ. सुरेश माने, अखिल भारतीय रिपब्लिकन पक्षाचे केंद्रीय अध्यक्ष बाळासाहेब खोब्रागडे, गोंडवाना गणतंत्र पार्टी चे प्रदेशाध्यक्ष हरिषदादा उईके हे करणार आहेत. आमदार शामसुंदर शिंदे, आमदार काॅ. विनोद निकोले, आमदार हितेंद्र ठाकूर, आमदार क्षितीज ठाकूर, आमदार देवेंद्र भुयार यांचेसह जनता दल (सेक्युलर) चे नाथाभाऊ शेवाळे, शामदादा गायकवाड, भाकपा ( माले) लिबरेशन पार्टीचे काॅ. श्याम गोहील, श्रमिक मुक्ती दलाचे काॅ. भारत पाटणकर, सत्यशोधक कम्युनिस्ट पक्षाचे काॅ. किशोर ढमाले हे प्रामुख्याने या महामोर्चात सहभागी होणार आहेत.
*या आहेत महामोर्चाच्या प्रमुख मागण्या*
पेसा, वनाधिकार कायद्यांचा उल्लंघन करून बळजबरीने खोदण्यात येत असलेल्या सुरजागड, झेंडेपारसह मंजूर व प्रस्तावित लोहखाणी तात्काळ रद्द करा. पाचव्या अनुसूची क्षेत्रातील ग्रामसभांचे स्वयंशासनाचे अधिकार डावलणे बंद करण्यात यावे. बेकायदेशीर लोहखाणी खोदण्याकरिता विरोध करणाऱ्या ग्रामसभांच्या नागरिकांना नक्षल समर्थक भावनेने कारवाई करणे बंद करण्यात यावी. मच्छीमार समाजाला नदी, नाले, तलावांची मालकी हक्क देण्यात यावे. जिल्ह्यातील ओबीसीचे आरक्षण पूर्ववत १९% करा. आदिवासींची डी लिस्टिंग करण्यात येऊ नये. धानाला रुपये ३,५००/- हमीभाव देण्यात यावा. प्रलंबित वनहक्क दावे तातडीने मंजूर करण्यात यावेत. यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजने करीता जात प्रमाणपत्राची अट रद्द करण्यात यावी. राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कार्यरत कर्मचाऱ्यांना सेवेत नियमित करण्यात यावे. अंगणवाडी सेविका, आशा वर्कर यांना किमान वेतन लागू करावे. हत्ती व वाघांच्या हल्ल्यात बळी पडून मृत्यू झालेल्यांना आणि पिकांच्या नुकसानीची भरपाई रक्कम तातडीने देण्यात यावी. व जंगली प्राण्यांचा बंदोबस्त तातडीने करण्यात यावा. भेंडाळा परिसरासह जिल्ह्यातील शेतकऱ्यांना शेतीसाठी दिवसा आणि बारमाही वीजपुरवठा करण्यात यावा. गडचिरोली शहरातील सर्व झोपडपट्टी कायम करुन जागेचे प्राॅपर्टी कार्ड आणि घरकुलांचा तातडीने लाभ देण्यात यावा, जातिनिहाय जनगणना करण्यात यावी, या प्रमुख मागण्यांसाठी हा उलगुलान महामोर्चा काढण्यात येणार आहे.
पत्रकार परिषदेला शेतकरी कामगार पक्षाचे नेते भाई रामदास जराते, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे राज्य कार्यकारिणी सदस्य काॅ. महेश कोपूलवार, अखिल भारतीय रिपब्लिकन पक्षाचे केंद्रीय उपाध्यक्ष रोहिदास राऊत, बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पक्षाचे जिल्हा प्रभारी राज बन्सोड, जिल्हाध्यक्ष मिलिंद बांबोळे, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हा सचिव काॅ. अमोल मारकवार, समाजवादी पार्टीचे जिल्हाध्यक्ष ईलियास पठाण, गोंडवाना गणतंत्र पार्टी चे जिल्हाध्यक्ष प्रशांत मडावी, आदिवासी विकास युवा परिषदेचे जिल्हाध्यक्ष कुणाल कोवे, विनोद मडावी, भाकपचे जिल्हा सचिव काॅ. देवराव चवळे, भाई शामसुंदर उराडे, जयश्रीताई वेळदा, तितिक्षा डोईजड,भाई अक्षय कोसनकर, हंसराज उंदिरवाडे, अशोक खोब्रागडे, हेमंत डोर्लीकर, भाकपचे संजय वाकडे, प्रकाश खोब्रागडे, प्रतीक डांगे, विजय देवतळे, कैलास रामटेके, सतिश दुर्गमवार, प्रामुख्याने उपस्थित होते.
गडचिरोली शहरात, प्रथमच आपल्या सेवेत...
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Travel
सुपर फास्ट बातमी
International
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Food
सुपर फास्ट बातमी
Politics
Vaingangavarta19
Crime
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Politics
No Comments