ड्रिमलँड डेव्हलपर्स
आपल्या स्वप्नातलं घर, निसर्गाच्या सानिध्यात..
तुमचे स्वप्न आमची जबाबदारी...
19-12-2023
सतिश वारजुकर यांनी केले रस्तारोको आंदोलन -
कांपा - चिमूर या रस्त्यांवरील कवडशी देश फाट्यावर रस्त्यातील खड्डे चुकविताना बस शेतात गेल्याने 16 प्रवासी किरकोळ जखमी झाले आहे हि घटना मंगळवार ला सकाळी दहा वाजता दरम्यान घडली त्यामुळे संतप्त प्रवासी, गावकरी व डॉ सतीश वारजुकर यांनी रस्तोरोको आंदोलन केले आहे.
मागील एक वर्षापासून चिमूर शंकरपूर कांपा हा रस्ता खराब झालेला आहे जागोजागी खड्डे पडलेले आहे या रस्त्याचे खड्डे बुजवण्यासाठी राजकीय पक्ष व सामाजीक संघटनेने सुद्धा निवेदन दिलेले आहे परंतु त्या निवेदनाची दखल सार्वजनिक बांधकाम विभागाने घेतलेली नाही या खड्ड्यामुळे कितीतरी अपघात झालेले आहे मंगळवार ला सकाळी चिमूर वरून भंडारा ला जाणारी बसक्रमांक mh 40 BL 39880 खड्डा चुकवत असताना कवडशी देश फाट्यावर शेतात घुसलेली आहे या बस मध्ये जवळपास 70 प्रवासी होते त्यात 16 प्रवासी व शालेय विद्यार्थी जखमी झाले आहे सदर जखमी प्रवाशांना प्राथमिक आरोग्य केंद्र शंकरपूर येथे उपचार सुरू आहेत तर काही प्रवाषानी खाजगी दवाखान्यात उपचार घेतले आहे.
ही बाब जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष डॉ सतीश वारजुकर यांना माहीत होताच रुग्णवाहिका बोलाऊन दवाखान्यात पाठविले तसेच आज पर्यंत दिलेल्या निवेदनाची दखल न घेतल्यामुळे रस्ता रोको आंदोलन सुरू केले दरम्यान भिसि पोलीस ठाण्याचे ठाणेदार प्रकाश राऊत व चिमूर चे ठाणेदार मनोज गभने हे ताफ्यासह हजर झाले पोलीस संरक्षणात सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता उपगंल्लावार यांनी खड्डे बुजविण्याचे काम बुधवार पासून तर नवीन रस्त्याचे काम पंधरा दिवसात सुरू करण्याचे आश्वासन दिल्याने रस्ता रोको आदोलन मागे घेण्यात आले. यावेळी माजी उपसभापती रोशन ढोक कवडशी चे उपसरपंच बाबा देशमाने खैरी चे माजी उपसरपंच लक्षमन खेडेकर दामोधर ननावरे अशोक चौधरि आदी उपस्थित होते.
आपल्या स्वप्नातलं घर, निसर्गाच्या सानिध्यात..
तुमचे स्वप्न आमची जबाबदारी...
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Local News
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Local News
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
विदर्भ फायर न्यूज
Religion
Vaingangavarta19
Crime
No Comments