ProfileImage
122

Post

3

Followers

0

Following

PostImage

Chunnilal kudwe

Feb. 25, 2024

PostImage

'Ghoda Yatra' Navratri ends with Gopala - Gopala - गोपाला - गोपाला ने श्रीहरी बालाजी महाराज घोडायात्रा नवरात्रीची समाप्ती


हजारो श्रीहरी बालाजी भक्तांनी घेतला श्रीहरी चा काला

चिमूर घोडा यात्रा उत्सव

        ३९७ व्या घोडायात्रा उत्सवा निमित्त १४ फेब्रुवारी मिती माघ शुद्ध वसंत पंचली ला श्रीहरी बालाजी महाराज घोडा रथ यात्रा नवरात्र प्रारंभ झाली होती. मिती माघ शुद्ध गुरु प्रतिपदा रविवार ला अडीज वाजता हभप विनोद बुवा खोंड महाराज यांच्या नारदीय काल्याच्या किर्तनाने महाआरती करून गोपाला गोपाला म्हणत दही हंडी फोडून काला वितरीत करत श्रीहरी बालाजी महारज यांची घोडा यात्रा नवरात्रीची समाप्ती करण्यात आली.                                                   

        श्रीहरी बालाजी महाराज यांच्या घोडारथ यात्रेला २५१ वर्ष झाले. मिती माघ शुद्ध पंचमी गुरुवार ला मध्यरात्री अश्वारूढ लाकडी घोड्यावर श्रीहरी बालाजी महाराज यांची विष्णूची मूर्ती बसवून घोडा रथ यात्रा शहरातून मार्गक्रमण करण्यात आली होती. मिती माघ शुद्ध गुरु प्रतिपदा रविवार ला दुपारी श्रीहरी बालाजी मंदीर परिसरात हभप विनोद बुवा खोंड महाराज यांनी घोडायात्रा निमित्त गोपाल काल्याचे किर्तन केले मंदिरातील पुजारी यांनी महाआरती केली नारदीय किर्तनाने गोपाला गोपाला म्हणत दही हंडी फोडून गोपाल काला वितरण करण्यात आले यावेळी श्रीहरी बालाजी महाराज देवस्थान कमेटीचे अध्यक्ष निलम राचलवार, डॉ मंगेश भलमे, ॲड चंद्रकांत भोपे डॉ दिपक यावले, नैनेश पटेल, धमरमसिंग वर्मा आदी उपस्थित होते. दरम्यान आमदार बंटी भांगडीया व काँग्रेस चिमूर विधान क्षेत्राचे समन्वयक डॉ सतिश वारजूकर यांनी श्रीहरीचे दर्शन घेत गोपाल काला व मसाला भात वितरण केले.


  •       गोपल काल्याला छतीसगड, मध्यप्रदेश, आंध्रप्रदेश व राज्यातील हजारो श्रीहरी बालाजी भक्त आले होते. हि यात्रा महाशिवरात्री पर्यंत राहते. यात्रेत विवीध संघटनांनी शहरातील मुख्य मार्गावर मासला भाताचे स्टॉल लावून श्रीहरी बालाजी भक्तांना वाटप करण्यात आले. गोपाल काल्या दरम्यान पोलीसांचा चोख बंदोबस्त होता. यात्रेत आकाश पाळणे, ड्रगन, बोट, भूत बंगला मौत चा कुआँ, मिना बाजार, खेळण्यांची दुकाने, मनोरंजनात्मक कार्यक्रम व विवीध साहित्याची दुकाने सजली आहेत.


PostImage

Chunnilal kudwe

Feb. 23, 2024

PostImage

Horse Chariot Yatra Chimur - जयश्री बालाजी, गोविंदा - गोविंदाच्या गजराने चिमूर नगरी निनादली


घोडा रथ यात्रा दरम्यान अश्वारूढ श्रीहरी बालाजी महाराजांच्या प्रतिकृतीचे लाखो बालाजी भक्तांनी घेतले दर्शन
- शहरातील मुख्य मार्गाने निघाली घोडा रथ यात्रा


           चिमूर येथील श्रीहरी बालाजी महाराज यांच्या घोडारथ यात्रेला ३९७ वर्षाची परंपरा आहे. यावर्षी घोडा रथ यात्रा उत्सवाला २५१ वर्ष झाले आहे. मिती माघ शुद्ध पंचमी गुरुवार ला मध्यरात्रीच्या दरम्यान पुजा अर्चना करून लाकडी रथावरील लाकडी अश्वारूढ घोड्यावर लाकडी श्रीहरी बालाजी महाराज यांच्या प्रतिकृतीत विष्णूची मूर्ती बसवून परंपरेनुसार शहरातील मुख्य मार्गाने मार्गक्रमण करीत असताना याच अश्वारूढ श्रीहरी बालाजी महाराजांच्या प्रतिकृतीचे लोखो बालाजी भक्तांनी दर्शन घेतले. दरम्यान जय श्रीहरी बालाजी महाराज गोविंदा गोविंदाच्या गजराने चिमूर नगरी निनादली. यालाच रात घोडा असे म्हणतात.


        श्रीहरी बालाजी देवस्थान कमिटीच्या वतीने दरवर्षीप्रमाने याहीवर्षी घोडा रथ यात्रा उत्सवाचे आयोजन केले या उत्सवात गडचिरोली - चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार अशोक नेते, लोकसभा विस्तारक बाबुराव कोहळे, आमदार बंटी भांगडीया व परिवारांनी घोडा रथ यात्रा उत्सवादरम्यान श्रीहरी बालाजी महाराजांचे दर्शन घेत  गोविंदा गोविंदा सह जय श्रीरामाचे जयकारे लावले. दरम्यान श्रीहरी बालाजी महाराज कमिटीचे सर्व विश्वस्त, डाहुले पाटील यांचे वंशज व पुजारी भोपे यांच्या व्दारे विधीवत पूजा करून श्रीहरी बालाजी महाराजांचा घोडारथ गुरुवारी मध्यरात्री साढे बारा वाजताच्या दरम्यान शहरातील मुख्यमार्गानी फटाक्याची आतीशबाजी करत मार्गक्रमनासाठी निघाली असता वारकरी भजन मंडळ टाळ मृदुंगा व डिजेच्या ताल सुरात शहीद बालाजी रायपूर चौक, नेहरू चौक, अहिंसा चौक, मार्केट लाईन, छत्रपती शिवाजी चौकातून मुख्य मार्गाने श्रीहरी बालाजी मंदीरासमोर शुक्रवारी पहाटे साडे पाच वाजता पोहचला असता परिसर संपूर्ण भक्तीय झाला होता दरम्यान घोडा रथ यात्रेचा समारोप करण्यात आला. यावेळी लाखो भक्तांनी श्रहिरी बालाजी महाराजांचे दर्शन घेतले.
         २५ फेब्रुवारी रविवार ला दुपारी ३ वाजता हभप विनोद बुवा खोंड महाराज यांच्या नारदीय किर्तनाने गोपाल काला होणार आहे. श्रीहरी बालाजी भक्तांनी या गोपाल काल्याचा लाभ घ्यावा असे आवाहन श्रीहरी बालाजी देवस्थान कमिटीचे अध्यक्ष निलम राचलवार यांनी केले आहे.हि यात्रा महाशिवरात्री पर्यंत असते. या यात्रेत मनोरंजनात्मक आकाश पाळना, ड्रँगन, कोलंबस, मौत काँ कुआँ, भूत बंगला, बैठकी ब्रेक डान्स पाळना व मिना बाजारात म विवीध साहित्यांच्या खरेदी दुकाने सजली आहेत.
..................................
संपूर्ण परिसर जय श्रीराममय झाला  - 
     इशरथ जहान यांचा घोडायात्रा महोत्सवानिमित्त गुरुवार ला रोड शो ठेवण्यात आला दरम्यान श्रीहरी बालाजी मंदीर परिसारत स्थानिक स्टेजवर भगवा रंग चढणे लगा है हे गाणे म्हणत असताना अनेक भक्तांनी ठेका घेतला. श्रीहरी बालाजी महाराज घोडा रथ यात्रा दरम्यान शहरातीत मुख्य रस्त्यानी रोड करण्यात आला. यावेळी संपूर्ण परिसर जय श्रीराममय झाला. 
         चिमूर घोडा यात्रा महोत्सव समिती यांच्या वतीने २६ फेब्रुवारी ला चला हवा येऊ द्या भाऊ कदम भरत गणेशपुरे व संच यांचा लाईव्ह कामेडी शो, २७ फेब्रुवारीला आंतरराष्ट्रीय गरबा गायीका गिताबेन रब्बारि यांचा लाईव्ह कॉन्सर्ट कार्यक्रम, २८ फेब्रुवारी ला जयजय महाराष्ट्र माझा गीत फेम अवधूत गुप्ते यांचा लाईव्ह कॉन्सर्ट कार्यक्रम चिमूर बाजार मैदान लोणकर पेट्रोल पंपच्या जवळ रात्रो ८.३० वाजता कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. तरी या कार्यक्रमाला परिसरातील नागरीकांनी उपस्थित रहावे असे आवाहन समितीचे अध्यक्ष बंटी वनकर व सहकारी यांनी केले आहे.


PostImage

Chunnilal kudwe

Feb. 22, 2024

PostImage

Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti - छत्रपती शिवाजी महाराजाचा लावलेला बॅनर काढून अपमान करणाऱ्यावर कारवाई करा - डॉ सतिश वारजूकर चिमूर पोलीसात तक्रार ठाणेदाराला निवेदन

       बहुजन प्रती पालक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती सोमवारला होती त्या दरम्यान चिमूर येथील तलावाच्या पाळीवरील श्याम बंग यांच्या दुकानावरील बॅनर स्टॅन्डवर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त छत्रपती शिवाजी महाराज यांचा फोटो असलेला मानाचा मुजरा असा बॅनर जयंती दिनी एक दिवसासाठी किरायाने घेण्यात आला रक्कमही दिली होती. मात्र भाजपा नेत्यांच्या दबावात येवून बॅनर स्टॅण्ड मॅनेजर यांनी तो लावलेला बॅनर काही क्षणातच आदळ आपट करत खाली फेकला बॅनरवर असलेला बहुजन प्रती पालक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या फोटोचा अपमान करणाऱ्यावर कारवाई करा अशी मागणी चिमूर विधानसभा समन्वयक सतिश वारजूकर यांनी बुधवारला ठाणेदार योगेश घारे यांना दिलेल्या निवेदनातुन केली आहे. 


      शिव जयंतीच्या दिवसी एक दिवसा करीता बॅनर स्टॅण्ड किरायाने घेतले होते. याची ॲडव्हास बुकिंग रक्कम २ फरवरीला बॅनर स्टॅण्ड मॅनेजर प्रित सुभाष घोरपडे यांच्या खात्यात ऑनलाईन पाच हजार रुपये जमा केली होते. त्यानंतर महाराजांच्या जयंती दिवसी बॅनर लावल्याचा फोटो मित्र अफरोज पठाण यांनी पाठवीला दुपार नंतर बॅनर स्टॅण्ड मॅनेजर घोरपडे यांनी तुमची रक्कम वापस करीत आहो असे सांगत कारण विचारले असता त्यांच्यावर दबाव आणत तुम्ही वारजूकर यांचा लावलेला बॅनर काढा नाही तर आम्ही तुम्हाला मारू, बॅनर काढून फेकु अशी धमकी भाजपाच्या नेत्यांनी दिली व दुपारी सव्वा दोन वाजता बॅनर काढून फेकल्याचा व्हिडीओ पाठवीला. बहुजनांचे आराध्य दैवत रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांचा बॅनर आदळ आपट करत खाली फेकला. त्यामुळे बहुजनांच्या भावणा दुखावल्या आहेत. चिमूर येथे राष्ट्रसंत थोर महापुरुषाचे बॅनर फाडून फेकल्याच्या घटना घडत आहेत अशा घटना भविष्यात घडू नये व राष्ट्रसंत, थोर महापुरुषांच्या अपमान होवू नये यासाठी पोलीसांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान करनाऱ्यावर कारवाई करून गुन्हे दाखल करावे या मागणीसह आंदोलनाचा इशारा डॉ सतिश वाजूकर गजानन बुटके रोशन ढोक जावा भाई प्रदीप तळवेकर आदी काँग्रेस पदाधीकारी यांनी निवेदनातून केला आहे. दरम्यान निवेदण सहायक पोलीस निरीक्षक निलेश चवरे यांनी स्वीकारले असता चौकशी करून कारवाई करतो असे बोलले

.....................................
श्रीहरी बालाजी महाराज घोडा यात्रा महोत्सव निमित्त चिमूर नगर परिषदच्या परवानगीने शहरात ४x४ चे १५० बॅनर लावण्यात आले त्यापैकी ६५ बॅनर चोरी गेले व ८५ बॅनर शिल्लक आहे. यांची तक्रार मुख्याधीकारी नगर परिषद व ठाणेदार पोलीस स्टेशन चिमूर ला देण्यात आली. बॅनर चोरी करणाऱ्यांची चौकशी करून तात्काळ योग्य कार्यवाही करावी अशी मागणी होत आहे.
..............................
विना पारवानगीने कायम स्वरूपी बॅनर लावणाऱ्यावर कारवाई करा-
चिमूर नगर परिषद हद्दीत अनेक दिवसापासून कायम स्वरूपी लोखंडी बॅनर स्टॅण्डवर बॅनर लावले जात आहे. याकडे नगर परिषदचे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे नगरपरिषदचा कर बुडत आहे. त्यांच्यावर नगरपरिषदने कोणतीही कारवाई केली नाही. विना परवानगी अवैध बॅनर लावणाऱ्यावर फौजदारी गुन्हा दाखल करून दंड वसूल करण्यात यावा व कायम स्वरूपी किरायाने देत असलेले शहरातील लोखंडी बॅनर स्टॅण्ड तिन दिवसात न हटविल्यास २९ फरवरी पासून धरणे आंदोलन करण्यात येईल असा इशारा शंकरपूर ग्रामपंचायतचे सरपंच साईश वारजूकर यांनी मुख्याधीकारी यांना बुधवार ला दिलेल्या निवेदनातुन दिला आहे.
............................
श्रीहरी बालाजी देवस्थान यांच्या तलावाच्या पाळीवरील श्याम बंग यांच्या दुकानांच्यावरती लोखंडी बॅनर स्टॅण्ड लागलेला आहे तो लोखंडी बॅनर स्टॅण्ड अनाधिकृत आहे. त्यावर नियमानुसार कारवाई करणार.

डॉ सुप्रिया राठोड
मुख्याधीकारी नगर परिषद चिमूर


PostImage

Chunnilal kudwe

Jan. 29, 2024

PostImage

'Parjanya' became a scientist - कठिण परिश्रमाच्या संघर्षातुन 'पर्जन्य' झाला वैज्ञानिक


चिमूर क्रांतीभूमीचे नाव केले लौकीक


            शिक्षणाची ओढ असली तरी आर्थिक परिस्थिती समोर जावू देत नाही असा समज असल्यामूळे ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थी मागे पडताना दिसतात अशीच परिस्थिती शहरातील एका विद्यार्थावर आली. कुंटूब सुशिक्षीत मात्र आर्थिक विवंचनेत असताना मनाची तयारी केली अन यशालाही गवसनी घालता येते अशीच संकल्पना मनात ठेवून आर्थिक परिस्थितीला न घाबरता कठीण परिश्रमाच्या संघर्षातून मार्ग काढत पर्जन्य वैज्ञानिक झाला. तो दिल्ली येथील केंद्र सरकारच्या इलेट्रानिकी एव सुचना प्रौधोगिकी मंत्रालयात वैज्ञानीक बी सहायक निदेशक ( आई टी ) या पदावर कार्यरत आहे.
        पर्जन्य चे वडिल शिवशंकर चोपकर सिव्हील इंजिनीअर आई उषा चोपकर गृहिनी होत्या ते चिमूर येथील गांधी वार्ड येथील रहिवासी आहेत. पर्जन्य ने प्राथमिक शिक्षक संस्कार विद्या निकेतन व बारावी पर्यंतचे शिक्षण नेहरू विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय चिमूर येथुन केले . इथे झाले. खरतर पर्जन्यचे अख्खे  बालपन आर्थिक व मानसीक समस्येत गेले. मात्र जिवणात काही मोठं व्हायच हे आधीपासुनच ठरवल होत यासाठी खुप स्ट्रगल करत रात्रनं दिवस अभ्यास केला. यासाठी शैक्षणिक कर्ज घेतल खुप संघर्ष करत असतानाच स्पर्धा परिक्षेचा पहिला अटेम्प दिला मात्र यात अपयश हाती आले. दरम्यान कॉलेजमधून प्लेसमेंट झाल व कंपनी जॉईन केली. या कंपनीतील नौकरीमुळे थोडी आर्थिक समस्या कमी झाली मात्र शैक्षणिक कर्ज असल्यामुळे एक नौकरी सोडून दुसरी नौकरी करायला जमत नव्हते त्यामूळे पूर्ण वेळ स्पर्धा परिक्षेचा दुसरा अटेम्पट देवू शकत नव्हता तेव्हा नौकरी सोबतच अभ्यास करायच ठरविले. यात थोडफार यश आल.

       पर्जन्य ला पहिली नौकरी चेन्नई येथे सॉफ्टवेअर इंजिनीयर ची मिळाली त्यानंतर पुन्हा  परिक्षेचा दुसरा अटेम्पट दिला यातही अपयश आल. तेव्हा आपल्याला मोठं व्हायच आहे हे लक्षात ठेवून परिक्षेला तिन महीने असताना नौकरी सोडली व जिद्द चिकाटी व मेहनतीने करो या मरो या स्थितीत अभ्यास केला अखेरिस मेहनितीचे फळ मिळायला सुरुवात झाली लागोपाठ GATE, BARC, JNUEE, NET, JRF, NIC परिक्षा झाली. पर्जन्य ने NIC मध्ये वैज्ञानिक सहायक निदेशक या पदावर आपले नाव कोरून क्लास 1 गॅझेटेड अधिकारी झाला असून पर्जन्य ने चिमूर क्रांतीभूमी चे नाव लौकीक केले आहे.
..............................
कुठल्याही परिस्थितीला न खचता  मेहनतीने व जिद्दीने अभ्यास केला पाहिजे. आयुष्यात काही करायचे असेल तर सुर्या सारखे तपायला शिकलं पाहिजे. हेच मोटिवेशन ठेवून अभ्यास केला तर यश नक्की मिळते.

पर्जन्य चोपकर
वैज्ञानिक सहायक निदेशक ( आइ टी ) दिल्ली.


PostImage

Chunnilal kudwe

Jan. 12, 2024

PostImage

Farmers of '"Sardpar"' are deprived of 'paddy crops' due to lack of 'Prashant' road - 'सरडपार' येथील शेतकरी "प्रशांत" हातात आलेल्या धान पिकांपासुन वंचित


 रस्त्या अभावी ४० पोते धान शेतातच रस्त्यासाठी शेतकऱ्याचा तहसील कार्यालयात चकरा

       चिमूर तहसील कार्यालया अंतर्गत येणाऱ्या सरडपार येथील शेतकरी प्रशांत पाटील  यांची वडिलोपार्जित दीड एकर धनाची शेती आहे या शेतीत धानाची फसल घेतली त्यात ४०पोते धान झाले मात्र बाजूचे शेतकरी  रस्ता  देत नसल्याने ४० पोते धान एक महिन्यापासून शेतातच पडले आहेत त्यामुळे हातात आलेल्या पिकापासून प्रशांत पाटील शेतकरी पिकापासून वंचित झाले असून त्यांच्या परिवाराचे अर्थचक्र थांबले असल्याने परिवाराचे पालन कसे करावे असा प्रश्न शेतकऱ्यांपुढे उभा ठाकला आहे.


    महसूल विभाग चिमूर अंतर्गत येणाऱ्या मासळ (बु) मंडळ मध्ये समाविष्ट असणाऱ्या सरडपार येथील शेतकरी प्रशांत अर्जुन पाटील यांची भूमापन क्रमांक १०३,१०१,१००, व ९९ मध्ये वडिलोपार्जित शेती आहे वाडीलपासून शेती करीत असताना बाजूच्या शेतकरी यांच्या सहकार्याने शेतात जाण्यायेण्यासाठी रस्ता होता मात्र बाजूचे शेत नव्याने मूळ मालकाकडून घेतलेले उमरेड येथील शेतकरी वंदना प्रकाश पिसे, प्रणव प्रभाकर वरघणे, वैभव प्रभाकर वरघणे यांनी शेताला जाळीचे कुंपण करून रस्ता बंद केला त्यामुळे रघुनाथ लक्ष्मण पाटील, प्रशांत अर्जुन पाटील व केवळराम पाटील यांना शेतात साहित्य बंडी, ट्रेकटर नेण्यासाठी रास्ता नसल्याने हे तिन्ही शेतकरी शेती करण्यापासून वंचित राहूण्याची वेळ आली आहे. 
तर प्रशांत पाटील यांनी कशीबशी धनाची फसल घेतली व धानाचे चुरणे केले मात्र रस्त्या अभावी चाळीस पोते धान मागील एक महिन्यापासून शेतातच पडले आहेत यामुळे प्रशांत पाटील याच्यावर मोठे संकट ठाकले आहे 
 शेती करण्यासाठी मला स्थायी रस्ता द्यावा या मागणीसाठी मागील पाच वर्षांपासून तहसीलदार यांचे उंभरठे झिजवत आहेत मात्र न्याय मिळाला नाही नैराश्याने माझे कडून काही विपरीत घडले तर याची सर्व जवाबदारी प्रशासनाची राहील असा निर्वाणीचा इशाराही शेतकरी प्रशांत पाटील यांनी निवेदनातून दिला आहे
-------------------------------
उपविभागीय अधिकाऱ्यांच्या आदेशालाही बगल -

२३ ऑगस्ट २०१९ पासून रस्त्यासाठी प्रलंबित असलेल्या सरडपार येथिल भूमापन क्रमांक १०३,१०१,१००,९९ रस्त्यासाठी चौकशी करून महसूल अधिनियम १९६६ तसेच मामलेदार ऍक्ट १९०५ नुसार कारवाई करण्याचा आदेश ८ डिसेंबर २०२३ला उपविभागीय अधिकारी यांनी  दिला मात्र अजूनही कारवाई केली नाही
---------------------------
रस्त्या अभावी शेती पडीक -

पारडपर येथील भूमापन क्रमांक १०३,१०१,१००,व ९९ पैकी तीन शेतकऱ्यांना बाजूचे शेतकरी बैलबंडी, ट्रेकटर नेऊ देत नसल्याने व स्थायी रस्ता नसल्याने गुलाब पाटील,केवळ पाटील यांना शेती पडित ठेवावी लागली आहे.
..............................
शेतातील धनाला लागली घुस -

 धानाचे चुरणे करून धान नेण्यासाठी बाजुच्या शेतकऱ्याने रस्ता अडवल्याने मागील एक महिन्यापासून ४० पोते धान शेतातच आहेत या धानाला घुस लागल्याने धनाची नासाडी सुरू झाली आहे यामुळे हातात आलेल्या हजारो रुपये किमतीच्या धानाचे नुकसान होत आहे 
------------------------
धानाच्या राखवलीसाठी करावी लागते जागल -

शेतात रस्त्या अभावी धानाचे चाळीस पोते ठेऊन असून जंगली डुक्करा पासून धान पोत्याचे रक्षण करन्यासाठी प्रशांत पाटील जीवावर उद्धार होऊन आजही एकटाच जागल करीत आहे दरम्यान कमीजास्त झाल्यास याची जवाबदारी प्रशासनाची राहील असा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.


PostImage

Chunnilal kudwe

Jan. 9, 2024

PostImage

We still don't know Savitri - Samata Dut Rajurwade - अजूनही सावित्री आम्हाला कळली नाही. - प्रज्ञा राजुरवाडे


 सवित्रीबाई फुले जयंती

          ज्या काळात स्त्रीला स्वताच्या  अस्तित्वाची जानीव नव्हती त्याकाळात स्त्रीयांना हक्क व अधीकाराची जानीव करुण देत अंगावर फेकलेल्या शेनाची दगड धोंडाची पर्वा न करता शिक्षणाची गंगा पुढे नेण्याच काम सवित्रीबाई फुले यांनी केल. हा अपमान कोनासाठी सहन केला व का  केला असेल? हा क्षन स्त्रीयांना विचार व आत्मचितंन करनारा आहे. सवित्रीचे कार्य पुढे नेण्याची जबाबदारी आम्हा सर्वांवर असली तरी अजुनही सवित्री आम्हाला कळली नाही असल्याचे मार्गदर्शन उपस्थितांना समता दुत प्रज्ञा राजुरवाडे यांनी केले.


         माळी समाज नवतळा येथे सावित्रीबाई फुले जयंतीचे आयोजन करन्यात आले होते त्या प्रसंगी स्त्रीयांना मार्गदर्शन करताना डॉ बाबासाहेब आंबेडकर  संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी पूणे च्या समता दुत प्रज्ञा राजूरवाडे स्त्रीयाना प्रमुख मार्गदर्शनात केला.


         यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष आदिवासी आश्रमशाळेचे मुख्य्ध्यापक सुकारे, प्रमुख अतिथी भाजपा ओबीशी प्रदेशाध्य्क्ष तथा गुरुदेव प्रचारक राजू देवतळे भाजप युवा तालुका अध्यक्ष बालू पिसे, रमेश कंचर्लावार  उपसरपंच तूळशीराम शिवरकर,ग्रा सदस्य संगीता टेम्भुर्ने,कविता वसाके,गिताबाई कैकाडे, सुनदा शेंडे, मुकनायक फाउंडेशनचे अध्यक्ष प्रकाश मेश्राम, प्रा.ठवरे, प्रा. चटपकार, केल्झरकर, गुलाब श्रीरामे, गोपाळ गुरनुले अण्णा वसाके आदी मान्यवर उपस्थित होते.


         पूढे बोलताना राजुरवाडे म्हणाल्या की जुन्या परंपराना छेद देवून नवविचारांची कास धरत दुरदृष्टी ठेवली पाहीजे. समाजात आजही काहि चुकिच्या प्रथा आहेत त्यांना कायमचे नष्ट करण्यासाठी आपन काहि भूमिका  स्वीकारल्या आहेत का ? कर्मठ व रुढीवादी समाजात प्रवाहाच्या विरोधात वाहने हे सोपे नसते ते धाडस व हिम्मत सवित्रीच्या लेकीत असताना पन प्रवाहाच्या विरोधात लीहणे बोलने ही हिम्मत स्त्रियामध्ये आली नाही. शिक्षन हे परिवर्तनवादी आहे. स्त्री शिकली म्हणजे समाजात बदल घडवुन आणू शकते. सवित्रीच्या विचारातुन सक्षम होने गरजेचे आहे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक माळी समाज अद्यक्ष महादेव कोकोडे तर संचालन व आभार  योगेश कोटरंगे यांनी केले यावेळी समस्त माळी समाज उपस्थित होता


PostImage

Chunnilal kudwe

Jan. 8, 2024

PostImage

'Chimur Taluka Press' made Darpankar himself. Greetings to 'Balshastri Jambhekar' - चिमूर प्रेस असोशिएशनच्या सदस्यांनी केले दर्पनकार स्व. बाळशात्री जांभेकर यांना अभिवादन


6 जानेवारी पत्रकार दिवस

          6 जानेवारी पत्रकार दिन मराठी पत्रकारीतेचे जनक दर्पनकार स्व. बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंती निमीत्त शनिवार ला शहरातील पत्रकार भवनाचे नियोजीत जागेवर चिमूर तालुका प्रेस असोशिएशनचे जेष्ठ सदस्य रविंद्र गोंगले व भरत बंडे, यांनी दर्पनकार यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून अभिवादन केले. 


        यावेळी प्रेस असोशिएशनचे अध्यक्ष चुन्नीलाल कुडवे, सचिव कलीम शेख, उपाध्यक्ष मनोज डोंगरे, सहसचिव जितेंद्र गाडगे, राजकुमार चुनारकर, सदस्य जितेंद्र सहारे, फिरोज पठाण, इमरान कुरेशी, डॉ ज्ञानेश्वर जुमनाके, झामदेव आत्राम, उमेश शंभरकर आदी उपस्थित होते.


PostImage

Chunnilal kudwe

Jan. 5, 2024

PostImage

'Atish Bhaisare' appointed as ' City President ' of Chimur Youth Congress - चिमूर युवक काँग्रेसचे शहर अध्यक्ष पदावर आतिश भैसारे यांची नियुक्ती


चिमूर विधानसभा युवक काँग्रेस अध्यक्ष रोशन ढोक यांनी दिले नियुक्ती पत्र


       अनेक वर्षापासून राजकीय क्षेत्रात सक्रीय असलेले व संघटन, कौशल्य वाकचातुर्य, सेवाभाव व सर्वाना सोबत घेवून समाजकार्य करन्याची वृत्ती लक्षात घेता आतिश भैसारे यांची चिमूर विधानसभा युवक काँग्रेसचे चिमूर शहर अध्यक्ष पदावर नियुक्ती करण्यात आली.

हि नियुक्ती चिमूर विधानसभा युवक काँग्रेस कमिटी अध्यक्ष रोशन रवि ढोक यांनी १ जानेवारी ला भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे चिमूर तालूका कार्यालय येथे नियुक्ती पत्र देवून केली आहे. काँग्रेस पक्षाची प्रतिमा जनमानसात उज्वल करावी व काँग्रेस पक्षाची ध्येयधोरणे समाजातील सर्व जनसामान्यांपर्यत पोहचवून अधिकाधिक कार्यकर्ते आपण जोडन्यासाठी परिश्रम घ्याल. भविष्यातील यशस्वी, राजकीय व सामाजिक वाटचाली करीता चिमूर तालुका युवक काँग्रेस अध्यक्ष नागेश चट्टे, उपाध्यक्ष मंगेश घ्यार, माजी तालूका अध्यक्ष काँग्रेस अल्पसंख्याक जावाभाई श्रीकांत गेडाम , प्रज्वल बोबडे, शेखर राऊत, मुकेश शिवरकर, आशिष राऊत, ईश्वर वाघ आदी काँग्रेस पदाधिकारी कार्यकर्ता यांनी शुभेच्छा दिल्या.


PostImage

Chunnilal kudwe

Jan. 4, 2024

PostImage

You should become MLAs and MPs to "spread the thoughts of great saints" to villages - Ghanshyam Dhongde - संत महापुरुषांचे विचार गावागावात पोहचविण्यासाठी तुम्ही आमदार, खासदार झाले पाहीजे - धोंगडे


संत महापुरुषांचे विचार गावागावात पोहचवण्यासाठी तुम्ही आमदार, खासदार झाले पाहीजे - धोंगडे
- भिमा कोरेगाव शोर्य दिन व सावित्री फुले जयंती

गौतम बुद्धाला विज्ञानवादी का म्हणतात कारण गौतम बुद्धांनी इ. स. पूर्व काळात शैक्षणीक क्रांतीची चळवळ सुरू केली होती नंतर त्यांचा वारसा महात्मा फुले दाम्पत्त्यांनी चालवीला. त्यांचेच विचार डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानात मांडले. मात्र आमच्या संत व महापुरुषांचा खरा इतिहास आम्हाला शिकवीला जात नाही. फक्त काल्पनीक कथा व विकृत संस्कृती शिकविली जाते. बालवाडी पासून मानवतावादी शिक्षण दिल पाहीजे. महापुरुषांच्या विचारावर चालनार सरकार पाहीजे जे संत महापूरुषांचे विचार गावागावात पोहचवीले पाहीजे यासाठी तुम्ही आमदार खासदार झाले पाहीजे असल्याचे मार्गदर्शन अध्यक्ष भाषनातुन धनश्याम धोंडगे यांनी केले.

अखिल भारतीय बौद्ध महासभा शाखा चिमूर, तक्षशिला बुद्ध विहार, समता सैनिक दल, त्रिशरण महीला मंडळ चिमूर यांच्या संयुक्त विद्यमाने भिमा कोरेगाव शौर्य दिन व सावित्री फुले यांचा १ ते ४ जानेवारी पर्यंत चार दिवस कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते दरम्यान बुधवार ला सावित्री जयंती कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानावरून मार्गदर्शन करताना सेवा निवृत्त शिक्षक घनश्याम धोंगडे बोलत होते.यावेळी कार्यक्रमाचे मार्गदर्शक विषय तज्ञ प. स. चिमूर चे संजय पंधरे, सेवानिवृत्त मुख्याध्यापक प्रभाकर पिसे, कॉस्ट्राईब कर्मचारी संघाचे किशोर नागदेवते, ओबीसीचे सल्लागार प्रभाकर पिसे, शिक्षीका कल्पना महाकारकर, बोद्ध महासभेचे अध्यक्ष रोशन सहारे, चिमूर प्रेस चे अध्यक्ष चुन्नीलाल कुडवे आदी उपस्थित होते.

      पूढे बोलताना धोंगडे म्हणाले की, भिमा कोरेगावात अडीज हजार पेशव्या विरुद्ध इंग्रजांची जिकराची लढाई झाली होती त्यात पाचशे महार बटालीयनचे शुरविर होते त्यांनी अडीज हजार पेशव्यांना परास्त केले होते एका शूरविरांच्या वाट्याला ५६ पेशवे आले होते याचा अर्थ त्या प्रत्येक महार बटालियन शुरविरांची छाती ५६ इंचची होती म्हणून या देशात ५६ इंचची छाती कोनाचीही नाही ती फक्त महार बटालीयन शुरविरांची आहे. या देशात ७५ वर्षा पासुन समस्या जशीच्या तशी आहे. उलट शोषण सुरु आहे. या निमीत्ताने जाती जोडल्या पाहीजे. संविधानाला व देशाला वाचवायचे असेल तर सर्व मिळून समस्याची  जनजागृती समाजात केली पाहीजे. डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी एक मताचा अधिकार दिला तो विकू नका. मानूस मरतो पण महामानवांचे विचार मरत नाही. पूढील काळ सांगता येत नाही. आपल्या हक्क अधिकाराच्या सरकारला निवडून द्या.

    कार्यक्रमाचे वक्ते संजय पंधरे म्हणाले की, जो पर्यत ज्योतीबा रुमजनार नाही तो पर्यत सावित्री कळनार नाही, कत्पना महाकारकर म्हणाल्या की, महीला शिकली म्हणजे धर्म बुडाला आजही स्त्रीयाच्या समस्या संपल्या नाहीत. किशोर नागदेवते म्हणाले की डॉ. बाबासाहेब आंबेडकरामूळेच भिमा कोरेगाव विजय स्तंभाची माहिती मिळाली, प्रभाकर लोथे म्हणाले की, महापुरुषांनी शाळा काढल्या आपन देवळे मंदीरे काढत आहो असल्याचे बोलत होते.

  १ जानेवारी भिमा कोरेगाव शौर्य दिनानिमीत्त शुरविरांच्या सन्मानार्थ बाईक रॅली व विजयस्तंभाला मानवंदनाचे आयोजन डॉ. आंबेडकर स्मारक इंदिरा नगर येथून करण्यात आले. हि रॅली वडाळा (पैकू) संविधान चौक, शहरातील मार्केट लाईन मार्गे तक्षशीला बौद्ध विहारात पोहचली तिथेच रॅलीचा समारोप करन्यात आला २ जानेवारी ला भिमा कोरेगाव शुरविरांच्या सन्मानार्थ रक्तदान शिबीराचे आयोजन डॉ आंबेडकर स्मारक येथे करण्यात आले या शिबीरात विस रक्तदात्यानी रक्तदान केले. ४ जानेवारी ला विकास राजा यांचा समाज प्रबोधनात्मक कार्यक्रम घेन्यात आला. कार्यक्रमाचे संचालन व प्रास्तावीक महेंद्र लोखंडे आभार आकाश भगत यांनी केले. कार्यक्रमाला बहुसंख्य नागरिक उपस्थित होते.


PostImage

Chunnilal kudwe

Jan. 3, 2024

PostImage

New Year Essay Competition at Government Residential School for Scheduled Caste, Neo-Buddhist Girls, Chimur - निवासी शाळेत नूतन वर्षानिमीत्त प्रतिकृती स्पर्धा


डॉ बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजनेंतर्गत मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियान


  •    प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये शाळेप्रती
    उत्तरदायित्वाची भावना निर्माण व्हावी तसेच आनंददायी, प्रेरणादायी वातावरण मिळावे यासाठी महाराष्ट्र शासनाने भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजनेंतर्गत " मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा" हे अभियान राबविण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत अनुसूचित जाती व नवबौध्द मुलींची शासकीय निवासी शाळा चिमूर येथे नूतन वर्षाचे औचित्य साधून 'प्रतिकृती स्पर्धा' मंगळवार ला पार पडली.

  सदर स्पर्धा ही शालेय गटांत घेण्यात आली. विद्यार्थीनींनी टाकाऊ वस्तूंपासून अप्रतिम सौंदर्य निर्माण करून शालेय परिसर सुशोभित केला. अवघ्या दोन दिवसांत त्यांनी ही स्पर्धा यशस्वीरीत्या पार पाडली. परीक्षण प्रक्रिया पार पाडल्यानंतर विद्यार्थिनींचे खूप कौतुक करण्यात आले. त्यानंतर विद्यार्थिनींसाठी मनोरंजनात्मक कार्यक्रम आयोजित करण्यात आला. 

 कार्यक्रमाच्या यस्वीतेसाठी शाळेच्या मुख्याध्यापिका सुनीता खोब्रागडे, प्रमुख अतिथी मनोहर गभणे, मीरा काळे, जया कुकडे, सतीश कुकडे, विनय खापर्डे, अनुराधा महाजन, राज गजभिये, सुकदेव बोरकर, हेमूताई मगरे, बॉबी धात्रक आदी सर्व बाह्यस्त्रोत कर्मचारी उपस्थित होते.


PostImage

Chunnilal kudwe

Jan. 1, 2024

PostImage

'Rotary's initiative' to distribute bicycles to needy school students - त्रेपन्न गरजू शालेय विद्यार्थ्यांना सायकल वितरण


चिमूर रोटरी क्लबचा उपक्रम

       चिमूर रोटरी क्लब च्या वतीने गरजू होतकरू शालेय विद्यार्थ्यांना  रविवार ला वडाळा (पैकू) चिमूर येथील आदर्श विद्यालयाच्या पटांगनात गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना त्रेपन्न सायकलचे वितरण उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. 

नेहमी समाजकार्यात अग्रेसर असनाऱ्या रोटरीने समाजातील गरीब व होतकरू विद्यार्थ्यासाठी उपक्रम राबवत समाज घटकातील विद्यार्थ्यांची शाळेत जान्याची समस्या लक्षात घेत सायकलचे वितरण केले. यावेळी रोटरी क्लबचे अध्यक्ष रोटे. वैभव लांडगे, सचिव विनोद भोयर, कोषाध्यक्ष राकेश बघेल, विशेष अतिथी आदर्श विद्यालयचे मुख्याध्यापक नैताम, मार्गदर्शक विषय तज्ञ प. स. चिमूरचे संजय पंधरे, व्यापारी मंडळाचे अध्यक्ष प्रवीण सातपुते, सचिव बबन बन्सोड व्यासपीठावर उपस्थित होते.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रोटे. मंगेश हिंगणकर, रोटे. पवन ताकसांडे, रोटे. हरीश सारडा, रोटे. कैलास धनोरे, रोटे. पवन बंडे, रोटे. अभिजीत बेहते, रोटे. आदित्य पिसे, रोटे. अक्षय अवधूत, रोटे. यश गोहने, रोटे. विलास अल्लडवार, रोटे. डॉ. महेश खानेकर, रोटे. सुभाष केमये, रोटे. श्याम बंग, रोटे. गुरु ठाकरे, रोटे. जयवंत वरघने, रोटे. यांनी सहकार्य केले. या कार्यक्रमाचे संचालन रोटे. कुशाब रोकडे व आभार रोटे. विशाल गंपावार यांनी मानले.


PostImage

Chunnilal kudwe

Jan. 1, 2024

PostImage

'Astha' Vaditia in State Level Crooking Competition - राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत डॉ. खत्री कॉलेज च्या 'आस्था' व्दितीय


जल जीवन मिशन विषया अंतर्गत योजनांची प्रभावी प्रचार प्रसिद्धी

 

चंद्रपूर (का.प्र.)
       राज्यस्तरावर घेण्यात आलेल्या " जल जीवन मिशन " विषयाअंतर्गत योजनांची प्रभावी प्रचार प्रसिद्धी व्हावी या उद्देशाने पार पडलेल्या व वक्तृत्व स्पर्धेत 
चंद्रपूर तुकूम येथील डॉ. खत्री कॉलेजची ११ विज्ञान शाखेची विद्यार्थीनी आस्था उदेभान गणवीर हिने द्वितीय क्रमांक पटकावला आहे. 

चंद्रपूर येथील रफी अहमद किदवाई हायस्कूल मध्ये १९ डिसेंबर २०२३ ला आयोजित करण्यात आलेल्या या वकृत्व स्पर्धेत राज्यातील विविध महाविद्यालयातील विद्यार्थांनी सहभाग घेतला होता. या वकृत्व स्पर्धेत आस्था उदेभान गणवीर या विद्यार्थीनीने आपल्या प्रभावी वक्तृत्व शैलीचे उदाहरण देत या स्पर्धेत द्वितीय क्रमांक पटकावला आहे. तिच्या यशाने डॉ खत्री कॉलेजचे नावलौकीक झाले आहे. 

आस्थाच्या वक्तत्व स्पर्धेतील यशाबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जे. एम. काकडे, संस्थेच्या कोषाध्यक्ष प्रा. अनुश्री पाराशर, सांस्कृतिक विभागाच्या प्रा. सुप्रिया सदलवार तसेच प्रा. डॉ. टी.एम. शेख यांनी तिचे कौतुक करत पुष्पगुच्छ देत भविष्यातील वाटचाली करीता शुभेच्छा दिल्या आहे.


PostImage

Chunnilal kudwe

Dec. 31, 2023

PostImage

Selection of 'Gramgita Farmers Producers Company' from 'Chimur' for Business Concave Exhibition - पुणे इथे होणाऱ्या बिसनेस कॉनकेव्ह करिता ग्रामगीता शेतकरी उत्पादक कंपनीची निवड


 भव्य कृषी व्यवसाय सोहळा

 

        ग्रामीण भागातील शिक्षित तरुणांत कृषी विषयी माहिती व नवीन उद्द्योजकता निर्माण करणाऱ्या क्षेत्रात कार्यरत असणारी पुणे येथील सामाजिक संस्था ' सेंटर फॉर अँग्रिकल्चर अँड रुरल डेव्हलोपमेंट ' यांच्या वतीने १६ जानेवारी २०२४ ला पुणे इथे आयोजित ' अँग्री - स्टार्टअप अँड बिझनेस कॉनकेव्ह ' कृषी व्यवसायावर आधारित प्रदर्शनीकरीता चिमूर तालुक्यातील ग्रामीण भागात विशेषतः 'कृषी,पर्यावरण व जैव इंधन ' क्षेत्रात कार्यरत ' ग्रामगीता शेतकरी उत्पादक कंपनीची ' निवड करण्यात आली आहे.

        या भव्य कृषी व्यवसाय सोहळ्याचा मुख्य उद्देश ग्रामीण भागात तरुण युवकांमध्ये कृषी आधारित व्यवसायाची निर्मिती करणे, प्रत्येक गावात तरुणाचे कौशल्य विकसित करण्यावर भर देणे, नव - नवीन उद्योजक होण्याच्या संधी उपलब्ध करून त्यांना योग्य ते मार्गदर्शन करणे, विविध व्यवसायांचे प्रदर्शन करण्यास ' आवश्यक तो मंच ' त्यांना उपलब्ध करून देणे व पर्यावरणाचे हित जपणाऱ्या संस्था तसेच शेतकरी उत्पादक कंपन्यांना प्रोत्साहन देणे हा आहे. त्यामुळे तालुक्यातील तरुणांसाठी व्यवसायिक संधी उपलब्ध होणार आहे. 

       तरुण युवकांनी व्यवसायिक होण्यास प्रयत्नशील राहावे हाच उद्देश या सोहळ्याचा आहे. ही चिमूर तालुक्यासाठी शेतकरी यांच्यासाठी खूप आनंदाची बाब आहे. हे धरती माय ग्रामगीता यांचा लाभलेला आशीर्वाद आहे. तालुक्यात खऱ्या अर्थानं कृषी क्रांती कशी घडून येईल हाच उद्देश आहे. जैविक शेती,ग्रामीण महिला वर्ग यांना विविध उपक्रम माध्यमातून सक्षम करणे ग्रामीण रोजगानिर्मिती असे अनेक बाबी आहेत. अशी माहीती संस्थापक कृषी पदवीधर असलेले अभिजीत धनराज बेहते यांनी केले. दरम्यान कार्यक्रमाला सहकारी अक्षय अवधूत, कार्तिक मगरे, शुभम निवल, प्रफुल मदनकर पुणे इथे उपस्थितीत राहणार आहे.


PostImage

Chunnilal kudwe

Dec. 29, 2023

PostImage

Bhagwat week is a celebration of enlightenment - Dr Satish Warjukar - भागवत सप्ताह म्हणजे ज्ञानयज्ञ सोहळा - डॉ वारजूकर


 पळसगांव येथे भागवत सप्ताह  समाप्ती

    भगवंताने कथांमधून जीवनाचा उद्धार कसा करावा, हेच सांगितले आहे. भागवतानी अत्यंत सरळ आणि सोप्या भाषेत मानवजातीला अचूक मार्ग दाखविला आहे. भागवताकडे केवळ कथा म्हणून न पाहता या कथांचे आपल्या जीवनात काय महत्त्व आहे त्यातील काय आत्मसात करायचे हे  समजून घ्यायला पाहीजे. भागवत सप्ताह म्हणजे ज्ञानयज्ञ सोहळा त्यामुळे त्यातील तत्त्वज्ञान समजून घ्यायला हवे असे प्रतिपादन चिमूर विधान सभा क्षेत्राचे समन्वयक तथा महाराष्ट्र प्रदेश ओबीसी महासंघ चे राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉ. सतिश वारजुकर यांनी केले.


     भागवत सप्ताह समितीच्या वतीने श्रीमद् भागवत सप्ताह, गोपाल काला निमित्त भागवत सप्ताह समाप्ती कार्यक्रमाचे आयोजन पळसगांव ( पिपर्डा ) येथे करण्यात आले होते. कार्यक्रमादरम्यान उपस्थित मान्यवरांच्या हस्ते डॉ सतिश वारजूकर यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी चिमूर तालुका कांग्रेस कमिटी अध्यक्ष डॉ. विजय गावंडे पाटील,पळसगांव सर्कल प्रमुख सुभाष बन्सोड, दुमदेव पाटील बोरकर, राजू आत्राम, निकेश सोनबनवार, प्रकाश रामटेके, संजय सोणेकर, नूतन सहारे, महादेव सहारे व समस्त गावकरी उपस्थित होते


PostImage

Chunnilal kudwe

Dec. 28, 2023

PostImage

Shri Sant Nagaji Maharaj Social Hall Chimur - MP Ashok Nete - चिमूर मध्ये होनार श्री संत नगाजी महाराज यांचे सामाजिक सभागृह


 खा. अशोक नेते यांनी श्री संत नगाजी महाराज पुण्यतिथी महोत्सवाला सदिच्छा भेटीत केले आश्वस्त  

         श्री संत नगाजी महाराज यांचा पुण्यतिथी महोत्सवात दोन दिवसीय कार्यक्रमाच्या शेवटच्या दिवसी गोपाल काला निमित्त गडचिरोली - चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार अशोक नेते यांनी सदिच्छा भेट दिली असता संत नगाजी महाराज यांच्या जिवन कार्यावर प्रकाश टाकला व समाजाच्या सामाजीक समस्या जाणून घेत खासदार निधीतून दहा लक्ष रुपयांचे संत नगाजी महाराज यांचे नावाने सामाजीक सभागृहाच्या मागणीला आश्वस्त केले. त्यामुळे येत्या काही दिवसात चिमूर मध्ये श्री संत नगाजी महाराज यांचे सामाजीक सभागृह होनार आहे.


      श्री संत नगाजी महाराज सामाजीक सेवा समिती चिमूरच्या वतीने श्री क्षेत्र माणीक नगर येथे श्री संत नगाजी महाराज यांचा दोन दिवसीय पुण्यतिथी महोत्सव २७,२८ डिसेंबर ला आयोजीत करण्यात आला होता. याप्रसंगी श्री. संत नगाजी महाराज  सामाजिक सेवा समिती व्दारे खासदार अशोक नेते यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.


       यावेळी भाजापा युवा मोर्चाचे तालुका अध्यक्ष बालू पिसे, शहर अध्यक्ष बंटी वनकर, संत नगाजी महाराज सेवा समिती चे अध्यक्ष देवेंद्र कडवे, उपाध्यक्ष गजानन बनसोड, सचिव अरूण चिंचूलकर, सहसचिव दिवाकर पुंड, कोषाध्यक्ष रामभाऊ खडसिंगे, सदस्य रामदास मांडवकर, निलकंठ जमदाडे, रमेश मेंढूलकर, शेखर एकोनकर, अंकूश पुंड, महादेव सुर्यवंशी, अक्षय लांजेवार, भाजपा महामंत्री श्रेयस लाखे, अमित जुमडे, भाजपा शहर अध्यक्ष सचिन फरकाडे, प्रशांत नरुले, सूरज नरुले, आदी उपस्थित होते. कार्यक्रमाला परिसरातील बहुसंख्य महिला पुरुष उपस्थित होते.


PostImage

Chunnilal kudwe

Dec. 27, 2023

PostImage

Village there branch NCP (Ajit Pawar group) - गाव तेथे शाखा राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत शिक्कामोर्तब


चिमूर येथे राष्ट्रवादी काँग्रेस ( अ. प. ) पदाधिकाऱ्यांची  बैठक


       राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक मंगळवार ला शहरातील जिल्हा परिषद  विश्रमगृहात पार पडली या बैठकीत चिमूर विधान क्षेत्रात राष्ट्रवादी काँग्रेसची गाव तेथे शाखा विषयी शिक्कामोर्तब करण्यात आले.


      ही बैठक चंद्रपूर राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष नितीन भटारकर, चिमूर राष्ट्रवादी काँग्रेस विधान सभा अध्यक्ष अरविंद रेवतकर, चिमूर तालूका राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष योगेश ठूणे यांच्या मार्गदर्शनात बैठक पार पडली. दरम्यान चिमुर तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निहाय पदाधिकाऱ्यांच्या नियुक्ती करुन गाव तेथे शाखा स्थापन करने व पक्ष वाढविणे संदर्भात पदाधिकारी तसेच कार्यकर्त्यांसोबत चर्चा करण्यात आली व उपस्थित राष्ट्रवादी काँग्रेस ( अ. प. ) पदाधिकाऱ्यांच्या हस्ते राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरद पवार गटाचे चिमुर तालुकाध्यक्ष मनीष वजरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रिय अध्यक्ष अजितदादा पवार यांच्या भूमिकेचे समर्थन करीत प्रमुख पदाधिकाऱ्यांसह प्रवेश केला.


      यावेळी बैठकीत राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुका अध्यक्ष मनीष वजरे, स्वरूप तळवेकर, परमेश्वर ढोणे , मेहबूब भाई शेख, दिपक दुधे , राष्ट्रपाल गेडाम , बाबाकर खोब्रागडे, राजेंद्र मसराम ,संजय घरत , राहुल ढोणे, सुखदेव गराटे उपस्थित होते.


PostImage

Chunnilal kudwe

Dec. 26, 2023

PostImage

Rangnar National Sports Tournament with cultural feast in Ballarpur - बल्लापूर मध्ये रंगणार सांस्कृतीक राष्ट्रीय क्रिडा स्पर्धा


  • फायर शो, लेझर शो, ॲक्रोबॅटिक डान्सचाही समावेश
  • मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्या उपस्थितीत होणार उद्धघाटन