CPELLO SALON
Redefine your style
book your appointment now
F
26-12-2023
बुधवार पासून श्री दत्त जयंती महोत्सव
- साठगाव येथील गावंडे कुटुंबांला २४८ वर्षापुर्वी मिळाली मालगुजारी
चंद्रपूर, नागपूर व भंडारा या तिन्ही जिल्ह्याच्या सीमा हद्दीवर वसलेल्या चिमूर तालुक्यातील साठगाव येथील टेकडीवर गावंडे कुटुंबातील राधाबाई धर्माजी पाटील गांवडे यांनी इसवी सन १८६४ मध्ये श्री दत्तात्रय प्रभुचे मंदिर बांधकामास सुरवात केली. तेव्हापासून श्री दत्त जंयती महोत्सवाच्या तीनदिवसीय कार्यक्रमाला सुरवात झाली. यावर्षीही १५९ वर्षांनी २७ डिसेंबरपासून श्री दत्त प्रभू जयंती महोत्सवास सुरवात होणार आहे. हि यात्रा तिन दिवस चालनार आहे
महानुभाव ग्रंथामध्ये चांदापूर येथे राजे भोसले यांचे इ.स. १७८५ मध्ये इंग्रजाशी झालेल्या युद्धाचा उल्लेख आहे. त्यावेळी माहूर संस्थान मधून भोसल्यांच्या राज्याचा कारभार चालविला जात होता. या काळात युद्धात विजय मिळविलेल्या राजे भोसले यांचेकडून विजयी सेनाप्रमुख गावंडे कुटुंबातील पराक्रमी वीराला पूर्वीचे परागणे हल्लीचे अठराशे ते दोन हजार लोकवस्तीचे साठगाव मालगुजारीत मिळाले होते. मात्र भोसलेकालीन काळात काही नैसर्गीक आपत्ती व पेंढारी ( लुटारू ) यांच्या लुटीत पूर्णपणे उद्धवस्त झाले होते. त्यानंतर यवतमाळ जिल्ह्यातील दिग्रस येथील गावंडे कुटुंब साठगावला मालगुजार म्हणून स्थायिक झाले. त्यानंतर त्यांनी श्रीदत्तात्रेय प्रभू यांचे निद्रास्थान देवदेवेश्वरी संस्थान, माहूर येथे खाचर बैलाने देवदर्शानाकरिता माहुरवारी सुरू केली. पूर्वी तीर्थयात्रेवरून परत आल्यानंतर गावाचे शिवेवर किंवा मंदिरात एक रात्र मुक्काम केल्या जात होता.
अशाच एका वारीमध्ये मालगुजार गावंडे पाटील यांनीसुद्धा त्याकाळी गावापासून दूर असलेल्या टेकडीवर मुक्काम केला. तेव्हा गावंडे पाटील यांच्या स्वप्नात पूजा केल्यास गावाचे भाग्य उदयास येईल, असे सांगण्यात आले. तेव्हापासून झोपडीवजा मंदिरात माहूर येथील विशेषाची स्थापना त्रिकाळ पूजाअर्चा सुरू केली. ही आजही नित्यक्रमाने सुरू आहे. राधाबाई धर्माजीराव पाटील गांवडे १५९ वर्षांपूर्वी याच टेकळीवर श्री दत्तात्रय प्रभु मंदिर बांधले. तेव्हापासून श्री दत्त जंयती महोत्सवास सुरवात झाली. यानंतर राधाबाईने माहूरवारी बंद करून गोंदिया जिल्ह्यातील डाकराम-सुकळी (चक्रधर स्वामीचे चरणाकिंत स्थान) येथील वारी सुरू केली. ती वारी आजही सुरू आहे.
राधाबाई नंतर त्यांचा मुलगा कवडूजी पाटील यांनी तर त्यानंतर रामचंद्रजी, हरिचंद्रजी, देविदासजी व उमेशजी पाटील यांनीही श्री दत्तजयंती यात्रेचा वारसा जोपासला आहे. आजही पुढील पिढीकडून हे कार्य सुरू आहे. न्यास नोंदणी नंतर अध्यक्ष म्हणून कै. कवडूजी धर्माजी पाटील गावंडे, कै. रामचंद्र कवडूजी पाटील गावंडे व श्रीमती लीलाबाई रामचंद्र पाटील गावंडे यांनी कार्यभार सांभाळलेला आहे. मार्गशीर्ष पौर्णिमेपासून येथे श्री दत्त जयंती यात्रा महोत्सवाला सुरुवात होते प्रथम दिवसी सकाळी श्री दत्त प्रभुचा जन्मोत्सव ध्वजारोहण सायंकाळी वाद्य भजनाच्या गजरात दत्त प्रभूचे नामघोषात गावातून रथ यात्रा काढली जाते दुसऱ्या दिवसी भजन प्रवचन कीर्तन दहीहांडी गोपाल काला व महाप्रसादाचे आयोजन केले जाते यात्रेनिमीत्त गावातील नागरीक आरोग्य शिबीर रक्तदान शिबीर मैदानी खेळ व नाटकाचे आयोजन करीत असतात. १५९ वर्षांनंतरही सुरेश रामचंद्र पाटील गावंडे कुटुंबाकडून गावालगतच्या टेकडीवर उभे असलेले श्री दत्त प्रभू चे मंदीरात जयंती महोत्सव मोठ्या भक्तीभावाने साजरा करण्यात येत आहे.
Redefine your style
book your appointment now
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Local News
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
विदर्भ फायर न्यूज
Religion
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
No Comments