CPELLO SALON
Redefine your style
book your appointment now
F
17-09-2023
काँग्रेस कायकर्ता मेळाव्यात नाना पटोले व विजय वडेट्टीवार यांची उपस्थिती
आता आपण दुसऱ्या महायुद्धाची तयारी करतोय त्यावेळी काँग्रेसने इंग्रजांना देशातून हाकलले होते आता इंग्रज विचारसरनीचे सरकार देशात व राज्यात आहे त्या सरकारला हद्दपार करण्यासाठी चिमुरात दुसरी क्रांती करण्याची गरज आहे ही क्रांति चिमुरकर करतील अशी अपेक्षा असल्याचे चिमूर येथील माजी आमदार स्व. धनश्यामबापू बिरजे परिसरात शनिवारला काँग्रेस कार्यकर्ता मेळाव्यात अध्यक्ष स्थानावरून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले बोलत होते.
चिमूर तालुका काँग्रेस कमेटीच्या वतीने चिमूर विधानसभा क्षेत्राचे समन्वयक डॉ सतिश वारजूकर यांच्या वाढदिवसा निमित्त काँग्रेस कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.
देशात सध्या भयावह परिस्थिती आहे देशातील लोकशाही, संविधानिक व्यवस्था संपुष्टात आणण्याचे काम भाजप सरकार करीत आहे तर भाजप कधीच शेतकरी,भटक्या विमुक्त जाती, ओबीसी, एसी, एसटी चा हितकारक नव्हता तर नेहमी विरोधात होता, फक्त धर्माच्या नावावर बहुजनांना आपल्या जाळ्यात ओढून सत्तेत आले आहेत, सत्तेत येताच मोदी सरकारने शेतकऱ्यांना संपवण्याचा प्लॅन केला आहे, शेतकरी स्वाभिमान योजनेत शेतकऱ्यांना सहा हजार रुपये मिळतात हे टॅक्स रुपी पैसे तुमचे आहेत मोदींचे नाहीत मात्र शेतकऱ्यांना चुकीच्या माध्यमातून सांगण्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिका दौऱ्यावर गेले असता भाषनात मै व्यापारी हु मै व्यापार करणे आया हु असे म्हणाले होते त्यानुसार ते मोठया व्यापाऱ्यांना मोठे करीत आहेत व शेतकरी, मजूरांना गुलाम बनविण्यात येत असल्याची टीका कांग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले यांनी केली.
_____________________
ओबीसींनो कंत्राटी जीआर लागू होऊ देऊ नका - विजय वडेट्टीवार -
नुकताच राज्य सरकारने शासकीय नौकरीसाठी कंत्राटी पद्धतीने भरती घेण्याचा जीआर काढला आहे या जिआरमुळे बहुजन समाजातील सुशिक्षित बेरोजगारांचे भविष्य अंधकारमय झाल्याशिवाय राहणार नाही तेव्हा येत्या काळात बहुजनांनी प्रत्येक तहसील कार्यालय,जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पुढे या जिआर ची होळी करून या कंत्राटी जीआरचा विरोध करावा तसेच महाराष्ट्र राज्यात जुनी पेंशन योजना सुरू करायची असेल तर कांग्रेसला साथ द्या असे आव्हान विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी कर्मचाऱ्यांना मंचावरून उद्दघाटन भाषण करताना बोलत होते.
देशाचे संविधान कायम ठेवण्यासाठी व देशाला वाचवण्यासाठी स्वतःचा स्वार्थ बाजुला ठेऊन देशाच्या सर्वोच्च स्थानी राहुल गांधी यांना बसविणे गरजेचे आहे तसेच दुष्काळ, गारपीट ग्रस्त शेतकऱ्यांना अजून नुकसान भरपाई मिळाली नाही तरी हे सरकार शेतकरी स्वाभिमान योजनेचा बागुलबुवा करीत असल्याची टीका करीत आम्हि सत्तेसाठी नाहीत तर डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेले संविधान टिकावे व बहुजन समाजाचे अधिकार अबाधित राहावे यासाठी ही आमची लढाई आहे. प्रधानमंत्री मोदी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर सत्तर हजार कोटी रुपयाचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप केला माञ पंधरा दिवसातच अजित पवार यांना भाजप मध्ये प्रवेश देत भ्रष्ट्राचारातून क्लीन चिट दिली काय असा प्रश्न उपस्थित करीत या आरोपातील भाजपाला किती पैसे मिळाले आहेत असा आरोप विजय वडेट्टीवार यांनी केला.
चिमूर विधानसभा क्षेत्रात
येणाऱ्या काळात बहुजन समाजातील व्यक्ती आमदार बनला पाहिजे, येत्या काळात राज्यात कांग्रेसचे सरकार आल्यास मला सहा महिन्यासाठी का होईना महसूलमंत्री बनवा येथिल आमदारांचे पितळ उघडे पडतो. नऊ वर्ष झाले अजून पर्यत या क्षेत्रात मोखाबर्डीचे पाणि शेतकऱ्याला मिळाले नाही. म्हणे होवून जावून द्या दुध का दुध पाणि का पाणि यासाठी सर्वं कांग्रेस नेत्यांनी एकत्र येऊन काम करावे. यावेळी निवडणूका लागल्यातर गडचिरोली - चिमूर लोकसभा क्षेत्रावर महाविकास आघाडीचा उमेदवार निवडून येईल. पक्षानी चंद्रपूर - गडचिरोली जिल्ह्याची जबाबदारी दिली तर विधान सभेत काँग्रेसचे आमदार निवडून आनतो असे वक्तव्य करित बहीनींना साडी सोबत मंगळसुत्र देनाऱ्या आमदारांला हद्दपार करावे असे आव्हान विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केले. कार्यक्रमादरम्यान विवीध मान्यवरांनी आपले विचार व्यक्त केले.
यावेळी विधानपरिषद आमदार अभीजीत वंजारी, विधानपरिषद आमदार सुधाकर अडबाले; मुख्य प्रवक्ता अतुल लोंढे; माजी आमदार डॉॅ अविनाश वारजूकर , बाळ कुळकर्णी, माजी आमदार डॉ नामदेव उसेंडी, आनंदराव गेडाम, डॉ सतिश वारजूकर ; डॉ नामदेव कीरसान ,डॉ नितीन कोडवते, महेंद्र ब्राम्हणवाडे, प्रफुल खापर्डे, बंटी शेवाळे, धनराज मुंगले , गजानन बुटके, विलास डांगे , प्रा राम राऊत, संजय डोंगरे, जेष्ठ नागरीक भिमराव ठावरी, माजी प्राचार्य सुधीर पोहनकर, राजेंद्र लोनारे तथा चंद्रपूर - गडचिरोली जिल्यातील अनेक कॉंग्रेस पदाधिकारी, जेष्ठ नागरिक, कार्यकर्ते, उपस्थीत होते.
श्रीहरी बालाजी महाराज देवस्थान येथून रॅली काढन्यात आली चिमूर तालुका काँग्रेस कमेटी जन सवांद यात्रेचा रॅलीचा समारोप कार्यक्रमात करण्यात आला. दरम्यान चिमूर तालुका कॉंग्रेस कमेटीच्या कार्यालयाचे उद्घाटन काँप्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले व विरोधी पक्षनेता विजय वडेट्टीवार उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करन्यात आले. काँग्रेस कार्यकर्त मेळाव्यात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले विरोधी पक्षनेता विजय वडेट्टीवार यांना तलवार भेट देन्यात आली.
कार्यक्रमाचे संचालन प्रणया गडङ्मवार व सुवर्णा ढाकुनकर, प्रास्ताविक तालूका काँग्रेस कमेटीचे अध्यक डॉ विजय गावंडे, आभार विजय डाबरे यांनी मानले कार्यक्रमाला मोठ्या संख्येने नागरीकांनी गर्दी केली होती कार्यक्रमाच्या यशस्वीततेसाठी कॉंग्रेसच्या सर्व आघाडी सेल कार्यकत्यांनी परिश्रम घेतले
Redefine your style
book your appointment now
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Local News
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
विदर्भ फायर न्यूज
Religion
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
No Comments