समाधान आयुर्वेदिक दवखाना
आपल्या समस्यांचे समाधान हेच आमचे ध्येय
F
15-11-2023
मूलभूत प्रश्न त्वरीत निकाली न काढल्यास आंदोलन
सिमेंट रोड, सभागृह ,या व्यतिरिक्त समाज हिताचे व गरजेचे एकही काम नगर परिषद करू शकली नाही. कोनतेही काम कितीदा करायचे याचे सुद्धा नियोजन नाही. विवीध समस्याने नगरपरिषद बरबटली असून प्रभागातील मुलभूत प्रश्नाकडे नगर परिषदचे दुर्लक्ष होत आहे. प्रभागातील मुलभूत प्रश्न त्वरीत निकाली काढावे अन्यथा आंदोलन करू असा ईशारा चिमूर तालुका काँग्रेसचे शहर अध्यक्ष अविनाश अगडे यांनी दिला आहे.
चिमूर नगरपरिषदेला आठ वर्ष झाली नळाची पाणी समस्या जशीच्या तशीच आहे. या संदर्भात अनेकदा नगर परिषद ला पत्र व्यवहार केला मात्र नगरपरिषद याकडे लक्ष देत नाही. पूर्ण पावसाळा गेला तरी या वर्षी नाली व नाले साफ करण्यात आले नाही. कोणत्याही कामात नियोजित काम नाही निव्वळ निधीची उधळण सुरू आहे. लोकप्रतिनिधीचे याकडे दुर्लक्ष होत आहे. टॅक्स वसुलीच्या माध्यमातुन जनतेची पिळवणूक सुरू आहे. अन्न, पाणी , निवारा या तिन्ही बाबीकडे नगर परिषद फोल ठरत आहे.
येत्या काही दिवसात समस्या निकाली न लागल्यास विधानसभा 74 समन्वयक डॉ. सतिश वरजूकर, ओबीसी संघटक धनराज मुंगले, जिल्हा सरचिटणीस गाजनन बुटके, तालुका अध्यक्ष विजय गावंडे पाटील यांच्या नेतृत्वात नगर परिषदला धडक देत आंदोलन करू असा ईशारा प्रेसनोट च्या माध्यमातून चिमूर तालुका काँग्रेसचे शहर अध्यक्ष अविनाश अगडे यांनी दिला आहे.
आपल्या समस्यांचे समाधान हेच आमचे ध्येय
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Local News
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
विदर्भ फायर न्यूज
Religion
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
No Comments