RUBY ENTERPRISES
Electrical sales and services
सर्व इलेकट्रीकल्स वस्तू एकाच ठिकाणी..
सर्वोच दर्जाचे.. कमी किमतीत
F
21-12-2023
- . अवैध रेतीचे ट्रॅक्टर खाली युवक आल्याने मृत्यु
- - मृतकाच्या वारसानांना पंचेवीस लाख रुपयाची मदत द्या
- - पत्रकार परिषदेत चिमूर तालूका रा. कॉं. पार्टीचे तालुका अध्यक्ष राजू मुरकुटे यांची मागणी
................................................ एफडीसीएम खडसंगीच्या जंगलात अनेक वर्षापासुन अवैध रेती चोरी होत आहे. या विषयी वनमंत्री व एफडीसीएमचे विभागीय व्यवस्थापक यांना सहा महीन्यापूर्वी तक्रारी केल्या मात्र त्यांनी दखल घेतली नाही त्यामुळे बुधवार ला रात्री अवैध रेती भरून ट्रॅक्टरने जात असताना ट्रॅक्टरवर बसुन असलेला आकाश धनराज सोनटक्के रा नवेगाव (पू) हा ट्रॅक्टर खाली आल्याने या युवकाचा जागीच मृत्यु झाला. याला जबाबदार एफडीसीएम चे अधिकारी, बिट गार्ड असल्याने यांचेवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून निलंबीत करन्यात यावे अशी मागनी गुरुवारला आयोजीत पत्रकार परिषदेत राष्ट्रवादी कॉग्रेसचे तालूका अध्यक्ष राजू मुरकुटे यांनी केली आहे.
खडसंगी एफडीसीएम कक्ष क्रमांक २५ / २६ मध्ये अवैध रेती चोरी होत असल्याचे पत्र राजू मुरकुटे यांनी जुन २०२३ ला वनमंत्री, जुलै २०२३ ला विभागीय व्यवस्थापक एफडीसीएम चंद्रपूर व डिसेंबर २०२३ ला पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना पाठवीले होते मात्र कुठलीही कारवाई झाली नाही उलट अधिकारी कर्मचारी यांच्या डोळ्या देखत करोडो रुपयाची अवैध रेतीची चोरी एफडीसीएमच्या जंगलातून होत आहे. ट्रॅक्टर मध्ये अवैध रेती भरून जंगलातुन रस्त्यावर येत असताना ट्रॅक्टर मुंडीवर बसलेला आकाश अचानक ट्रॅक्टर खाली आल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला असे किती मृत्यु एफडीसीएम घेनार ? एफडीसीएमच्या अधिकाऱ्यांनी अवैध रेतीला वेळीच आळा घातला असता तर आकाश चा मृत्यु झाला नसता. मृतकांच्या वारसांना शासनाने पंचेवीस लाख रुपयांची मदत द्यावी व एफडीसीएम अधिकारी बिट गार्ड यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून निलंबीत करन्यात यावे. सात दिवसात कारवाई न झाल्यास राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आंदोलन करन्यात येईल असा इशारा पत्रकार परिषदेत चिमूर रा.कॉ. चे तालूका अध्यक्ष राजू मुरकुटे यांनी दिला आहे.
पत्रकार परिषदेला राष्टवादी काँग्रेसचे जिल्हा सचिव रमेश खेरे, तालूका युवक राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष मनिष वजरे, तालूका उपाध्यक्ष रा.काँ. रामू चौधरी आदी उपस्थित होते.
Electrical sales and services
सर्व इलेकट्रीकल्स वस्तू एकाच ठिकाणी..
सर्वोच दर्जाचे.. कमी किमतीत
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Local News
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
विदर्भ फायर न्यूज
Religion
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
No Comments