अभि लायटिंग, इलेक्ट्रिकल अँड हार्डवेअर
सर्व मटेरियल होलसेल दरात उपलब्ध
यापेक्षा स्वस्त आणखी कुठेच नाही ...
15-11-2023
गडचिरोली : महाकृषी ऊर्जा अभियान योजनेअंतर्गत गडचिरोली जिल्ह्यामध्ये शेतक-यांचे परिपूर्ण एकूण १ हजार ५९६ अर्ज आजतागायत ऑनलाईन महाऊर्जाच्या कुसुम-ब पोर्टलवर प्राप्त झालेले आहेत. या अर्जांपैकी ४२१ लाभार्थी शेतकऱ्यांनी सौर पंप योजनेचा लाभ घेतलेला आहे. तसेच ३८३ लाभार्थी शेतकर्यांच्या अर्जांमध्ये कागदपत्रांची त्रुटी आढळलेली असल्यामूळे त्यांचे अर्ज प्रलंबित यादीमध्ये आहेत. या सर्व लाभार्थ्यांना कुसुम पोर्टल वरून एस.एम.एस त्यांच्या भ्रमणध्वनीवर पाठविण्यात आलेले आहेत. तसेच महाऊर्जा जिल्हा कार्यालय, चंद्रपुर यांचेकडून अशा सर्व लाभार्थ्यांना कागदपत्रांची त्रुटी पुर्तता करण्याकरीता भ्रमणध्वनी द्वारे कळविण्यात आलेले आहे. मात्र अद्यापही बऱ्याच लाभार्थी कडून त्रुटींची पुर्तता करण्यात आलेली नाही.
यामध्ये तालुकानिहाय त्रुटीतील लाभार्थी अर्जाची संख्या पुढील प्रमाणे आहे. वडसा २७, आरमोरी ५४, कुरखेडा १२९, कोरची २६, धानोरा ९, गडचिरोली ५, चामोर्शी १०, मुलचेरा १५, एटापल्ली ९१, भामरागड ३, अहेरी १२, सिरोंचा २ असे एकुण ३८३ लाभार्थी त्रुटीमध्ये आहेत. या व्यतिरीक्त ७०२ शेतक-यांचे अर्ज अपूर्ण आहेत. या अनुषंगाने अपूर्ण व त्रुटी अर्ज असलेल्या लाभार्थी शेतकऱ्यांनी त्यांना मिळालेल्या युजरनेम व पासवर्डचा उपयोग करून ऑनलाईन पोर्टलवर आवश्यक त्रुटी असलेले कागदपत्रे अपलोड करुन त्रुटींची व अपूर्ण अर्जाची पुर्तता करावी. या करीता महाऊर्जाच्या https://kusum.mahaurja.com/benefshome या संकेतस्थळाला भेट द्यावी. तसेच कागदपत्रे अपलोड होत नसल्यास किंवा कुठलीही अडचण संभावतास महाऊर्जा जिल्हा कार्यालय, चंद्रपूर येथे भेट द्यावी. जिल्हा मुख्यालय, चंद्रपूर पत्ता : गाळा क्र. ४ आणि कार्यालय क्र. १ गझ टॉवर वडगाव फाटा, एनफिल्ड शोरूम सामोर नागपुर रोड, चंद्रपूर ४४२४०२ दूरध्वनी : ०७१७२-२५६००८ E-mail: domedachandrapur@mahaurja.com जे लाभार्थी येत्या सात दिवसांत त्रुटींची पुर्तता करणार नाही, त्यांचे अर्ज निकाली काढण्यात येतील व मान्यता मिळाल्यास भविष्यात त्यांच्या अर्जाचा क्रम हा प्रथम त्रुटी पुर्तता करणाऱ्यास प्रथम प्राधान्य या अनुषंगाने गणला जाईल. याअनुषंगाने संबंधित लाभार्थी शेतकऱ्यांनी महाऊर्जा जिल्हा कार्यालय, चंद्रपूर येथे संपर्क करून आपल्या अर्जामध्ये असलेल्या कागदपत्रांच्या त्रुटीबाबत विचारणा करावी तसेच प्राप्त मार्गदर्शनानुसार त्रुटी पुर्तता करून घ्यावी, असे आवाहन जिल्हा व्यवस्थापक नितीन पाटेकर यांनी केले आहे.
सर्व मटेरियल होलसेल दरात उपलब्ध
यापेक्षा स्वस्त आणखी कुठेच नाही ...
सुपर फास्ट बातमी
National
Vaingangavarta19
Local News
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Local News
Vaingangavarta19
Crime
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Local News
No Comments