ड्रिमलँड डेव्हलपर्स
आपल्या स्वप्नातलं घर, निसर्गाच्या सानिध्यात..
तुमचे स्वप्न आमची जबाबदारी...
F
29-10-2023
गडचिरोली - वर्षावास समापण सोहळा केरोडा येथे संपन्न . केरोडा ह्या गावाचा एक इतिहास आहे. जवळच्या जाम गावात बौद्ध बांधवांच्या लोकवर्गणीतून डॉ. बाबासाहेब आंबेडकराचा पुतळा उभारला परंतु आमचे बौध्द बांधव मात्र भाजप _ कांग्रेस च्या नेत्याकइन देणगी घेऊन किवा बुद्ध मुर्ती दानात घेऊन विहार बांधतात यातच आमचा स्वाभिमान विकल्या जातो. आपल्या कष्टातुन विहार बांधला त्या विहारात खरे धम्माचे कार्य होते. अश्या प्रकारचे मोलाचे मार्गदर्शन रिपब्लिकन पार्टी चे जेष्ठ नेते मनोहर गेडाम यांनी केरोडा येथील वर्षावास समापण सोहळ्या प्रसंगी केले. वर्षावास समापण सोहळ्याच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष मुकुंदा मेश्राम तर प्रमुख मार्गदर्शक म्हणुन अभारिप चे प्रदेश उपाध्यक्ष रोहिदास राऊत' रिपाईचे चंद्रपूर जिल्हाध्यक्ष गोपाल रायपुरे, संविधान बचाव समितीचे अध्यक्ष काकासाहेब खंबाळकर ,रिपब्लिकन पार्टी जिल्हा गडचिरोली चे अध्यक्ष प्रा. मुनिश्वर बोरकर , शेडयुल कॉस्ट फेडरेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष अँड . विनय बांबोळे , सामाजीक कार्यकर्ते नरेंद्र पाटिल , उदय गडकरी , किशोर उंदिरवाडे , प्रदिप भैसारे , आदि उपस्थित होते. याप्रसंगी जेष्ठ पत्रकार रोहिदास राऊत म्हणाले की , आपण बहुजनांनी बौद्ध धम्म स्विकारला म्हणुन आपण एकत्र येवून आपली शक्ती दाखवित आहात. म्हणुन आज आपण शुट बुटात गाड्या घेऊन फिरतो हे केवळ बौद्ध धम्म स्विकारल्या मुळेच. याप्रसंगी प्रा. मुनिश्वर बोरकर म्हणाले की, आषाढी पौणीमा ते वैशाखी पौणीमा ह्या तिन महिण्याचा कार्यकाळ संपून आज आपण वर्षावास सोहळा करीत आहोत. आजच्या दिवशी भन्तेना कठीण चीवरदान देवून भन्ते नी आजपासुन बौद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार करावा. उपाषकांनी विहारात जावून धम्म ऐकावे. परंतु कोठरीचे भन्ते भगीरथ वर्षावास न करता महुला जातात. असेही काही भन्ते आहेत. अश्या व्यक्ती पासुन आपण सावध राहिले पाहिजे. याप्रसंगी गोपाल रायपूरे , अँड ' विनय बाबोळे , भारतीय बौद्ध महासभेचे नरेंद्र पाटिल यांचेही बौध्द धम्मा बाबत विश्रृत मार्गदर्शन केले. वर्षावास समापण सोहळ्याच्या कार्यक्रमास समाजाचे अध्यक्ष गोकुळदास सहारे , कपिल खंडारे , दिलीप ढोलणे , गिरिष ढोलणे , कैलास सहारे , वंदना ढोलणे , गिरिधर सहारे , अनुमाला भैसारे , विजय उंदिरवाडे , कपिल खंडारे सहित बहुसंख्य उपासक _ उपाषिका प्रामुख्याने उपस्थित होते. रात्रौ विजय शेन्डे यांच्या भिमगिताचा कार्यक्रम पार पडला.
आपल्या स्वप्नातलं घर, निसर्गाच्या सानिध्यात..
तुमचे स्वप्न आमची जबाबदारी...
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Travel
सुपर फास्ट बातमी
International
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Food
सुपर फास्ट बातमी
Politics
Vaingangavarta19
Crime
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Politics
No Comments