अमित मेडिकल स्टोर & निर्मल जल, गडचिरोली
निर्मल जल शुद्धतात का वादा
F
03-11-2023
२४ तासाच्या आत शेतकऱ्यांना विज पुरवठा न मिळाल्यास तीव्र आंदोलन करणार - डॉ सतिश वारजूकर
हल्ली रब्बी पिकांचा हंगाम सुरु असुन थंडीचे दिवस आहेत. शेती ओलित करण्यासाठी शेतकऱ्यांना विजेअभावी मोठी कसरत करावी लागत आहे. परिसरातील शेतकऱ्यांची अवस्था लक्षात घेता चिमूर विधान सभा क्षेत्राचे समन्वयक तथा महाराष्ट्र प्रदेश ओबीसी महासंघ उपाध्यक्ष डॉ सतिश वारजूकर व परिसरातील शेतकर्यानी २४ तास वीज पुरवठा करण्यात यावा या मागणी करीता शुक्रवार ला चिमूर - वरोरा महामार्गावरील रामदेगी फाट्याजवळ ठिय्या आंदोलन केले.
एकीकडे मोझाक या व्हायरसमुळे शेतकऱ्यांचे सोयाबीन पीक पूर्णपणे नष्ट झाले तर दुसरीकडे शेतकऱ्याला थ्री फेज वीजपुरवठा दिवसा नसल्याने शेतकरी पूर्ण पणे हवालदिल झाला आहे कपाशीचे पीक देखील उन्हामुळे मरणागती जात असल्याचे दिसत आहे याच सोबत धान पीक देखील पाण्या अभावी नष्ट होण्याची दाट शक्यता आहे. रब्बी हंगामातील चना गहू या पिकांना पाणी सुधा गरजेचे असल्याने शेतकऱ्यांना रात्रीला गस्त करत रात्रीला रानटी जनावरे, विषारी साप विंचू अशा प्राण्यांना तोंड देत जीव मुठीत धरून शेतीला पानी करावे लागत आहे. शेतकऱ्यांची समस्या लक्षात घेता २४ तास विद्युत पुरवठा सुरळीत करण्यात यावा या मागणीसाठी वरोरा तालुक्यातील येरखेडा, गिरोला, चिमूर तालुक्यातील सावरी, माकोना खानगांव, गुजगव्हान येथील शेतक्यांसह डॉ सतिश वारजूकर यांनी रास्तारोको ठीय्या आंदोलन केले.
जर २४ तासाच्या आत शेतकऱ्याना २४ तास विज पुरवठा सुरळीत झाला नाहीतर संपूर्ण शेतकरी व काँग्रेस रस्त्यावर उतरून आंदोलन करनार असल्याचा इशारा चिमूर विधानसभा क्षेत्राचे समन्व्यक डॉ. सातिश वारजूकर व परिसरातील सर्व शेतकरी यांनी उपस्थित अभियंता सिंग यांना देण्यात आला. दरम्यान रास्तारोको आंदोलनामुळे अर्धा तास वाहतूक विस्कळीत झाली होती. शेगांव ठाणेदार अविनाश मेश्राम यांनी आंदोलनात मध्यस्ती करत शांतता व सुव्यवस्था अबाधित ठेवली. यावेळी चंद्रपूर जिल्हा कांग्रेस कमिटी सरचिटणीस गजाजन बुटके, तालुका कांग्रेस कमिटी अध्यक्ष डॉ. विजय गावंडे, जिल्हा परिषद माजी सभापती गुणवंत कारेकर, ग्रामपंचायत सरपंच सावरी लोकेश रामटेके, माजी सरपंच ठेपाले, मंगेश मेश्राम,गोलू रामटेके, आशिष खोब्रागडे, सौरभ बुटके,पंचम रामटेके, बंडू गायकवाड, संदीप माथनकर, पकढारी माथनकर,पंढरी माथनकर, नंदलाल शेंडे, ताराचंद पाटील, थकसेन पाटिल, रोशन खोब्रागडे, सुरेश निखाडे, व शेतकरी उपस्थित होते
निर्मल जल शुद्धतात का वादा
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Local News
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
विदर्भ फायर न्यूज
Religion
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
No Comments