अभि लायटिंग, इलेक्ट्रिकल अँड हार्डवेअर
सर्व मटेरियल होलसेल दरात उपलब्ध
यापेक्षा स्वस्त आणखी कुठेच नाही ...
F
02-11-2023
बोडधा ( हेटी ) येथील घटना, अज्ञात माते विरुद्ध गुन्हा दाखल.
मातृ देवो भव, आईसारखं दैवत साऱ्या जगतात नाही यासारख्या उक्तींनी आईची महानता ज्या भारतीय संस्कृतीमध्ये अनादी काळापासून वर्णन केली गेली आहे. त्याच भारतात मातृत्वाला कलंक लावणारी घटना चिमूर तालुक्यातील बोडधा ( हेटी ) गावात घडली या घटनेने गावात खळबळ उडाली असून त्या निर्दयी मातेविरुद्ध संताप व्यक्त करण्यात येत आहे. चिमूर शहरापासून सोळा किलोमीटर अंतरावर असलेल्या व भिसी पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या बोडधा ( हेटी ) हनुमान मंदीर येथील चौकातील नालीत एक नवजात अर्भक अज्ञात व्यक्तीने आणून फेकल्याची घटना सायंकाळी पाच वाजता दरम्यान बुधवारला उघडकीस आली.
बोडधा ( हेटी ) येथील मंदिरा जवळील नालीत बुधवारला सकाळी काही नागरिकांना नऊ वाजता दरम्यान कुई, कुई,,, असा रडन्याचा आवज येत होता. मात्र हा आवज कुत्र्याच्या पिल्लाचा असेल म्हणून कुणी लक्ष दिले नाही. सायंकाळी एक महिला झाडझुड करुन कचरा टाकण्यासाठी नालीकडे गेली असता तिला ते नवजात बाळ नालीत असल्याचे दिसले ही माहिती गावात पसरताच नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली होती दरम्यान पोलीस पाटील गडदे यांनी घटनेची माहिती भिसी पोलिसांना दिली. भिसी पोलीस घटनास्थळी दाखल होत पंचनामा करून अर्भकाला चिमूर येथील उपजिल्हा रुग्णालयात तपासणीसाठी दाखल केले.
दिवसभर नवजात अर्भक नालीत असल्याने मृत झाले असल्याचे डॉक्टरानी सांगितले, एक दिवसाचे फिमेल अर्भक असल्याने त्याचे पोस्टमार्टेम व्हिडीओ कमेऱ्यामध्ये फोरेन्सिक लॅब मध्ये करावे लागत असल्याने व ही व्यवस्था चिमूर येथे नसल्याने त्या अर्भकाला चंद्रपूर येथे पाठविण्यात आले.
भिसी पोलिसांनी भादवी ३१७ नुसार गुन्हा दाखल केला असून पुढील तपास ठाणेदार प्रकाश राऊत यांच्या मार्गदर्शनात उपनिरीक्षक सचिन जंगम करीत आहेत
--------------------------------
नवजात अर्भक हे साधारणता आठ ते नऊ महिन्याचे असून या अर्भकाचे वजन २ किलो १०० ग्राम आहे अर्भकाची उत्तरीय तपासणी करण्यासाठी वेगळी कमिटी आहे त्यामुळे हे अभ्रक चंद्रपूर येथे फोरेन्सिक लॅब मध्ये पाठविण्यात आले आहे.
डॉ. आनंद किन्नाके
वैद्यकीय अधीक्षक, उपजिल्हा रुग्णालय, चिमूर
सर्व मटेरियल होलसेल दरात उपलब्ध
यापेक्षा स्वस्त आणखी कुठेच नाही ...
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Local News
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
विदर्भ फायर न्यूज
Religion
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
No Comments