संकेत मोटर्स, गडचिरोली
गडचिरोली शहरात, प्रथमच आपल्या सेवेत...
F
21-08-2024
चिमूर रोटरी क्लबचा उपक्रम
चिमूर -
रोटरी क्लब दरवर्षी शहरात नव नविन सामाजिक उपक्रम राबवीत असते असाच उपक्रम रक्षाबंधनच्या दिवसी 20 ऑगस्ट मंगळवार ला चिमूर पोलिस स्टेशन येथील पोलिस बंधूंना रोटरी क्लब परिवारातील महिला सदस्यांनी राखी बांधून रक्षाबंधन उत्सव व्दिगुनीत केला.
बहीण भावाच्या पवित्र नात्याचा सण म्हणजे रक्षाबंधन रक्षाबंधनाला बहीण भावाला राखी बांधते आणि भाऊ तिचे रक्षण करण्याचे वचन देत असतो. "सद्रक्षणाय खलनिग्रहणाय" या ब्रीदवाक्यानुसार सज्जनांचे रक्षण करण्यास आणि दुर्जनांवर नियंत्रण ठेवून त्यांचा नायनाट करण्यास पोलिस बांधव सदैव दक्ष आणि सज्ज असतात. आज संध्याकाळी 7 वाजता पोलिस स्टेशन चिमूर येथे आनंद उत्साहात पोलिस निरीक्षक संतोष बाकल व इतर पोलीस बंधूंना राखी बांधून त्यांच्यासोबत महिला भगिनींनी रक्षाबंधन साजरा केला. महिलांनी सर्वांना राखी बांधून आपले दायित्व रोटरी परिवारातील सपना गंपावार, राजश्री ताकसांडे, अर्चना भोयर, डॉ. आश्लेषा लांडगे, सपना बेत्तावार, डॉ.पौर्णिमा खानेकर यांनी पार पाडले.
यावेळी या कार्यक्रमास चिमूर पोलीस स्टेशन चे पोलीस निरिक्षक संतोष बाकल सर ,रोटरी क्लब चिमूर चे अध्यक्ष रोटे. विशाल गंपावार, सचिव रोटे. कैलास धनोरे, कोषाध्यक्ष रोटे.पवन ताकसांडे, जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त रोटे. भोयर सर, रोटे.रोकडे सर, रोटे. प्रफुल बेत्तावार, रोटे.गुरुदास ठाकरे, कृषीमित्र रोटे. अभिजीत बेहते , रोटे. डॉ.महेश खानेकर उपस्थित होते.
गडचिरोली शहरात, प्रथमच आपल्या सेवेत...
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Local News
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
विदर्भ फायर न्यूज
Religion
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
No Comments