बॉम्बे मोटर्स अँड कार सर्व्हिस सेंटर गडचिरोली
Your car is our responsibility
F
12-03-2024
आगामी सार्वत्रीक लोकसभा निवडणुक २०२४ च्या अनुषंगाने पोलीस अधिक्षक नीलोत्पाल गडचिरोली यांनी संपूर्ण जिल्ह्यातील पोलीस स्टेशन / उप.पोस्टे / पोमके यांना महाराष्ट्र राज्याने प्रतिबंधित केलेल्या सुगंधित तंबाखुची अवैध्यरित्या वाहतुक करणा-यांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले. त्या निर्देशानुसार दिनांक ११/०३/२०२४ रोजी अवैध्यरित्या प्रतिबंधित सुगंधित तंबाखुची वाहतुक होणार आहे. अशी खबर पोशि/ ३७५५ शैलेश तोरपरकवार व व पोशि ५५३८ ढोके पोस्टे देसाईगंज यांना मिळाल्याने पोलीस निरीक्षक जगताप पोलीस स्टेशन देसाईगंज यांचे मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर धनगर, पोलीस अमलदार विलेश ढोके, शैलेश तोरपकवार असे सापळा रचुन इसम नामे अतुल पुंडलीकराव ठाकरे वय ४० वर्ष रा. हनुमान वार्ड साई मंदीर जवळ, देसाईगंज, जि. गडचिरोली यास पकडले व त्याचे ताब्यातुन १) ०४ नग पांढ-या रंगाच्या चुंगळ्या प्रत्येकी १० पॅकेट असे एकूण ४०० ग्रॅम वजनाचे ४० नग पॅकेट त्यावर ईगल हुक्का शिशा तंबाखु असे लिहीलेल्या प्रत्येक पॅकेटची किंमत ६४० रुपये असे एकुण रुपये २५.६००/- रुपये. २) ०८ नग पिवळ्या रंगाच्या चुंगळ्या मध्ये प्रत्येकी ०५ नगाचे एक बंच पॅकेट असे एकूण २०० ग्रॅम वजनाचे ४०० पॅकेट ज्यावर होला हुक्का शिशा तंबाखु असे लिहीलेल्या प्रत्येक पॅकेटची किंमत १६० रुपये असे एकुण रुपये ६४०००/- रुपये. २) एक जुनी वापरती सिमेंट रंगाची Maruti Suzuki Alto कंपनीची वाहन क्र. MH - ०२ - BY- १४८९ असे असलेले चारचाकी वाहन किंमत अंदाजे १,००,०००/- रुपये असा एकुण् १.८९.६००/- रुपये किमतीचा माल मिळुन आल्याने वरील नमुद माल जप्त करुन सदर बावत अन्न सुरक्षा अधिकारी अन्न व औषध प्रशासन गडचिरोली यांना माहिती दिली असुन त्यांचे फिर्यादीवरुन पुढील कारवाई करीत आहोत.
सदर कारवाई पोलीस अधिक्षक नीलोत्पाल, अप्पर पोलीस अधिक्षक कुमार चिंथा . उपविभागीय पोलीस अधिकारी भोसले यांचे मार्गदर्शनात पोलीस स्टेशन देसाईगंज येथील पोलीस निरीक्षक अजय जगताप यांच्या नेतृत्त्वाखाली पोउपनि ज्ञानेश्वर धनगर, पोलीस अमलदार शैलेश तोरपकवार, विलेश ढोके यांनी केली आहे.
Your car is our responsibility
Vaingangavarta19
Local News
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
विदर्भ फायर न्यूज
Crime
Vaingangavarta19
Local News
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
No Comments