समाधान आयुर्वेदिक दवखाना
आपल्या समस्यांचे समाधान हेच आमचे ध्येय
F
15-10-2024
सरपंचाने झिझविल्या प्रशासकीय विभागाच्या पायऱ्या
- पत्रकार परिषदेत सरपंच भोजराज कामडी यांची माहीती
चिमूर -
गावातील सिसी रोड व सभागृहाचे भूमिपूजन संदर्भाने आमदार बंटी भांगडीया १३ जून ला महादवाडी गावाला आले असता भूमिपूजन कार्यक्रमाच्या मंचावरून गावातील स्थानीक अन्नपूर्णाबाई गार्डनच्या सुशोभिकरणासाठी पन्नास लक्ष रुपयांचा निधी आठ दिवसात मंजूर करून गार्डनच्या कामाला सुरुवात करण्याची घोषणा केली. चार महिन्याचा काळ उलटला मात्र अन्नपूर्णाबाई गार्डन आजही उपेक्षीत असल्याचे सोमवारला महादवाडी ग्रामपंचायत येथे आयोजीत पत्रकार परिषदेत सरपंच भोजराज कामडी यांनी माहिती दिली.
महादवाडी व हरणी गाव गट ग्रामपंचायतीची लोकसंख्या बाराशेच्या घरात आहे. महादवाडी येथील ग्रामपंचायत परिसरात गावातील अन्नपूर्णाबाईच्या वारसदारांनी चोवीस हजार स्केअर फुट जागा ग्रामपंचायतला दान केली होती. त्या जागेवर सरपंच भोजराज कामडी यांनी एक करोड रुपयाचे गार्डन तयार करण्याचा संकल्प केला. गार्डनची रूपरेषा तयार करण्यात आली व पंधरा वित्त, सामान्य फंडातून त्या पद्धतीने गार्डनच्या कामाला सुरुवात होवून जागेच्या सभोवताल प्राण्यांच्या प्रतिकृतीचे पुतळे उभारण्यात आले. गावात सिसी रोड व सभागृहाचे भूमिपुजनासाठी आमदार बंटी भांगडीया १३ जून ला महादवाडी येथे आले होते. त्या कार्यक्रमात सरपंच भोजराज कामडी उपस्थित होते तेव्हा त्यांनी भाषणातून अन्नपूर्णाबाई गार्डनच्या सुशोभीकरणासाठी निधीची मागणी केली असता आठ दिवसात निधी मंजूर होवून कामाला सुरुवात होणार असल्याची प्रचिती आमदार बंटी भांगडीया यांनी भूमिपूजन कार्यक्रमाच्या भाषनातून सांगीतले. त्यानुसार सरपंच यांनी दोन महीने जिल्हाधिकारी कार्यालय, बांधकाम विभाग व प्रशासकीय विभाग प्रशासनाच्या पायऱ्या झिझविल्या पत्रव्यवहार केला मात्र अखेर निराशा आली.
काही दिवसांवर विधानसभेच्या निवडणूका येवून ठेपल्या आहेत निवडणूकीची आचार संहिता काही तासात लागनार आहे. चार महीने झाले महादवाडी गावची जनता विचारत आहे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या विचारांवर चालणारे आमदार भांगडीया साहेब स्थानिक अन्नपूर्णाबाई गार्डनचा निधी कुठे गेला? प्रशासकीय मान्यता मिळत नसेल तर दुसऱ्या कोणत्याही फंडातून गार्डन ला निधी उपलब्ध करून द्या अशी विनंती करत दोन दिवसात निधी उपलब्ध न झाल्यास महादवाडी गावात आमदार बंटी भांगडिया यांना व त्याच्या उमेदवारीच्या प्रचाराची गाडी गावात फिरू देणार नसल्याचे आयोजीत पत्रकार परिषदेत सरपंच भोजराज कामडी यांनी सांगीतले.
.......................
महादवाडी येथील अन्नपूर्णाबाई गार्डनच्या सुशोभीकरणाचा प्रस्ताव मंजूरीसाठी प्रशासनाला पाठविला आहे. मंजुरी मिळाल्यानंतर लगेच गार्डनच्या कामाला सुरुवात होईल.
बंटी भांगडीया
आमदार चिमूर विधानसभा क्षेत्र
आपल्या समस्यांचे समाधान हेच आमचे ध्येय
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Local News
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
विदर्भ फायर न्यूज
Religion
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
No Comments