अभि लायटिंग, इलेक्ट्रिकल अँड हार्डवेअर
सर्व मटेरियल होलसेल दरात उपलब्ध
यापेक्षा स्वस्त आणखी कुठेच नाही ...
F
09-10-2023
सामान्य गरीब नुकसानग्रस्त शेतकऱ्यांकडे पाट
तालुक्यातील शेतकरी अस्मानी व सुलतानी संकटाचा सामना करित असतानाच पिकांवर नव नविन रोगाने शेतकर्यांचे कंबरडे मोडले आहे. शेतकऱ्यांने पिकाला लावलेला खर्च सुद्धा निघाला नाही.आजच्या घडीला शेतकरी मेटाकुटीस आला असुन होत्याचा नव्हता झाला आहे. काही दिवसात घरी येनारे सोयाबीन चे पिक बुरशी रोगाने काडी मोड झाले कपासी पिकांची अवस्था अशाच प्रकारची असल्याची माहीती आहे. याच पिक पाहणीचा दौरा करण्यासाठी राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी जिल्ह्यातील सामान्य गरीब नुकसानग्रस्त शेतकर्यांकडे दुर्लक्ष करत त्यांच्या सोयाबीन व कपासी पिकांची नुकसानीची पाहणी न करता फक्त आमदार भांगडीया यांच्या इशाऱ्यावर रविवार ला तालुक्यातील बोथली, रेगांबोडी, वहानगाव येथील सामान्य गरीब शेतकऱ्यांना पाट दाखवत ओळखीच्या भाजपा पदाधिकारीच्या घरी व शेती बांधावर पिक नुकसानीची पाहणी करण्यासाठी आले असल्याचे सोमवार ला चिमूर येथील भारतीय राष्ट्रीय काँग्रेस कार्यालयातील आयोजीत पत्रकार परिषदेत चिमूर विधान सभा क्षेत्राचे समन्वयक डॉ सतिश वारजूकर बोलत होते.
महसुल मंत्री यांचा दौरा तालुक्यातील नियोजीत गावांत होता. रस्त्यालगत वहानगांव व भिसी येथे अनेक शेतकरी अपेक्षेने आपल्या शेती बांधावर महसुल मंत्री येतील म्हणून वाट पाहत होते. दरम्यान शेतकरी संवाद कार्यक्रम एका खाजगी जिनींग मध्ये ठेवन्यात आला होता . त्यात आपल्याला आपल्या शेतातील सोयाबीन व कपासीची व्यथा महसुल मंत्री यांना सांगता येईल अशी संकल्पना शेतकऱ्यांच्या मनात होती. मात्र भिसी येथील नागरीकांची संपूर्ण तहसीलची मागणी लक्षात घेता मागणी पूर्ण करू शकत नसल्यामूळे भिसी मार्गावरून नागपूरकडे जाताना रस्त्यावर प्रतिक्षेत असलेल्या शेतकऱ्याकडे न पाहता महसूल मंत्री ठेंगा दाखवत सरळ मार्गाने निघून गेल्याचे कळते.
वर्षभरापूर्वी सुध्दा तालुक्यात अतिवृष्टी झाली होती तेव्हा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तालुक्यातील निवडक गांवातील शेतकर्यांच्या शेतातील पिकांची पाहणीचा दौरा केला होता. मात्र महालगाव काळू येथील लोकांच्या घरात पूराचे पाणि शिरले शेतपिकांचे नुकसान झाले तरी त्या गावात उपमुख्यमंत्री न जाता गावाला वळसा मारून भाजपा कार्यकर्ता, पदाधिकारी यांच्या शेतातील पिकांची पाहणी करून निघून गेले होते. त्यावेळेस सुद्धा भरपूर नुकसान भरपाई देवू असे आश्वासन दिले तेही फोल ठरल्याचे कळते. महसुल मंत्री यांना मतदार संघात आनून गाजावाजा करायचा आणि प्रत्यक्षात शेतकन्यांच्या पदरात काहीच पडू दयायचे नाही. अशा प्रकारे गरीब शेतकऱ्यांची थट्टा करायची असा चंगच स्थानिक आमदारांनी बांधला असल्याचे आयोजीत पत्रकार परिषदेत डॉ सतिश वारजूकर यांनी सांगीतले
पत्रकार परिषदेला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सेवादल सरचिटनीस प्रा. राम राऊत, तालूका काँग्रेस कमिटी चे अध्यक्ष डॉ विजय गावंडे, शहर अध्यक्ष अविनाश अगडे, युवक काँग्रेस उपाध्यक्ष नागेंद्र चट्टे, उपाध्यक्ष राजू चौधरी, विधान सभा युवक काँग्रेस उपाध्यक्ष प्रशांत डवले, भाऊ टेकाम, रोशन हजारे, गुरुदास जुनघरे, आदी काँग्रेस कार्यकर्ता पदाधिकारी उपस्थित होते.
सर्व मटेरियल होलसेल दरात उपलब्ध
यापेक्षा स्वस्त आणखी कुठेच नाही ...
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Local News
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
विदर्भ फायर न्यूज
Religion
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
No Comments