निर्मल ऑटोमोबाईल
फोर व्हीलर गाड्यांचे स्पेअर पार्ट मिळण्याचे एकमेव ठिकाण
11-08-2024
16 ऑगस्ट शहीद स्म्रुती दिन सोहळा व माजी पंतप्रधान अटबिहारी वाजपेयी यांचा स्मृतीदीन
चिमूर -
चिमूर क्रांतीला यावर्षी 82 वर्षे पुर्ण होत आहेत. या क्रांती लढ्याचे भावी पिढीला स्मरण व्हावे या दृष्टीकोनातून दरवर्षी शहीद स्मृती दिन सोहळा व माजी पंतप्धान अटलबिहारी वाजपेयी यांचा स्मृती दिनाचे आयोजन शहरात करण्यात येते. या कार्यक्रमाला यावर्षी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, ग्रामविकास पंचायत राज व पर्यटन मंत्री ( म रा ) गिरीश महाजन, सांस्कृतीक कार्य वने मत्स्य व्यवसाय मंत्री ( म रा ) तथा चंद्रपूर जिल्हा पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार, आदी मान्यवर चिमूर क्रांतीभूमीतील वीर शहीदांना अभिवादन व माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या स्मृति दिनानिमित्त शहरातील अभ्यंकर मैदान, हुतात्मा स्मारक येथे 16 ऑगस्ट शुक्रवार ला येनार असून पुढील नियोजीत कार्यक्रम बीपीएड ग्राऊंड, आदर्श विद्यालय वडाळा (पैकु) येथे होणार असल्याची माहिती विधानसभा क्षेत्राचे आमदार बंटी भांगडिया यांनी दिली.
दरम्यान देशभक्तीपर संगीताचा कार्यक्रम दुपारी 4 वाजता होणार असून सायंकाळी 5 वाजता क्रांतीभूमातील विर शहीदांना अभिवादन ( हुतात्मा स्मारक, अभ्यंकर मैदान ) केले जाणार आहे. त्यानंतर लगेच नियोजीत कार्यक्रम स्थळी स्वातंत्र्य संग्राम सैनिकांच्या कुटूंबातील प्रमुखांचा सत्कार व पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या स्मृती दिन कार्यक्रम केला जाणार आहे.
कार्यक्रमात विशेष अतिथी केंद्रीय मागासवर्गिय आयोग अध्यक्ष (केंद्रीय कॅबीनेट मंत्री दर्जा) पूर्व केंद्रीय गृहराज्य मंत्री, भारत सरकार हंसराज अहीर, माजी आमदार मितेश भांगडिया व कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी माजी खासदार अशोक नेते, आमदार कृष्णा गजभे, आमदार किशोर जोरगेवार माजी आमदार संजय छोटे, माजी आमदार अतूल देशकर, भाजपा चंद्रपूर जिल्हाध्यक्ष हरिष शर्मा, सर्वाधिकारी अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळ गुरुकुंज मोझरी लक्ष्मण गमे, माजी सर्वाधिकारी अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळ गुरुकुंज मोझरी प्रकाश वाघ महाराज आदी मान्यवर मंचावर उपस्थिती राहणार आहे. परिसरातील नागरीकांनी या शहीद स्मृती दिन सोहळा कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन कार्यक्रमाचे आयोजक चिमूर विधानसभा क्षेत्राचे आमदार बंटी भांगडिया व चिमूर तालूका भाजपा पदाधिकारी कार्यकर्त यांनी केले आहे
फोर व्हीलर गाड्यांचे स्पेअर पार्ट मिळण्याचे एकमेव ठिकाण
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
International
Vaingangavarta19
Local News
Vaingangavarta19
Local News
Vaingangavarta19
Crime
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Local News
No Comments