संगम फॅशन मॉल, वडसा
खरेदी करू नका कमी.. कारण आमच्याकडे आहे जबदस्त ऑफरची हमी
F
07-10-2024
चिमूर तालुक्यातील सुगतकुटी (मालेवाडा) व नागभिड तालुक्यातील बोकडडोह येथे पाच कोटी मंजूर
- आमदार भांगडीया यांच्या प्रयत्नाला यश
चिमूर -
सुगतकुटी ( मालेवाडा ) येथे सामाजिक न्याय विभागाचे सामाजिक सभागृहाचे लोकापर्ण व बुद्धरूप मूर्तीची प्रतिष्ठाणा १ ऑक्टोबरला पार पडली. पुन्हा तिन दिवसानंतर ४ ऑक्टोबर ला सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागा अंतर्गत भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजने अंतर्गत अडीच कोटी रुपये मंजूर झाल्याने आम्रवण दिक्षाभूमी सुगतकुटी (मालेवाडा ) येथील परिसराच्या सौंदर्यात पुन्हा विकासाची भर पडनार आहे.
ग्रामीण क्षेत्रातील अनुसुचित जाती नवबौद्ध घटकांचा विकास व मुलभूत सुविधा पुरविण्याच्या दृष्टीने चिमूर विधानसभा क्षेत्राचे आमदार किर्तीकुमार भांगडीया यांनी सुचविलेल्या कामांना शासन स्तरावर मान्यता देण्यात आली. भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजने अंतर्गत अनुसुचित जाती नव बौद्धाचा विकास सांस्कृतिक विकास घडवून आनन्याच्या दृष्टीकोनातून चिमूर तालुक्यातील सुगतकुटी (मालेवाडा ) परिसर येथे स्वयंरोजगार प्रशिक्षण केंद्र, खुले डोम सभागृह बांधकाम, परिसर सौंदर्यीकरन व सोयी सुविधा निर्माण करन्यासाठी अडीज कोटी रुपये व नागभिड तालुक्यातील बोकडडोह परिसर येथे संरक्षण भिंत बांधकाम, स्वयंरोजगार प्रशिक्षण केंद्र सभागृह बांधकाम, परिसर सौंदर्यीकरण व सोयी सुविधा निर्माण करण्यासाठी अडीज कोटी रुपये एकुन दोन्ही स्थळांना पाच कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.
आमदार किर्तीकुमार भांगडीया यांच्या प्रयत्नाने चिमूर - नागभिड तालुक्यात पुन्हा विकासांची भर पडल्याने बौद्ध पंच कमेटी मालेवाडा येथील नागरीकांनी आमदार भांगडीया यांच्या निवासस्थानी पुष्प गुच्छ देवून त्यांचा सत्कार केला यावेळी बौद्ध पंच कमेटीचे अध्यक्ष जगदीश रामटेके, यशवंत सरदार, नरेश गजभिये, संघम भिमटे, काशिनाथ गजभिये, तुकाराम ठवरे, वामन गजभिये, विलास मेश्राम, गंगाधर गजभिये, पतिराम मेश्राम, कवडू मेश्राम, पंकज रामटेके आदी उपस्थित होते.
खरेदी करू नका कमी.. कारण आमच्याकडे आहे जबदस्त ऑफरची हमी
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Local News
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
विदर्भ फायर न्यूज
Religion
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
No Comments