आयुर्वेदिक पंचकर्म मल्टीस्पेशलिटी क्लिनिक
काय तुम्ही सुद्धा,उपचार करून त्रस्त झालेले आहेत, तर आम्हाला भेट द्या
F
19-10-2023
Armori Ramala News: रामाळा शेतशिवारात धान कापणारी मजुर महीला वाघाच्या हल्यात ठार
धान कापणिच्या कामाला वेग आले असल्याने सर्वत्र धान कापणी अगदिच जोमात सुरु झाली आहे. अशातच आरमोरी वरुन अवघ्याच पाच किमी अंतरावर असलेल्या रामाळा शेतशिवारात धान कापण्याकरिता गेलेल्या मजुर महिलेवर वाघाने अचानक हल्ला करुन ठार केल्याची माहीती प्राप्त झाली आहे.
प्राप्त माहितीनुसार ताराबाई एकनाथ धोडरे असे मजुर महिलेचे नाव असुन ती (काळागोटा) आरमोरी येथील रहिवासी असल्याचे समजते. सदर घटनेची माहीती मीडताच वनविभागाचे पथक घटनास्थळी दाखल होऊन मोका चौकशी करून पंचनामा केला असल्याचे समजते.
सदर महिला रामाळा येथील शेत शिवारात धान कापणीच्या कामाकरता गेली असताना लपुन बसलेल्या वाघाने महीलेवर अचानक बेसावध हल्ला करुन ठार केले ही घटना आज दी 19 ऑक्टोबर रोजी दुपारी 12 ते 12:30 वाजताच्या सुमारास घडली.
सदर घटनेमुळे परिसरातील जनतेमधे भीतीचे वातावरण पसरले असून शेतीचे काम करायची कशी असा प्रश्न शेतकर्यांत निर्माण झाला आहे. यावर वनविभागाने जातीने लक्ष घालून प्रतिबंधात्मक उपाययोजना करावी सदर वाघास जेरबंद करावे अशी मागणी होत आहे.
काय तुम्ही सुद्धा,उपचार करून त्रस्त झालेले आहेत, तर आम्हाला भेट द्या
विदर्भ फायर न्यूज
Politics
विदर्भ फायर न्यूज
Travel
विदर्भ फायर न्यूज
International
विदर्भ फायर न्यूज
Crime
विदर्भ फायर न्यूज
Politics
विदर्भ फायर न्यूज
Food
विदर्भ फायर न्यूज
Politics
Vaingangavarta19
Crime
विदर्भ फायर न्यूज
Crime
विदर्भ फायर न्यूज
Politics
No Comments