CPELLO SALON
Redefine your style
book your appointment now
F
29-12-2023
पळसगांव येथे भागवत सप्ताह समाप्ती
भगवंताने कथांमधून जीवनाचा उद्धार कसा करावा, हेच सांगितले आहे. भागवतानी अत्यंत सरळ आणि सोप्या भाषेत मानवजातीला अचूक मार्ग दाखविला आहे. भागवताकडे केवळ कथा म्हणून न पाहता या कथांचे आपल्या जीवनात काय महत्त्व आहे त्यातील काय आत्मसात करायचे हे समजून घ्यायला पाहीजे. भागवत सप्ताह म्हणजे ज्ञानयज्ञ सोहळा त्यामुळे त्यातील तत्त्वज्ञान समजून घ्यायला हवे असे प्रतिपादन चिमूर विधान सभा क्षेत्राचे समन्वयक तथा महाराष्ट्र प्रदेश ओबीसी महासंघ चे राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉ. सतिश वारजुकर यांनी केले.
भागवत सप्ताह समितीच्या वतीने श्रीमद् भागवत सप्ताह, गोपाल काला निमित्त भागवत सप्ताह समाप्ती कार्यक्रमाचे आयोजन पळसगांव ( पिपर्डा ) येथे करण्यात आले होते. कार्यक्रमादरम्यान उपस्थित मान्यवरांच्या हस्ते डॉ सतिश वारजूकर यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी चिमूर तालुका कांग्रेस कमिटी अध्यक्ष डॉ. विजय गावंडे पाटील,पळसगांव सर्कल प्रमुख सुभाष बन्सोड, दुमदेव पाटील बोरकर, राजू आत्राम, निकेश सोनबनवार, प्रकाश रामटेके, संजय सोणेकर, नूतन सहारे, महादेव सहारे व समस्त गावकरी उपस्थित होते
Redefine your style
book your appointment now
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Local News
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
विदर्भ फायर न्यूज
Religion
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
No Comments