RUBY ENTERPRISES
Electrical sales and services
सर्व इलेकट्रीकल्स वस्तू एकाच ठिकाणी..
सर्वोच दर्जाचे.. कमी किमतीत
F
04-10-2024
चिमूर क्रांती बहुजन फाऊंडेशनचे गौतम पाटील यांची पत्रकार परिषदेत माहिती
चिमूर -
चिमूर क्रांती बहुजन फाउंडेशनच्या वतीने नवरात्री, दुर्गोत्सव निमीत्य महाराष्ट्राची प्रसिद्ध डान्सर गौतमी पाटील यांचा कार्यक्रम 9 ऑक्टोबर बुधवार ला चिमूर येथील ग्रामगिता महाविद्यालयाच्या पटांगणात सायंकाळी 6 वाजता आयोजीत करण्यात आल्याची चिमूर क्रांती बहुजन संघटनाचे संयोजक गौतम पाटील यांनी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस संघटक ओबीसी धनराज मुंगले यांच्या चिमूर येथील कार्यालयात शुक्रवारला पत्रकार परिषदेत माहिती दिली.
या कार्यक्रमाचे उदघाटन महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांचे हस्ते होणार असून या कार्यक्रमाचे मुख्य अतिथी खासदार डॉ. नामदेवराव किरसान, आमदार अभिजित वंजारी, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस महासचिव शिवाणी वडेट्टीवार, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस संघटक ओबीसी धनराज मुंगले, जिल्हा परिषद माजी अध्यक्ष डॉ. सतीश वारजूकर,काँग्रेस सेवादलाचे प्रा.राम राऊत,पंजाबराव गावंडे, संजय डोंगरे,संजय घुटके, ऍड. दिगंबर गुरुपूडे, गजानन बुटके, विनोद चौधरी, प्रफुल खापर्डे, नरेश हेमने, नेताजी मेश्राम आदी मान्यवर उपस्थित राहणार आहे.
या कार्यक्रमाबाबत सविस्तर माहिती देताना मुख्य आयोजक गौतम पाटील म्हणाले की गौतमी पाटील हिच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे. गौतमीच्या कार्यक्रमाला प्रेक्षकांची गर्दी नाही असं कधीच झालेलं नाही गौतमीची झलक बघण्यासाठी चाहते कायम उत्सुक असतात. त्यामुळे शांतता व सुव्यवस्था अबाधित राखण्याची काळजी घेण्यात येणार असल्याची माहिती आयोजीत पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी पत्रकार परिषदेला धनराज मुंगले, गुणवंत कारेकर, गौतम पाटील राजेंद्र लोणारे, प्रदीप तळवेकर, लोकनाथ रामटेके, आदी उपस्थित होते.
Electrical sales and services
सर्व इलेकट्रीकल्स वस्तू एकाच ठिकाणी..
सर्वोच दर्जाचे.. कमी किमतीत
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Travel
सुपर फास्ट बातमी
International
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Food
सुपर फास्ट बातमी
Politics
Vaingangavarta19
Crime
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Politics
No Comments