अभि लायटिंग, इलेक्ट्रिकल अँड हार्डवेअर
सर्व मटेरियल होलसेल दरात उपलब्ध
यापेक्षा स्वस्त आणखी कुठेच नाही ...
F
29-08-2024
आमदार बंटी भांगडीया यांचे हस्ते होणार रविवारला सभागृह बांधकामांचे भूमीपूजन
चिमूर -
वैशिष्टपूर्ण कामासाठी विशेष अनुदान निधी या योजने अंतर्गत चिमूर नगरपरिषद क्षेत्रातील चावडी परिसरात श्री संत संताजी जगनाडे महाराज सामाजिक सभागृह मंजूर झाले त्या सभागृहाच्या बांधकाम भूमिपूजनाचा सोहळा कार्यक्रम १ सप्टेंबर रविवारला सकाळी ११ वाजता श्री संत संताजी जगनाडे महाराज अधिष्ठान चावडी मोहला चिमूर येथे आयोजित केला आहे. या कार्यक्रमानिमीत्त सभागृह बांधकामाचे भूमिपूजन चिमूर विधानसभा क्षेत्राचे आमदार बंटी भांगडिया यांचे हस्ते होणार आहे.
या कार्यक्रमाला जेष्ठ समाजसेवक कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा. महादेव पिसे, प्रमुख अतिथी न प मुख्याधीकारी डॉ. सुप्रिया राठोड, जेष्ठ वक्ते, तेली समाज गजानन उमाटे, केंद्रीय अध्यक्ष विदर्भ तेली समाज रघुनाथ शेंडे, सामाजीक कार्यकर्ता भाग्यवान खोब्रताडे, प्रकाश देवतळे, अध्यक्ष, श्री संत संताजी जगनाडे महाराज मंडळ राजू अगडे, प्रदीप बंडे, लता अगडे, सामाजीक कार्यकर्त्यां मनिषा कावरे, मिनाक्षी बंडे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहे. परिसरात होनाऱ्या सभागृह बांधकाम भूमिपूजन कार्यक्रमाला तेली समाज बांधवानी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन श्री संत संताजी जगनाडे महाराज कल्याणकारी मंडळ, चिमूर तथा सर्व तेली समाज बांधव चिमूर यांनी केले आहे
सर्व मटेरियल होलसेल दरात उपलब्ध
यापेक्षा स्वस्त आणखी कुठेच नाही ...
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Local News
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
विदर्भ फायर न्यूज
Religion
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
No Comments