अभि लायटिंग, इलेक्ट्रिकल अँड हार्डवेअर
सर्व मटेरियल होलसेल दरात उपलब्ध
यापेक्षा स्वस्त आणखी कुठेच नाही ...
F
17-12-2023
मसेली येथे महिला सशक्तीकरण अभियान !!
कोरची.
समाजात वावरतांना आणि इतर विविध व्यवसाय करतांना महिलांना अनेक समस्या जाणवतात मात्र,त्यावर मात करून महिलांना खंबीरपणे व्यवसायात संधी शोधता आल्या पाहिजे, असे मत सौ.पंचशिला बोगा सरपंच ग्रा.पं.बोदादंड यांनी व्यक्त केले.
कोरची तालुक्यातील मसेली येथील छत्रपती हायस्कूल शाळेच्या प्रांगणात महिला सशक्तीकरण अभियानाच्या उदघाटन प्रसंगी त्या बोलत होत्या यावेळी कार्यक्रमाचेअध्यक्ष म्हणून प्रतापसिंह गजभिये तथा तंटामुक्तीचे समिती अध्यक्ष मसेली,कार्यक्रमाचे नोडल अधिकारी म्हणून फरेन्द्र.कुत्तीरकर ,प्रकल्प संचालक, जल जीवनमिशन,जि.प.गडचिरोली , तहसिलदार प्रशांत गडृम कोरची, उदघाटक म्हणुन सौ.पंचशिला बोगा सरपंच, राजेश फाये गटविकास अधिकारी पंचायत समिती कोरची, विशेष अतिथी म्हणून सौ.छाया बोगा सरपंच आस्वलहुडकी,सौ.सुरेखा आचले सरपंच नवेझरी, श्री.सुनिल सयाम सरपंच मसेली,रामदेवाल हलामी सरपंच ग्रा.पं.मुरकुटी,विरेंद्र जांभुळकर उपसरपंच, अनिलभाऊ केरामी माजी जिल्हा परिषद सदस्य गडचिरोली, विघाताई हिडामी, नलीनीताई सिंद्राम माजी सभापती , गणेश सोनवाने नायब तहसीलदार, निळाताई किन्नाकेआरोग्याविषयीची मुक्तीपथक, डॉ. किरण जाधव पशुधन विकास अधिकारी, प्रेमदास गोटा उपसरपंच, डॉ.विनोद मडावी तालुका आरोग्य अधिकारी, राजाराम नैताम,माजी सरपंच, , पोलिस पाटील तसेच आदी मान्यवर उपस्थित होते.
पुढे बोलताना अफाट लोकसंख्या असलेल्या भारतासारख्या देशात रोजगाराच्या संधी निर्माण करण्याच्या दृष्टीने महिला उद्योजकांच्या भूमिकेचा गांभीर्याने विचार करायला हवा. महिलांकडून विकसित केले जाणारे व्यवसाय देशाच्या विकासात महत्त्वाची भूमिका बजावू शकतात. त्याचप्रमाणे महिला स्वतःचा विकास करून इतर महिलांना सशक्त आणि स्वावलंबी बनवण्यास हातभार लावू शकतात. महिलांना सर्व प्रकारचे काम सहज आणि सुलभ पद्धतीने करता आले पाहिजे यासाठीच केंद्र आणि राज्य सरकारने महिला सशक्तीकरण सारखे अभियान हाती घेतले आहे. शासन आणि प्रशासनाने पुढाकार घेतला असून आता महिलांनी देखील एक पाऊल पुढे यावे असे आवाहन देखील त्यांनी केले.
कोरची तालुक्यातील मसेली येथे घेण्यात आलेले हे पहिले महिला सशक्तीकरण अभियान असून मसेली ,सावली,राजाटोला, जामणारा,आस्वलहुडकी, दोडके,लक्ष्मीपूर, बोंडेना,मुरकुटी,पडयाजोब, मयालघाट, चंविंदंड,लेकुरबोडी, डांबरी, बोंडे,आंबेखारी, फुलगोंदी,बोदादंड,बिजेपार,बेलारगोंदी,नवेझरी, पाच ग्रामपंचायत, 29 गांवे लोक गावातील महिला/पुरूष मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी महसूल विभाग,तालुका कृषी अधिकारी विभाग,पंचायत विभाग,वन विभाग,महिला व बाल कल्याण विभाग,शिक्षण विभाग,भूमी अभिलेख विभाग,आदिवासी विकास विभाग, आरोग्य विभाग,उमेद बचत गट,बँक विभाग तसेच संजय गांधी योजना,सेतू व निवडणूक विभागाने स्टॉल लावून विविध योजनांची जनजागृती केली तसेच गरजूंना लाभ दिले.
उपस्थित मान्यवरांनी देखील महिलांना मोलाचे मार्गदर्शन करून विविध लोककल्याणकारी योजनांची माहिती दिली.कार्यक्रमाचे प्रास्ताविक तहसिलदार प्रशांत गडृम, आभारप्रदर्शन एस.एस.बारसागडे मंडळ अधिकारी मसेली यांनी केले तर सूत्रसंचालन कोवे मँडम यांनी केले.
मान्य वराच्या हस्ते उमेद करून 5 लाभार्थी यांना शिधाकिट,ब्लँकेट , 7 लाभाथीँ यांना प्रत्येकी 60,000 चेक वाटप,2 बचत गटांना प्रत्येक 60,000 चे चेक वाटप, तहसिल कार्यालयातील संजय गांधी योजनेचे 9 लाभाथीँ,जातीचे,उत्पन्नाचे दाखले,शिधापत्रिका, सात बारा,वाटप करण्यात आले. तसेच icds कार्यालयाकडुन बेबी किट वाटप करण्यात आले.आरोग्य विभागाकडुन ,गोल्डन कार्ड, सिकल्सेल कार्ड , आभा कार्ड, विधिक प्रकारच्या तपासण्या करण्यात आल्या.
सर्व मटेरियल होलसेल दरात उपलब्ध
यापेक्षा स्वस्त आणखी कुठेच नाही ...
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Travel
सुपर फास्ट बातमी
International
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Food
सुपर फास्ट बातमी
Politics
Vaingangavarta19
Crime
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Politics
No Comments