संकेत मोटर्स, गडचिरोली
गडचिरोली शहरात, प्रथमच आपल्या सेवेत...
F
25-10-2023
गडचिरोली, दि. २५ : राज्याचे नाव उज्वल केलेल्या राज्यातील खेळाडूंना व त्यांच्या मार्गदर्शकांना प्रोत्साहन पर बक्षीस देऊन त्यांचा गौरव करण्यासाठी आशियाई क्रीडा स्पर्धेतील (एशियन गेम्स) पदक विजेत्या खेळाडूं आणि मार्गदर्शकांना देण्यात येणाऱ्या पारितोषिक रक्कमेत दहापट वाढ करण्याचा ऐतिहासिक निर्णय राज्य सरकारने घेतला असल्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांनी सांगितले.
मंत्री बनसोडे म्हणाले, 19 व्या चीन येथील हँगझोऊ आशियाई क्रीडा स्पर्धेतील सुवर्णपदक विजेत्या खेळाडूस 1 कोटी रूपये, मार्गदर्शकास 10 लक्ष, रौप्यपदका विजत्या खेळाडूसाठी 75 लक्ष रूपये, मार्गदर्शकास 7 लक्ष 50 हजार रुपये, कांस्यपदक प्राप्त खेळाडूस 50 लक्ष रुपये मार्गदर्शकास 5 लक्ष रुपये रोख असे बक्षिस देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय सरकारने घेतला आहे. तसेच स्पर्धेत भाग घेणाऱ्या सहभागी खेळाडूंना प्रोत्साहनपर 10 लाख रुपये देण्यात येणार असल्याचे राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांनी माध्यमांशी बोलतांना सांगितले.
तसेच आशियाई क्रीडा स्पर्धेतील (एशियन गेम्स ) सांघिक क्रीडा प्रकारात सुवर्ण पदक प्राप्त खेळाडूस 75 लक्ष, मार्गदर्शकास 7 लक्ष 50 हजार, रौप्यपदक विजत्या खेळाडूस 50 लक्ष, मार्गदर्शकास 5 लक्ष तर कास्य पदक विजेत्यास 25 लक्ष, मार्गदर्शकास 2 लक्ष 50 हजार देण्यात येणार असून याबाबतचा शासन निर्णय जारी करण्यात आला असल्याचे बनसोडे यांनी सांगितले.
यापूर्वी सुवर्णपदकासाठी 10 लाख मार्गदर्शकास 2 लक्ष 50 हजार, रौप्यपदकासाठी 7.5 लाख, मार्गदर्शकास | लक्ष 87 हजार, कांस्यपदकासाठी 5 लाख, मार्गदर्शक 1 लक्ष 25 हजार रुपये दिले जात होते. मात्र आता आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी नेत्रदीपक कामगिरी करुन जागतिक स्तरावर पदकांचा इतिहास रचला. त्यात महाराष्ट्राच्या खेळाडूंचे मोठे योगदान आहे. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री
अजितदादा पवार यांनी रोख रकमेत वाढ करण्याचा निर्णय घेतला असे बनसोडे यांनी स्पष्ट केले.
उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी आठ दिवसापुर्वी क्रीडा व युवक कल्याण विभागाची आढावा घेतला होता. त्या बैठकीत पंजाब, हरियाणा, मध्यप्रदेश राज्याप्रमाणे आशियाई क्रीडा स्पर्धेतील पदक विजेत्या खेळाडूंच्या रकमेत वाढ करण्यावर चर्चा करण्यात आली होती. त्याप्रमाणे निर्णय घेण्यात आला असल्याचे मंत्री बनसोडे यांनी यावेळी सांगितले.
गडचिरोली शहरात, प्रथमच आपल्या सेवेत...
विदर्भ फायर न्यूज
Politics
विदर्भ फायर न्यूज
Travel
विदर्भ फायर न्यूज
International
विदर्भ फायर न्यूज
Crime
विदर्भ फायर न्यूज
Politics
विदर्भ फायर न्यूज
Food
विदर्भ फायर न्यूज
Politics
Vaingangavarta19
Crime
विदर्भ फायर न्यूज
Crime
विदर्भ फायर न्यूज
Politics
No Comments