STUDY POINT INSTITUTE
आमच्या सोबत द्या, आपल्या स्वप्नांना आकार ...
F
26-08-2023
राष्ट्रवादी काँग्रेसचे रेवतकर यांचा इशारा
भिसी येथे नगर पंचायत झाली तेव्हा समस्या कमी होईल असे वाटले मात्र दिवसेंदिवस उलट समस्या वाढल्या आहेत नागरीकांचे वेळेवर काम होत नाही. नागरीकांना अनेक समस्याला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे भिसी नगर पंचायत मधील समस्या तात्काळ सोडवा अन्यथा रस्तावर उतरू अशा प्रकारचे इशारा निवेदण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ( अजित गट ) चे जिल्हा सरचिटनीस अरविंद रेवतकर यांनी नगर पंचायत मुख्याधिकारी डॉ सुप्रीया राठोड यांना दिले आहे.
नगर पंचायतीतील आबादीच्या जागेवर अनेक वर्षापासुन नागरिक राहत आहे त्यांना घरकूल मंजूर करण्यात यावे, ज्यांना घरकूल मंजूर झाले नाही त्याना घरकूल मंजूरी देन्यात येवून बांधकामाचि परवानगी देन्यात यावी, नगर पंचायती मधील पाणीपुरवठा फिल्टर व्दारे करूयात यावा, शहरातील सांडपाणी वाहून नेणाऱ्या नालीची सफाई करण्यात यावी , स्वच्छ भारत योजना अंतर्गत ज्या कुंटूबाला घरगुती शौचालय नाही अशा कुंटूबाचा सर्वे करून त्या कुंटूबास शौच्छालयाचा लाभ देन्यात यावा, घनकचऱ्यांची विल्हेवाट, विद्युत पुरवठा, राहरातील बोरवेलवरिल पाणी टॅक सफाई व दुरुस्ती करणे, नगर पंचायत मधील कर्मचारी भरती प्रकरण, मागासवर्गीय वस्तीला लागून असलेले दारू दुकान शहराबाहेर स्थानास्तरीत करण्यात यावे, आदी समस्यांमुळे नागरिक बेजार झाले आहेत. शहरातील टागोर फाटा चिमूर बायपास ते भिसी चौरस्ता बाजार चौक बसस्थानकापर्यत रस्त्याचे रुंदीकरण करण्यात यावे, रामलीला मैदानावरील घनकचरा उचलन्यात यावा, मागील अतिवृष्टीमुळे शहरातील नागरीकांच्या घरात पूराचे पाणि शिरले नुकसान झाले अशांना नुकसान भरपाई देन्यात यावी. आदि समस्यांविषयी योग्य निर्णय घेवून शहरातील समस्यांचे निराकरण करण्यात यावे महीनाभरात समस्यांचे निराकरण न झाल्यास शहरवासीय तिव्र आंदोलन करेल असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे ( अजित गट ) जिल्हा सरचिटनिस अरविंद रेवतकर यांनी निवेदनातून दिला आहे.
यावेळी प्रणय खवसे जगत तांबे किशोर गभणे विजय ननावरे चेतन पडोळे हरी मोहीनकर अविशा रोकडे मंजिरी भिमटे उषा गभणे वनिता मेश्राम माधूरी कामडी योगीता बोरकर राकेश दांडेकर श्यामराव मुंगले विजय पोहीनकर आशीष देसहि बेडू मेश्राम प्रकाश रोकडे ईश्वर घंदरे व शहरातील नागरिक राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते आदी उपस्थीत होते.
आमच्या सोबत द्या, आपल्या स्वप्नांना आकार ...
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Local News
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
विदर्भ फायर न्यूज
Religion
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
No Comments